गट ब अराजपत्रित सेवा मुख्य परीक्षेच्या पेपर दोनमधील भूगोल घटकाची तयारी कशी करावी ते या लेखामध्ये पाहू. मुख्य परीक्षा पेपर दोनमध्ये भूगोल घटकासाठी विहीत केलेला अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे आहे:

भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल अभ्यासक्रम

महाराष्ट्राचा व भारताचा प्राकृतिक भूगोल, मुख्य प्राकृतिक विभाग, हवामानशास्त्र, पर्जन्यमान व तापमान, पर्जन्यातील विभागवार बदल, नद्या, पर्वत, व पठार, विविध भूरू पे, राजकीय विभाग, प्रशासकीय विभाग, नैसर्गिक संपत्ती वने व खनिजे, मानवी व सामाजिक भूगोल लोकसंख्या, लोकसंख्येचे स्थानांतर व त्याचे उगम आणि इष्टस्थानावरील परिणाम, ग्रामीण वस्त्या व तांडे, झोपडपट्ट्या व त्यांचे प्रश्न. पर्यावरण या उपघटकाचा समावेश स्वतंत्रपणे केलेला आहे. त्याबाबत वेगळ्या लेखामध्ये पाहू. सध्या भूगोल या घटकाची तयारी पुढीलप्रमाणे करता येईल:

ITBP CAPF Medical Officer Recruitment 2024: Notification For 345 Vacancies Out, Check Details
ITBP CAPF Recruitment 2024: मेडिकल ऑफिसरसाठी बंपर भरती सुरू; जाणून घ्या अर्जप्रक्रिया
Job Opportunity Vacancies in Railway Recruitment Board career news
नोकरीची संधी: रेल्वे भरती बोर्डात रिक्त पदे
UPSC Preparation Overview of Questions Main Exam 2024 career news
UPSCची तयारी: प्रश्नांचे अवलोकन; मुख्य परीक्षा २०२४
Education Opportunity Apprenticeship with ONGC Oil and Natural Gas Corporation Ltd
शिक्षणाची संधी: ओएनजीसीत अॅप्रेंटिसशिप
Success Story Of Rama Murthy Thyagarajan In Marathi
Success Story : ना आलिशान गाडी, ना मोबाईलचा वापर; कोटींची संपत्ती असून साधेपणाने जगतात आयुष्य; वाचा रामामूर्ती यांचा प्रवास
UIIC AO Recruitment 2024
UIIC AO Recruitment 2024: इन्शुरन्स कंपनीत अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसरच्या २०० पदांसाठी भरती! ९६,००० पर्यत मिळू शकतो पगार, वयोमर्यादेतही सुट
Job Opportunity Direct Service Recruitment for Inspector Posts career news
नोकरीची संधी: निरीक्षक पदांसाठी सरळसेवा भरती
MPSC Mantra Laws and Codes State Services Main Examination General Studies Paper Two
MPSC मंत्र: कायदे आणि संहिता; राज्यसेवा मुख्य परीक्षा – सामान्य अध्ययन पेपर दोन
Carrer news Preparing to become a professor Teacher Education
चौकट मोडताना: प्राध्यापक होण्याचालेकीचा निर्णय योग्यच

महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

यामध्ये महाराष्ट्राच्या मुख्य हवामान विभागांचा नकाशाच्या आधारे अभ्यास करणे अवश्यक आहे. प्रत्येक विभागाची भौगोलिक वैशिष्ट्ये, हवामानाचे वैशिष्ट्यपूर्ण घटक, त्यामुळे होणारी मृदा, पिके, इतर आर्थिक उत्पादनांमध्ये या वैशिष्ट्यांचे योगदन या बाबी समजून घ्याव्यात. महाराष्ट्राचे हवामान विभाग हे दक्षिणोत्तर पसरले आहेत. त्यांचा पश्चिम ते पूर्व अशा क्रमाने अभ्यास केल्यास मान्सून, पर्जन्याचे वितरण, तापमानातील फरक यांचा तुलनात्मक अभ्यासही शक्य होईल.

हेही वाचा : देवदत्त पट्टनाईक यांच्यासह कला आणि संस्कृतीचा अभ्यास | भारतातील प्रागैतिहासिक स्थळांचा आढावा !

राज्यातील नद्यांचा अभ्यास हा नदी खोऱ्यांचा / प्रणालींचा घटक म्हणून करणे आवश्यक आहे. पर्वतप्रणालीचा नकाशावरील अभ्यास करतानाच त्यांचे आर्थिक महत्त्व, पर्जन्यनिर्मिती व हवामान इत्यादी मधील महत्त्व या बाबींचाही अभ्यास आवश्यक आहे. या प्रणालीची उत्तर ते दक्षिण क्रमाने सलगता समजून घ्यायला हवी. उदा. महाराष्ट्रात उत्तर ते दक्षिण पुढील क्रमाने प्रणाली आढळतात. सातपुडा पर्वत तापी पूर्णा खोरे सातमाळा अजिंठा डोंगररांगा – गोदावरी खोरे हरिशचंद्र बालाघाट डोंगर भीमा नदी खोरे शंभू महादेव डोंगर कृष्णा खोरे.

