Thane Mahanagarpalika Recruitment 2024 नोकरी शोधणाऱ्यांसाठी एक सुवर्ण संधी आली आहे. तुम्ही जर नोकरी शोधत असाल आणि तुमच्याकडे आवश्यक पात्रता असेल, तर तुम्ही ही मोठी संधी तुमच्यासाठी नक्कीच आहे. ठाणे महापालिकेत दोन रिक्त पदासाठी ही भरती होणार आहे. या भरतीसाठी इच्छुकांना ठाण्याला जावे लागणार आहे. यावेळी थेट मुलाखत होणार असून निवडप्रक्रिया पार पडणार आहे. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया.

सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांची सेवा करार पद्धतीने विवक्षित कामांसाठी ही कंत्राटी पद्धतीची भरती आहे. ठाणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील कार्यरत/सेवानिवृत कर्मचाऱ्यांचे सातवा वेतन संलग्न प्रकरणे, आश्वासित प्रगती योजना अंमलबजावणी तसेच लेखा व आस्थपना विषयक इत्यादी कामकाजाबाबत सखोल अनुभव असणारे अनुभवी वर्ग-२ मधील सेवानिवृत्त अधिकाऱ्याच्या सेवेची आवश्यकता असल्याने, अशी सेवा सहा महिने कालावधीसाठी उपलब्ध करुन घेणेकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे.

एकूण रिक्त पदे: ०२

पदाचे नाव: कार्यालयीन अधीक्षक/ कार्यालयीन उपअधीक्षक अथवा समक्षक पद

शैक्षणिक पात्रता: मान्यता प्राप्त विद्यापिठाची पदवी.

मुलाखतीची तारीख: ०१ ऑक्टोबर २०२४

पात्रतेचा निकष

१. मान्यता प्राप्त विद्यापिठाची पदवी.
२. शासकीय/निमशासकीय/स्थानिक स्वराज्य संस्था येथे वर्ग -२ चे पदावर प्रशासकीय कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव, असणे आवश्यक आहे.
३. लेखा विभागातील सेवानिवृत्त वेतन विषयक कामाचा अनुभव आवश्यक.
४. ठाणे महानगरपालिकेतुन सेवानिवृत्त झालेल्या व ठामपा क्षेत्रात वास्तव्यास असलेल्यांना

निवड प्रक्रिया: मुलाखत.

नोकरी ठिकाण: ठाणे. पात्र व इच्छूक उमेदवारांची कै.अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह,स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जवरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखडी, ठाणे येथे दिनांक ०१/१०/२०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता थेट मुलाखतीस उपस्थित रहावे.

हेही वाचा >> BOB Recruitment 2024: बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची संधी; अर्ज करण्याची शेवटची तारीख आणि अर्जप्रक्रिया जाणून घ्या

अधिसूचना –

सदरची सेवा निव्वळ सहा महिन्याच्या कालावधीकरिता कंत्राटी पध्दतीने घेण्यात येणार असून सवेचा कार्यकाळ सहा महिन्याचा असेल, उक्त सेवेकरीता मासिक परिश्रमिक हे शासन निर्णयामध्ये नमूद परिशिष्ट-अ नुसार अदा करण्यात येईल. तसेच उक्त शासन निर्णयानुसार इच्छूक उमेदवाराची कोणतीही विभागीय चौकशीची कारवाई चालू किंवा प्रस्तावित नसावी.