TCIL recruitment 2024 : टेलिकम्युनिकेशन्स कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड अंतर्गत सध्या ‘कार्यकारी संचालक’ [Executive Director] या पदासाठी नोकरीची भरती करण्यात येणार आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता, पात्रता निकष आणि अर्ज कसा करावा याची माहिती पाहावी. तसेच, अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे याबद्दल जाणून घ्यावे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

TCIL recruitment 2024 : पद आणि पदसंख्या

टेलिकम्युनिकेशन्स कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड अंतर्गत कार्यकारी संचालक [E9-IDA] या पदासाठी एकूण १ रिक्त जागेवर भरती करण्यात येणार आहे.

TCIL recruitment 2024 : शैक्षणिक पात्रता

कार्यकारी संचालक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन / IT / कॉम्प्युटर्स सायन्स संबंधित क्षेत्रातील B.E./B.TECH/M.TECH/MCA शिक्षण असावे.
अथवा
कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून चार वर्षाचे B.SC [इंजिनियरिंग] शिक्षण असणे आवश्यक आहे.

हेही वाचा : COEP Pune recruitment 2024 : पुणे शहरात नोकरीची संधी! पाहा अधिक माहिती

TCIL recruitment 2024 : वेतन

कार्यकारी संचालक या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारास १ लाख ५० हजार ते ३ लाख रुपयांदरम्यान वेतन देण्यात येईल.

TCIL recruitment 2024 – टेलिकम्युनिकेशन्स कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड अधिकृत वेबसाईट लिंक –
https://www.tcil.net.in/index.php

TCIL recruitment 2024 – अधिसूचना लिंक –
https://www.tcil.net.in/docs/career/13062024.pdf

TCIL recruitment 2024 : अर्ज आणि अर्ज प्रक्रिया

कार्यकारी संचालक या पदासाठी नोकरी करण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी नोकरीचा अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
या नोकरीचा अर्ज पाठवण्यासाठी उमेदवार खालील पत्त्याचा वापर करू शकतात.

अर्ज पाठवण्याचा पत्ता – मुख्य महाव्यवस्थापक (एचआर), दूरसंचार सल्लागार इंडिया लि., टीसीआयएल भवन, ग्रेटर कैलास-I, नवी दिल्ली – ११००४८

उमेदवारांनी नोकरीचा अर्ज पाठवण्याआधी नोकरीची अधिसूचना व्यवस्थित वाचून घ्यावी.
नोकरीचा अर्ज पाठवताना उमेदवारांनी अर्जात सर्व आवश्यक आणि अचूक माहिती भरावी. तसेच, अर्जासह सर्व आवश्यक कागदपत्रे जोडावी.
अर्ज पाठवणाऱ्या उमेदवारांनी नोकरीचा अर्ज अंतिम तारखेआधी पाठवणे अनिवार्य आहे.
नोकरीचा अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख ही १० जुलै २०२४ अशी आहे.

वरील नोकरीसंबंधी उमेदवारास अधिक माहिती हवी असल्यास त्यांनी टेलिकम्युनिकेशन्स कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेडच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी. अथवा नोकरीची अधिसूचना वाचावी. वेबसाईट लिंक आणि अधिसूचना वर नमूद केलेली आहे.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tcil recruitment 2024 telecommunications consultants india limited hiring how to apply check out dha
Show comments