नैसर्गिक संपत्ती

महाराष्ट्रातील महत्त्वाची वने, अभयारण्ये, राष्ट्रीय उद्याने, जैवविविधता क्षेत्रे यांचा भौगोलिक व पर्यावरणीय वैशिष्ट्ये व महत्त्व या दृष्टीने अभ्यास करावा. वनांचे आर्थिक महत्त्व समजून घ्यावे. महाराष्ट्रातील खनिजांचे उत्पादन होणारी क्षेत्रे, त्यांची भूशास्त्रीय रचना, उत्पादनाचे प्रमाण व गुणवत्ता, खाणींचे प्रकार बारकाईने समजून घ्याव्यात. भारतातील व महाराष्ट्रातील खडकांचे प्रकार पुढील मुद्द्यांच्या अनुषंगाने अभ्यासावेत. खडकांचा प्रकार, निर्मिती, कोठे आढळतो, भौगोलिक व वैज्ञानिक वैशिष्टये, रचना, आर्थिक महत्त्व.

हेही वाचा : देवदत्त पट्टनायक यांच्यासह कला आणि संस्कृतीचा अभ्यास | मातीची भांडी संस्कृतीची झलक कशी देतात?  

राजकीय

प्रशासकीय विभागातील जिल्हे, त्यांची मुख्यालये व त्यांची वैशिष्ट्ये, जिल्ह्यांची कालानुक्रमे निर्मिती, महत्त्वाची शहरे, आर्थिक व पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाची ठिकाणे यांच्या टेबलमध्ये नोट्स काढाव्यात.

राज्यातील जिल्ह्यांच्या सीमा, इतर राज्यांच्या सीमेवरील जिल्हे, जिल्ह्यांच्या सीमा म्हणून उपयुक्त ठरणारी नदी / डोंगर / नैसर्गिक भूरूप या बाबी अभ्यासक्रमामध्ये वेगळ्याने नमूद केलेल्या नसल्या तरी त्यांचा अभ्यास आवश्यक आहे. त्यामुळे राज्याचा राजकीय नकाशाही व्यवस्थित अभ्यासणे आवश्यक आहे.

लोकसंख्या भूगोल

भारताच्या व राज्याच्या लोकसंख्येचा साक्षरता, नागरीकरण, लिंग गुणोत्तर, रोजगार, लोकसंख्येची घनता या मुद्द्यांच्या आधारे आढावा घ्यावा. जन्मदर, मृत्यूदर, बाल लिंग गुणोत्तर, माता मृत्यूदर, अर्भक मृत्यू दर, बाल मृत्यू दर यांची माहिती असायला हवी.

वसाहतींचे प्रकार, आकार, स्वरूप, ठिकाण व आर्थिक महत्त्व पहायला हवेत. राज्यातील महत्त्वाच्या ठिकाणी कोणत्या प्रकारची वसाहत आहे हे समजून घेता आले तर उत्तम. पण माहिती नसल्यास वसाहतींचे प्रकार नीट अभ्यासले असतील तर एखाद्या प्रसिद्ध ठिकाणी वसाहत कोणत्या प्रकारे विकसित झालेली असू शकेल याचा अंदाज नक्की बांधता येऊ शकतो. असा अंदाज बांधण्याचा सराव तयारीच्या वेळी केल्यास एकूणच या घटकाची तयारी चांगली होईल.

हेही वाचा : IOCL Recruitment 2024 : इंडियन ऑईलमध्ये नोकरीची संधी! ‘या’ ४६७ रिक्त पदांवर होणार भरती; पगार १ लाखपेक्षा जास्त, जाणून घ्या सविस्तर

स्थलांतराचा कारणे, स्वरूप, समस्या, परिणाम व उपाय इ. दृष्टींने अभ्यास आवश्यक आहे. या बाबतीत ‘आकडेवारी’ हा मुद्दा महत्त्वाचा आहे. विशेषत: महाराष्ट्राच्या संदर्भातील स्थलांतराची आकडेवारी (म्हणजे टक्केवारी) आर्थिक पाहणी अहवालामधून अद्यायावत करून घ्यायला हवी.

झोपडपट्टीची व्याख्या, तेथील परिस्थिती, त्यांच्या निर्मितीची कारणे यांचा आढावा घ्यायला हवा. झोपडपट्टी पुनर्वसन कायद्यातील ठळक बाबी माहीत असाव्यात तसेच त्या दृष्टीने अद्यायावत चालू घडामोडी माहीत असायला हव्यात.

चालू घडामोडी

यामध्ये खाणी, धरणे, महत्त्वाचे प्रकल्प यांबाबत नवे निर्णय, त्यांबाबत पर्यावरणीय मुद्दे, लोकांचा विरोध / स्वीकार ही तथ्यात्मक माहिती करून घ्यावी. तसेच राज्यातील नैसर्गिक तसेच इतर गंभीर आपत्तींची अद्यायावत माहिती असायला हवी.