TCS Q4 Results: जगभरातील अनेक मोठ्या कंपन्यांनी आर्थिक मंदीमुळे नोकरकपात सुरु केली आहे. त्यामुळे अनेक कंपन्यांनी लाखो कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं आहे. शिवाय अनेक कामगारांच्या नोकऱ्या धोक्यात असल्याचं बोललं जात आहे. एकीकडे नोकरकपात सुरु असताना आता नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी देशातील सर्वात मोठी आयटी एक्सपोर्टर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने (TCS) आनंदाची बातमी दिली आहे. कारण TCS ने Q4 चा निकाल जाहीर झाल्यानंतर एका मोठी घोषणा केली आहे. कंपनीचे मुख्य मानव संसाधन अधिकारी मिलिंद लक्कड यांनी सांगितले की, कंपनी २०२३-२४ या आर्थिक वर्षात तब्बल ४० हजार फ्रेशर्सना कामावर घेण्याची योजना आखत आहे. त्यामुळे येत्या काळात अनेक फ्रेशर्सना नोकरी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

४४ हजार फ्रेशर्सना संधी –

लक्कड म्हणाले की, २०२२-२३ या आर्थिक वर्षात कंपनीने ४४ हजार फ्रेशर्सना कामावर घेतले. याशिवाय अनुभवी व्यावसायिकांची विक्रमी नियुक्ती करण्यात आली आहे. कंपनीने सांगितले की, ऑफर केलेल्या सर्व फ्रेशर्सना कंपनीकडून नक्की नोकरी मिळेल. ऑन बोर्डिंग प्रक्रिया पूर्ण केली जाईल. विप्रो, LTIMindtree सारख्या इतर IT कंपन्या ऑनबोर्डिंगला विलंब करत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत.

एकूण कर्मचारी ६ लाख १४ हजार ७९५ –

लक्कड पुढे म्हणाले की, आर्थिक वर्ष २०२३ मध्ये नेट आधारावर २२ हजार ६०० हेडकाऊंट वाढला असून आता तो एकूण ६ लाख १४ हजार ७९६ एवढा झाला आहे. कंपनीने ५३ हजारांहून अधिक क्लाउड प्रमाणपत्रांचा आकडा ओलांडल्याचे सांगितले. तर ऑर्गेनिक टॅलेंट डेवलपमेंटचा एकूण आकडा १ लाख १० हजारांच्या पुढे गेला आहे.

नोकऱ्यांमध्ये फ्रेशर्सना मोठी मागणी –

नोकरभरतीची प्रक्रिया संथ गतीने होणे गजरंच आहे. सध्या ०-३ वर्षांचा अनुभव असलेल्या कर्मचार्‍यांची भरती केली जात आहे. चौथ्या तिमाहीत प्रॉफिट ऑफ्टर टॅक्स म्हणजेच PAT १४.८ टक्क्यांच्या वाढीसह ११ हजार ३९२ कोटी रुपये झाला आहे. वार्षिक आधारावर १६.९ टक्क्यांच्या वाढीसह महसूल ५९ हजार १६२ कोटी रुपये राहिला आहे.

Story img Loader