Thane Mahanagarpalika Recruitment 2024: ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्यास इच्छूक उमेदवारांना संधी मिळणार आहे. विविध रिक्त पदांसाठी ठाणे महापालिकेने अर्ज मागवले आहेत. या मोहिमेंतर्गत एकूण ६३ जागावर भरती होणार आहे. या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण ठाणे आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार २६, ३० सप्टेंबर आणि ०३, ०४ ऑक्टोबर २०२४ रोजी दिलेल्या नमूद पत्त्यावर वॉक-इन मुलाखतीला उपस्थित राहू शकतात.

ठाणे महापालिकेने ही भरती छत्रपती महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये खालील पदासाठी होणार आहे. ही कंत्राटी पद्धतीने एकत्रित वेतनावर १७९ दिवसांच्या कालवधीसाठी होणार आहे.

Thane Mahanagarpalika Vacancy 2024 :कोणत्या पदांसाठी होणार भरती

या भरती मोहिमेंतर्गत शस्त्रक्रिया सहाय्यक, न्हावी, ड्रेसर, वॉर्डबॉय, दवाखाना आया, पोस्टमार्टम अटेंडन्ट, मॉच्युरी अटेंडन्ट या पदांसाठी रिक्त जागांवर भरती होणार आहे.

पदाचे नाव पद संख्या
शस्त्रक्रिया सहाय्यक – १५
न्हावी ०२
ड्रेसर १०
वॉर्डबॉय ११
दवाखाना आया १७
पोस्टमार्टम अटेंडन्ट ०४
मॉच्युरी अटेंडन्ट ०४

Thane Mahanagarpalika Vacancy 2024 : वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी ३८ वर्ष आणि मागासवर्गीय प्रवर्गासाठी ४३ वर्ष आहे.

हेही वाचा –इंडिया EXIM बँकेत नोकरीची संधी! मॅनेजमेंट ट्रेनीच्या ५० पदांसाठी होणार भरती, जाणून घ्या पात्रता-निकष अन् अर्ज प्रक्रिया

Thane Mahanagarpalika Recruitment 2024 : शैक्षणिक पात्रता (Educational Qualification )

  • शस्त्रक्रिया सहाय्यक या पदासाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिलेल्या शिक्षण मंडळाची, उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा विज्ञान शाखेतील जीवशास्त्र विषयासह उत्तीर्ण असावा. उमेदवाराकडे शासन मान्यताप्राप्त संस्थेकडील ओ.टी.टेक्नॉलॉजी मधील पदविका असणे आवश्यक आहे. तसेच मान्यताप्राप्त विद्यापीठाची ओ.टी.टेक्नॉलॉजीमध्ये पदवी असल्यास त्याला प्राधान्य दिले जाईल. उमेदवाराकडे शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्था/ खाजगी संस्थेच्या हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया सहायक अथवा समान कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव असावा आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
  • न्हावी या पदासाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिलेल्या शिक्षण मंडळाची, माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण (S.S.C.) असावा. उमेदवाराकडे शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्था/ खाजगी संस्थेमध्ये न्हावी (बार्बर) अथवा समकक्ष कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव असावा आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
  • ड्रेसर या पदासाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिलेल्या शिक्षण मंडळाची, माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण (S.S.C.) असावा. उमेदवाराकडे शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडील ड्रेसर अभ्यासक्रम पूर्ण व नंतर एन.सी.टी.व्ही.टी.चे प्रमाणपत्र आवश्यक आहे. उमेदवाराकडे शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्था/ खाजगी संस्थेच्या हॉस्पिटलमध्ये ड्रेसर या कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव असावा. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
  • वॉर्डबॉय या पदासाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिलेल्या शिक्षण मंडळाची, माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण (S.S.C.) असावा. उमेदवाराकडे शासनमान्य संस्थेकडील रुग्ण सहायक प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण असल्यास त्याला प्राधान्य दिले जाईल. उमेदवाराकडे शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्था/ खाजगी संस्थेच्या हॉस्पिटलकमध्ये वॉर्डबॉय या कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव असला पाहिजे. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
  • दवाखाना आया या पदासाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिलेल्या शिक्षण मंडळाची, माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण (S.S.C.) असावा. उमेदवाराकडे शासनमान्य संस्थेकडील रुग्णवैद्यकीय प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण असल्यास त्याला प्राधान्य दिले जाईल. उमेदवाराकडे शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्था/ खाजगी संस्थेच्या हॉस्पीटलकडील दवाखाना आया या कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव असावा. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
  • पोस्टमार्टम अटेंडन्ट या पदासाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिलेल्या शिक्षण मंडळाची, माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण (S.S.C.) असावा. उमेदवाराकडेपोस्ट मार्टम कामाचा एक वर्षाचा अनुभव आहे आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
  • मॉच्युरी अटेंडन्ट या पदासाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिलेल्या शिक्षण मंडळाची, माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण (S.S.C.) असावा. पोस्ट मार्टम कामाचा एक वर्षाचा अनुभव आहे. तसेच मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.

Thane Mahanagarpalika Recruitment 2024 : वेतन तपशील (Salary Details)

या भरती मोहिमेंतर्गत शस्त्रक्रिया सहाय्यक, न्हावी, ड्रेसर, वॉर्डबॉय, दवाखाना आया, पोस्टमार्टम अटेंडन्ट, मॉच्युरी अटेंडन्ट या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना महिना २०,००० रुपये /- मानधन मिळेल.

अधिसुचना – https://thanecity.gov.in/tmc/cache/1/20-Sep-24/EIP/EIP_PUBLIC_NOTICES/HOME_PAGE/1726834992913/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%2007%20%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97.pdf

हेही वाचा – RRC NCR Recruitment 2024: रेल्वेत १६७९ रिक्त पदांची भरती; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा

Thane Mahanagarpalika Recruitment 2024 : निवड प्रक्रिया (Selection Process )

वरील पदांकरीता इच्छूक उमेदवारांची निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीकरिता २६, ३० सप्टेंबर आणि ०३, ०४ ऑक्टोबर २०२४ रोजी तारखेला सकाळी ११.०० ते दुपारी २.०० वाजून दिलेल्या पत्त्यावर हजर राहणे अनिवार्य आहे.

Thane Mahanagarpalika Recruitment 2024: मुलाखतीचा पत्ता – कै.अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे</p>