ठाणे महानगरपालिकेमध्ये ७० जागांसाठी भरती होणार आहे. भरतीची अधिसुचना जाहीर करण्यात आली आहे. ही भरती प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि अधिव्याख्याता( Lecturers) या पदांकरिता एकत्रित वेतवावर १७९ दिवसांच्या कालावधीसाठी होणार आहे. पात्र आणि इच्छूक उमेवदारांना ४ जुलै आणि ५ जुलै रोजी थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहावे लागेल.
पदाचा तपशील
प्राध्यापक – ७ जागा
सहयोगी प्राध्यापक – ८ जागा
अधिव्याख्याता( Lecturers) – ५५ जागा
एकूण -७० जागा
मानधन
प्राध्यापक – दरमहा १,८५,०००/- रुपये
सहयोगी प्राध्यापक – १, ७०,०००/-रुपये
अधिव्याख्याता( Lecturers) – १,००,००० /-रुपये
हेही वाचा – IBPS क्लार्क पदासाठी तब्बल ६ हजार जागांसाठीची भरती जाहीर, १ जुलैपासून करु शकता अर्ज, जाणून घ्या सविस्तर
शैक्षणिक पात्रता
प्राध्यापक पदासाठी अर्ज करण्याकरिता पात्र उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून एम.बी.बी.एस., एम. डी., एम.एस., डी.एन.बी. पर्यंतचे शिक्षण असणे आवश्याक आहे. तसेच किमान तीन वर्षाचा अनुभव आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
सहयोगी प्राध्यापक पदासाठी अर्ज करण्याकरिता पात्र उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून एम.बी.बी.एस., एम. डी., एम.एस., डी.एन.बी. पर्यंतचे शिक्षण असणे. तसेच किमान चार वर्षाचा अनुभव आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
अधिव्याख्याता( Lecturers) पदासाठी अर्ज करण्याकरिता पात्र उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून एम.बी.बी.एस., एम. डी., एम.एस., डी.एन.बी. पर्यंतचे शिक्षण असणे. तसेच किमान चार वर्षाचा अनुभव आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी अधिसुचना वाचावी.
हेही वाचा – १० वी पास, ITI उमेदवारांना रेल्वेत नोकरीची संधी! ‘या’ पदांसाठी भरती सुरु, अर्जाची पद्धत जाणून घ्या
आवश्यक कागदपत्रे
उमेदवारांनी मुलाखतीच्या वेळी सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्र स्वयंसाक्षांकित/ प्रामाणित करून दोन प्रति सादर कराव्या.
अधिकृत अधिसुचना : https://thanecity.gov.in/tmc/cache/1/27-Jun-23/EIP/EIP_PUBLIC_NOTICES/HOME_PAGE/1687869072480/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4.pdf
मुलाखतीचे ठिकाण
कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे.