सीएसआयआर – नॅशनल एअरोस्पेस लॅबोरेटरीज ( CSIR- NAL) (विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत एक स्वायत्त संस्था) ४३ टेक्निकल असिस्टंट पदांची थेट भरती.
पदाचे नाव – टेक्निकल असिस्टंट ( TA) – ४३ पदे (खुला – १५, इमाव – १२, अजा – ६, अज – ५, ईडब्ल्यूएस – ३, दिव्यांग VH – १, दिव्यांग HH – १) (यात दिव्यांग OH – १ पद राखीव आहे.)
स्ट्रीमनिहाय टेक्निकल असिस्टंट पदांचा तपशिल –
(१) Post Code – TA-१०१ – इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनीअरिंग – ६ पदे
(२) TA-१०२ – मेकॅनिकल इंजिनीअरिंग – १६ पदे
(३) TA-१०३ – केमिकल इंजिनीअरिंग – १ पद
(४) TA-१०४ – कॉम्प्युटर सायन्स इंजिनीअरिंग – ७ पदे
(५) TA-१०६ – सिव्हील इंजिनीअरिंग – २ पदे
(६) TA-१०७ – इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग – ३ पदे
(७) TA-१०९ – मेटॅलर्जी/मेटॅलर्जिकल इंजिनीअरिंग – १ पद
(८) TA-११० – इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग – २ पदे
(९) TA-१११ – एअरक्राफ्ट मेंटेनन्स – २ पदे
(१०) TA-११२ – इन्स्ट्रूमेंटेशन इंजिनीअरिंग – १ पद
पद क्र. १ ते १० साठी पात्रता – संबंधित विषयातील इंजिनीअरिंग/टेक्नॉलॉजी डिप्लोमा किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण आणि संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान २ वर्षांचा अनुभव.
पद क्र. ४ आणि ९ साठी संबंधित विषयातील बी.एससी. किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण आणि संबंधित डिसिप्लिनमधील कामाचा किमान १ वर्षाचा अनुभव किंवा १ वर्षाचा पूर्ण वेळ प्रोफेशनल क्वालिफिकेशन असलेले उमेदवारसुद्धा पात्र आहेत.
(११) TA-१०५- मल्टिमिडीया अँड अॅनिमेशन – १ पद (इमाव).
(१२) TA-१०८ – फिजिक्स – १ पद (इमाव)
पद क्र. ११ व १२ साठी पात्रता – संबंधित विषयातील बी.एससी. पदवी किंवा समतूल्य किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण आणि संबंधित डिसिप्लिनमधील कामाचा किमान १ वर्षाचा अनुभव किंवा १ वर्ष कालावधीचे पूर्ण वेळ प्रोफेशनल क्वालिफिकेशन.
वयोमर्यादा – (दि. ११ एप्रिल २०२५ रोजी) २८ वर्षे , वेतन श्रेणी – लेव्हल-६ (रु. ३५,४०० – १,१२,४००) अंदाजे वेतन दरमहा रु. ७०,०००/-, निवड पद्धती – शॉर्ट लिस्टेड उमेदवारांना ट्रेड टेस्टसाठी बोलाविण्यात येईल. ट्रेड टेस्ट उत्तीर्ण करणाऱया उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी बोलाविले जाईल. अंतिम निवड लेखी परीक्षेतील गुणवत्तेनुसार केली जाईल., लेखी परीक्षा ओएमआर बेस्ड किंवा कॉम्प्युटर बेस्ड ऑब्जेक्टिव्ह टाईप २०० प्रश्न, एकूण वेळ ३ तास. अर्जाचे शुल्क – रु. ५००/-.
अर्जाचे शुल्क भरण्यासाठी उमेदवारांनी State Bank Collect Web Page ( https:// www. onlinesbi. sbi/ sbicollect) वर Log on करून करावयाचे आहे. ऑनलाइन अर्ज https:// www. nal. res. in या वेबसाईटवर दि. ११ एप्रिल २०२५ (१७.०० वाजे) पर्यंत करावेत.
