TISS Mumbai Bharti 2024 : मुंबईत नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. थेट टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमध्ये (TISS) मुंबई अंतर्गत नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे चालून आली आहे. नुकतीच या भरती प्रक्रियेबद्दल अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत शिक्षकेतर कर्मचारी पदांच्या रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. भरती प्रक्रिया १६ मे रोजीपासून सुरू झाली असून, पदांनुसार पात्र व इच्छुक उमेदवार भरतीसाठी अधिकृत वेबसाइट tiss.edu भेट देऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मे २०२४ आहे. निवड झाल्यानंतर उमेदवारांची वॉक-इन मुलाखत होणार आहे. या भरतीबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ.
रिक्त पदे आणि पदसंख्या –
पार्टनरशिप मॅनेजर पद – २ पदे.
तज्ज्ञ संशोधन आणि डेटा विश्लेषण – १ पदे.
वरिष्ठ संवाद सहयोगी – २ पदे.
अर्ज कसा करावा?
पात्र उमेदवारांनी https://bit.ly/CETE-TISS-ApplicationNTS-May2024 अर्ज भरायचा आहे आणि फॉर्म सबमिट केल्यानंतर स्क्रीनशॉट घेऊन, तो cete.recruitment@tiss.edu येथे पाठवायचा आहे.
तुम्हाला पदांबाबत काही प्रश्न असल्यास vijay.jathore@tiss.edu, mahesh.ghule@tiss.edu आणि sudheer.reddy@tiss.edu तुम्ही येथे ईमेल करू शकता.
अर्ज किंवा फॉर्म सबमिट करताना उमेदवारांनी ईमेलच्या Subject मध्ये पदाचे नाव लिहावे.
उमेदवारांना लिखित / वैयक्तिक संवाद कौशल्यासाठी उपस्थित राहण्यासाठी ई-मेलद्वारे सूचित केले जाईल.
तसेच TISS, मुंबई येथे परीक्षा (ऑनलाइन/ऑफलाइन) घेतली जाणार आहे.
मुलाखत कधी होईल ?
उमेदवारांना ५ ते २० जून २०२४ दरम्यान मुलाखतीसाठी बोलावले जाऊ शकते.
निवडलेल्या उमेदवारांना १५ दिवसांच्या आतमध्ये TISS, मुंबई येथे जॉईन व्हावे लागेल.
अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिसूचना व अधिकृत वेबसाईट तपासून घ्यावी.
अधिसूचना लिंक – https://tiss.ac.in/uploads/files/CETE_Advt_Non-teaching_Multiple_Positions_16_May_2024_Final.pdf
अधिकृत वेबसाईट लिंक – tiss.edu
अधिसूचना काळजीपूर्वक वाचून उमेदवारांनी या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करायचा आहे.