Thane Police Bharti 2024 : ठाणे पोलीस विभागाच्या अंतर्गत रिक्त जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण ६८६ जागा या भरतीच्या अंतर्गत भरल्या जाणार आहेत. तसेच भरतीसाठी इच्छुक व पात्र उमेदवार http://www.Thanepolice.gov.in या अधिकृत वेबसाइटवर अर्ज करू शकतात. अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च २०२४ असणार आहे.
Thane Police Bharti 2024 : भरतीसाठी आवश्यक रिक्त पदे आणि पदसंख्या, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण, शैक्षणिक पात्रता, अर्ज शुल्क, अर्ज कसा करायचा याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊ.
रिक्त पदे व पदसंख्या –
पोलीस शिपाई – ६६६ आणि पोलीस शिपाई चालक- २० या रिक्त पदांसाठी ही भरती मोहीम राबविण्यात येत आहे.
नोकरीचे ठिकाण – ठाणे
शैक्षणिक पात्रता –
पोलीस शिपाई व चालक (ड्रायव्हर) या पदांसाठी उमेदवार १२ वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
वयोमर्यादा –
पोलीस शिपाई – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांचे वय- १८ ते २८ वर्षे; तर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांचे वय १८ ते ३३ वर्षे असावे.
पोलीस शिपाई चालक – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांचे वय – १९ ते २८ वर्षे; तर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांचे वय – १९ ते ३३ वर्षे असावे.
अर्ज शुल्क – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ४५०; तर मागास प्रवर्गासाठी ३५० रुपये शुल्क असणार आहे.
ऑनलाइन फॉर्म भरण्याची लिंक –
policerecruitment2024.mahait.org
निवड प्रक्रिया –
शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा, प्रमाणपत्रांची पडताळणी व वैद्यकीय चाचणीद्वारे उमेदवारांची निवड प्रक्रिया पार पडेल.
अशा प्रकारे इच्छुक उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.