TISS Mumbai Bharti 2024: मुंबईत नोकरी शोधणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS) मुंबई अंतर्गत रिक्त पदांकरीता भरती सुरु आहे . या भरती अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. भरती प्रक्रिया सुरू झाली असून पदांनुसार पात्र व इच्छुक उमेदवार भरतीसाठी अधिकृत वेबसाईट tiss.edu भेट देऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. निवड झाल्यानंतर उमेदवारांची वॉक-इन मुलाखत होणार आहे.

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, मुंबई भरती २०२४ बद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ…

Dabbawala, Dabbawala backs Uddhav Thackeray,
मुंबईचे डबेवाले शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) पाठीशी
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
maha vikas aghadi releases manifesto for maharashtra assembly poll 2024
महिला, शेतकऱ्यांवर आश्वासनांची खैरात; मविआचा ‘महाराष्ट्रनामा’ जाहीर
Gold seized Mumbai airport, Mumbai airport,
मुंबई विमानतळावरून पावणेतीन कोटींचे सोने जप्त, दोन कर्मचाऱ्यांना अटक
Comrade Subhash Kakuste no more
सत्यशोधक कम्युनिस्ट नेते सुभाष काकुस्ते यांचे निधन
nashik vidhan sabha
नाशिक परिक्षेत्रात २५ दिवसांत ५० कोटींचा मुद्देमाल जप्त, १७ हजार गुन्हेगारांविरुध्द कारवाई
rbi digital awareness loksatta
जनजागृतीवर ५९ कोटींचा खर्च, तरीही सर्वसामान्यांच्या २,८८० कोटींवर डल्ला…बँकेत तुमचे पैसे…
ajit pawar jayant patil
Ajit Pawar: “ऊस उत्पादकांना पैसे देऊ न शकणाऱ्यांना मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न”, अजित पवारांची जयंत पाटलांवर बोचरी टीका

रिक्त पद – ‘सीनिअर प्रोजेक्ट मॅनेजर’ (“Senior Project Manager) पदाच्या विविध रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे.

शैक्षणिक पात्रता – अर्ज करणाऱ्या उमेवाराकडे माहिती तंत्रज्ञान (आयटी) किंवा संगणक अनुप्रयोगाच्या पसंतीच्या क्षेत्रात किमान २ वर्षे पदव्युत्तर असणे गरजेचं आहे.

हेही वाचा…Mumbai Job Recruitment 2024 : मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये ‘या’ पदासाठी भरती; ८० हजारांहून अधिक पगार; जाणून घ्या अर्जाची पद्धत

पगार – भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवारांना महिन्याला ७० हजार ते ७५ हजार रुपयांपर्यंत पगार मिळणार आहे.

निवड प्रक्रिया –

अर्ज केलेल्या उमेदवारांची निवड वॉक-इन मुलाखतीद्वारे होईल. वॉक-इन मुलाखत दुपारी २ ते संध्याकाळी ४ या वेळेत असणार आहे. मुलाखतीच्या वेळी उमेदवारांनी सर्व मूळ कागदपत्रे घेऊन खाली दिलेल्या पत्त्यावर पोहचायचं आहे.

पत्ता – टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स – स्कूल ऑफ व्होकेशनल एज्युकेशन, कौशल केंद्र, न्यू कॅम्पस, फार्म रोड, देवनार, मुंबई.

अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिसूचना काळजीपूर्वक वाचून घ्यावी…

लिंक – https://tiss.edu/uploads/files/Advetisement_Sr._Project_Mgr_May_2024_NU0y9da.pdf

अधिसूचनेत दिलेली सर्व माहिती वाचून उमेदवारांनी अर्ज करायचा आहे.