महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने, महसूल विभागांतर्गत तलाठी पदभरतीची घोषणा केली आहे. या पदभरतीसाठी आवश्यक परीक्षेच्या तारखांची घोषणा काही दिवसांपूर्वी करण्यात आली आहे. ही परीक्षा TCSच्या वतीने घेतली जाणार असून जवळपास १९ दिवसांच्या कालावधीत ती पार पडणार आहे. परिपत्रकात जाहीर केल्यानुसार परीक्षेच्या तीन दिवस अगोदर म्हणजेच, उमेदवारांना आजपासून परीक्षेचे हॉलतिकीट ऑनलाइन उपलब्ध होणार आहेत. तसेच पुढील टप्यातील प्रवेशपत्र लवकरच उपलब्ध करण्यात येणार आहेत. या संर्भातील इमेल सुद्धा उमेदवारांना प्राप्त झाले असण्याची शक्यता आहे. उमेदवारांनी यासाठी इनबॉक्स आणि स्पॅम फोल्डर चेक करायला सुरुवात करायला सुरुवात करावी.

जाहिरातीनुसार परीक्षा १७ ऑगस्ट ते १२ सप्टेंबर २०२३ या कालावधीत नियोजित आहे. महत्वाचे म्हणजे, १७, १८ आणि १९ ऑगस्ट रोजी ज्या उमेदवारांची परीक्षा असले त्यांना आज इमेल येऊ शकतो, त्यांनी तो Spam folder मध्ये जाऊन चेक करावा किंवा वेबसाइटवर पुढील अपडेट तपासून घ्यावी.

education board warning against schools for obstructing students while filling exam application zws
परीक्षा अर्ज भरताना अडवणूक केल्यास शाळांवर कारवाई;  शिक्षण मंडळाचा इशारा
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
NEET Postgraduate Exam Schedule Announced Wardha news
नीट पदव्युत्तर परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; वैद्यक आयोग म्हणतो…
DoT recruitment 2024 Apply for Sub Divisional engineer salary up to Rs 151100
DoT recruitment 2024: सब-डिव्हिजन इंजीनिअरच्या पदासाठी होणार भरती;१,५१,१०० रुपयांपर्यंत मिळेल पगार, आताच करा अर्ज
upsc released announced annual time table
‘यूपीएससी’कडून विविध परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या कोणती परीक्षा कधी होणार?
UPSC CSE Mains Result 2024 : यूपीएससी नागरी सेवा मुख्य परीक्षा 2024 चा निकाल जाहीर; ‘येथे’ ऑनलाइन पाहा निकाल
Both exams held statewide school registration and student applications were open from October 17 to December 7
विद्यार्थ्यांनो अंतिम मुदतवाढ, अन्यथा,,
land records department will provide online property title change notices to postal department
मालमत्तेसबंधीत टपाल विभागाला ऑनलाईन नोटीस… काय होणार परिणाम ?

हेही वाचा- १० वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! DTP विभागात ‘या’ पदासाठी भरती सुरु

४३४४ पदांसाठी भरती –

महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागांतर्गत तलाठी (गट-क) संवर्गातील एकूण ४३४४ पदांच्या भरतीसाठी जमावबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे कार्यालय यांच्याकडून राज्यभरातील ३६ जिल्ह्यांमधील विविध केंद्रांवर ऑनलाइन परीक्षा घेण्यात येणार आहे. तलाठी पदाच्या या ४३४४ जागांच्या भरतीसाठी संपूर्ण राज्यातून तब्बल १३ लाखांपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले आहेत. तर ही परीक्षा तब्बल १९ दिवस चालणार आहे. काही दिवसांपूर्वी या परीक्षेचे वेळापत्रकही अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आले आहे. तलाठी भरती परीक्षेसाठी TCS कंपनीच्यावतीने तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत. ही परीक्षा १७ ऑगस्ट २०२३ ते १४ सप्टेंबर २०२३ या कालावधीत १९ दिवस होणार असून ती ३ सत्रांमध्ये घेतली जाणार आहे.

TCS आणि शासनाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या सूचनांनुसार परीक्षेच्या ३ दिवस अगोदर उमेदवारांना हॉलतिकीट संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यानुसार, तलाठी भरतीसाठी अर्ज करून पात्र ठरलेल्या उमेदवारांना आजपासून हॉलतिकीट अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध होण्याची शक्यता आहे. Hall Ticket संदर्भातील माहिती उमेदवाराच्या मोबाईल, ईमेल आयडी वर पाठवली जाईल. यासाठी सर्व उमेदवारांनी त्यांचे ईमेल युजर आयडी एकदा चेक करून त्यांनी दिलेला मेल आयडी आणि मोबाईल नंबर बरोबर आहे की नाही, याची पडताळणी आधीचं करणं गजरेचं आहे.

हेही वाचा- १२ वी पास आणि पदवीधरांना MIDC मध्ये नोकरीची मोठी संधी! ‘या’ ८०२ पदांसाठी भरती सुरु; जाणून घ्या सविस्तर

परीक्षेचे स्वरूप –

  • तलाठी पदभरतीसाठी घेण्यात येणारी परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे.
  • मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी/ अंकगणित या विषयांसाठी प्रत्येकी ५० गुण, अशी एकूण २०० गुणांची परीक्षा उमेदवाराला द्यावी लागणार आहे.
  • प्रत्येक विषयाच्या विभागात २५ प्रश्न असून, प्रत्येक प्रश्नाला प्रत्येकी २ गुण असतील.
  • सदर परीक्षेचा दर्जा भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या पदवी परीक्षेच्या समान असेल. परंतु, मराठी आणि इंग्रजी विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा
  • दर्जा उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या (बारावी) समान असणार आहे.
  • निवडप्रक्रियेत पात्र होण्यासाठी उमेदवाराला किमान ४५ टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक आहे.

महाराष्ट्र तलाठी अधिसूचना २०२३ नुसार, निवड प्रक्रियेमध्ये लेखी परीक्षा आणि कागदपत्र पडताळणी यांचा समावेश आहे. महाराष्ट्र तलाठी लेखी परीक्षा १७ ऑगस्ट ते १२ सप्टेंबर २०२३ या कालावधीत महाराष्ट्र राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर होणार आहे.

तीन टप्प्यात होणार परीक्षा –

  • पहिला टप्प्पा – १७, १८, १९, २०, २१, २२ ऑगस्ट
  • दुसरा टप्पा – २६ ऑगस्ट ते १ सप्टेंबर
  • तिसरा टप्पा – ४ सप्टेंबर ते १४ सप्टेंबर
    तर २३, २४, २५ ऑगस्ट तसेच २, ३, ७, ९, ११, १२ आणि १३ सप्टेंबर या तारखांना परीक्षा होणार नाहीत.

तलाठी भरती परीक्षेचे वेळापत्रक –

  • ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख – १७ जुलै २०२३
  • शुल्क भरण्याची शेवटची तारीख – १७ जुलै २०२३
  • महाराष्ट्र तलाठी प्रवेशपत्र २०२३ – ऑगस्ट २०२३ चा पहिला आठवडा
  • महाराष्ट्र तलाठी परीक्षा तारीख – १७ ऑगस्ट ते १२ सप्टेंबर २०२३
  • तलाठी भरतीचा निकाल २०२३ – ऑक्टोबर २०२३

Story img Loader