Bharat Desai Success Story: आयआयटी पदवीधर त्यांच्या तीक्ष्ण बुद्धी, दृष्टी आणि नाविन्यपूर्ण विचारांसाठी जगभरात प्रसिद्ध आहेत. जगातील आघाडीच्या टेक कंपन्यांद्वारे अनेकांची नियुक्ती केली जाते, तर काही त्यांचे स्वतःचे यशस्वी उपक्रम सुरू करतात. अशाच एका IIT माजी विद्यार्थ्याला सुरुवातीला रतन टाटा यांच्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने नियुक्त केले होते, परंतु अनुभव मिळाल्यानंतर त्यांनी स्वतःची कंपनी सुरू केली आणि अखेरीस ती रु. २८,००० कोटींना विकली. केनियात जन्मलेले आणि भारतात वाढलेले अब्जाधीश उद्योगपती भरत देसाई यांची प्रेरणादायी कथा आपण आज जाणून घेणार आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

११ ऑक्टोबर २०२४ पर्यंत भरत देसाई यांची अंदाजे एकूण संपत्ती $ १.६ अब्ज (रु. १३,५०१ कोटी) आहे. १९८० मध्ये देसाई आणि त्यांची पत्नी नीरजा सेठी यांनी ट्रॉय, मिशिगन येथे सिंटेल या आयटी सल्लागार आणि आउटसोर्सिंग कंपनीची स्थापना केली. त्यांनी त्यांची कंपनी ट्रॉय, मिशिगन येथील त्यांच्या अपार्टमेंटमधून सुरू केली. १९७६ मध्ये देसाई टाटा समूहाच्या TCS साठी प्रोग्रामर म्हणून अमेरिकेत गेले.

हेही वाचा… जास्त पगाराची नोकरी सोडली अन् घेतली ‘ही’ जोखीम, आता आहेत कोटींचे मालक; वाचा उथम गौडा यांचा प्रेरणादायी प्रवास

देसाई यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली जेव्हा ते नीरजाला भेटले, जी लवकरच त्यांच्या जीवनाची आणि व्यवसायाची भागीदार होणार होती. मिशिगनमधील एका छोट्या अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या या जोडप्याने मोठी स्वप्ने आणि स्वतःचं अस्तित्व स्थापन करण्यासाठी मेहनत घेतली. त्यांची बचत एकत्रित करून त्यांनी मोठी झेप घेतली. सिंटेल सुरू करण्यासाठी सुमारे रु १६,००० ची गुंतवणूक केली; हा उपक्रम अखेरीस त्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त वाढला.

सिंटेलने पहिल्या वर्षात ३०,००० डॉलर्सची विक्री केली. तरीही २०१८ पर्यंत कंपनीची वाढ झपाट्याने झाली आणि अग्रगण्य फ्रेंच IT फर्म Atos SE ने सिंटेल ३.४ अब्ज डॉलर्स (आज अंदाजे रु. २८,६९० कोटी) ला विकत घेतले. फोर्ब्सची जागतिक अब्जाधीशांची यादी २०२४ नुसार, IIT पदवीधर भरत देसाई १९४५ व्या क्रमांकावर आहेत.

हेही वाचा… मुकेश अंबानी, गौतम अदानी यांच्यापेक्षाही श्रीमंत, ‘या’ व्यक्तीने एकेकाळी केलं होतं रेस्टॉरंटमध्ये वेटरचं काम, वाचा प्रसिद्ध कंपनीच्या सीईओचा प्रवास

भरत देसाई यांचे शिक्षण

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) बॉम्बे येथून त्यांनी इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमध्ये बॅचलर पदवी पूर्ण केली. शिवाय त्यांनी मिशिगन विद्यापीठाच्या स्टीफन एम रॉस स्कूल ऑफ बिझनेसमधून फायनान्समध्ये एमबीए केले आहे.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Syntel founder bharat desai success story from leaving ratan tata company to start his own business which he sold for crores dvr