‘एअरपोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया’मध्ये भरती
एअरपोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया ( AAI) (मिनीरत्न पब्लिक सेक्टर एंटरप्राईज) पश्चिम विभाग मुख्यालय, मुंबई. महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि गोवा राज्यातील रहिवासी उमेदवारांची ‘ज्युनियर/सिनिअर असिस्टंट’ पदांची थेट भरती. एकूण रिक्त पदे – २०६. (१) ज्युनियर असिस्टंट (फायर सर्व्हिस) ( NE-०४) – १६८ पदे
पात्रता – ( i) मेकॅनिकल/ऑटोमोबाईल/फायर इंजिनीअरिंग डिप्लोमा किंवा १२ वी उत्तीर्ण. ( ii) ड्रायव्हिंग लायसन्स
(२) सिनियर असिस्टंट (ऑपरेशन्स) ( NE-०६) – ४ पदे
पात्रता – पदवी उत्तीर्ण आणि व्हॅलिड LMV ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक. (मॅनेजमेंटमधील डिप्लोमा असल्यास प्राधान्य देण्यात येईल.) आणि संबंधित कामाचा २ वर्षांचा अनुभव आवश्यक.
(३) सिनियर असिस्टंट (इलेक्ट्रॉनिक्स) ( NE-०६) – २१ पदे
पात्रता – इलेक्ट्रॉनिक्स/टेलिकम्युनिकेशन/रेडिओ इंजिनीअरिंग डिप्लोमा.
अनुभव – संबंधित क्षेत्रातील कामाचा २ वर्षांचा अनुभव आवश्यक.
(४) सिनियर असिस्टंट (अकाऊंट्स) ( NE-०६) – ११ पदे
पात्रता – पदवी उत्तीर्ण (शक्यतो B. Com.) आणि MS- Office कॉम्प्युटर लिटरसी टेस्ट. अनुभव – संबंधित क्षेत्रातील कामाचा २ वर्षांचा अनुभव आवश्यक.
(५) सिनियर असिस्टंट (ऑफिशियल लँग्वेज) ( NE-०६) – २ पदे (इमाव – १, खुला – १). पात्रता – हिंदी विषयातील पदव्युत्तर पदवी. (पदवी स्तरावर इंग्लिश विषय अभ्यासलेला असावा.) किंवा इंग्लिश विषयातील पदव्युत्तर पदवी. (पदवी स्तरावर हिंदी विषय अभ्यासलेला असावा.) किंवा कोणत्याही विषयातील (हिंदी/इंग्लिश विषय वगळता) पदव्युत्तर पदवी. (पदवीला हिंदी किंवा इंग्लिश माध्यम असावे किंवा हिंदी आणि इंग्लिश विषय पदवीला अभ्यासलेले असावेत.) किंवा हिंदी आणि इंग्लिश विषयांसह पदवी किंवा हिंदी/इंग्लिशपैकी एका माध्यमातील पदवी आणि हिंदीतून इंग्लिश आणि इंग्लिशमधून हिंदी भाषांतराचा डिप्लोमा/सर्टिफिकेट कोर्स किंवा ट्रान्सलेशन कामाचा २ वर्षाचा अनुभव. ( MS- Office कॉम्प्युटर लिटरसी टेस्ट)
अनुभव – संबंधित क्षेत्रातील कामाचा २ वर्षांचा अनुभव आवश्यक.
वयोमर्यादा – दि. २४ मार्च २०२५ रोजी १८ ते ३० वर्षे. शंमासमाधानासाठी हेल्प डेस्क नंबर – ०२२-६१३०६२५८ अर्जाचे शुल्क – रु. १,०००/-.
ऑनलाइन अर्ज www. aai. aero वेबसाईट वरील ‘ CAREERS’ टॅबमधील लिंकवरून २४ मार्च २०२५ पर्यंत करावेत. या भरतीविषयी माहिती https:// www. aai. aero/ en/ careers/ recruitment वर वेळोवेळी उपलब्ध करून दिली जाईल.
suhaspatil237 @gmail. com