भारतीय विमानतळ प्राधिकरण २०२४ ने (Airport Authority Of India) पदवीधर, डिप्लोमा व आयटीआय (ITI) ॲप्रेंटिसकरितांच्या रिक्त जागांसाठी भरती जाहीर केली आहे. इच्छुक उमेदवार अर्ज करण्यासाठी ३१ जानेवारी २०२४ पर्यंत http://www.aai.aero या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाईन फॉर्म भरू शकतात. विविध पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी विविध पात्रता तपासणे आवश्यक आहे. अर्ज करण्यापूर्वी या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा व रिक्त पदे याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊ.

AAI Recruitment 2024 : रिक्त पदांचे तपशील…

Mumbai airport international travelers
Mumbai Airport International Passengers: मुंबई विमानतळावरून १२ लाख प्रवाशांची आंतरराष्ट्रीय वारी
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
job opportunities direct recruitment in directorate of medical education
नोकरीची संधी : वैद्याकीय शिक्षण संचालनालयात सरळसेवेने भरती
GAIL India Recruitment 2024
GAIL India Recruitment 2024 : सिनिअर इंजिनिअरच्या पदासाठी मागवले अर्ज, १,८०,०००पर्यंत मिळू शकतो पगार
job opportunity in ordnance factory update in marathi
नोकरीची संधी :ऑर्डनन्स फॅक्टरीत भरती
expansion of air india service after merger of vistara
विस्तारा’च्या विलीनीकरणातून एअर इंडियाच्या सेवेत विस्तार; विमानांचा ताफा ३०० वर, तर साप्ताहिक उड्डाणे ८,५०० वर
KTCL Goa Bharti 2024 Job Opportunity in KTCL Recruitment
KTCL Goa Bharti 2024 : KTCLमध्ये नोकरीची संधी! कंडक्टरच्या ७० पदांसाठी होणार भरती, १०वी पास उमेदवार करू शकतात अर्ज

१३० पदवीधर /डिप्लोमा/ आयटीआय या शिकाऊ उमेदवारांच्या रिक्त जागांसाठी भरती करण्यात येणार आहे.

पदवीधर : एरोनॉटिकल, ऑटोमोबाईल, आर्किटेक्चर, सिव्हिल, कॉम्प्युटर सायन्स, डेटा ॲनालिसिस, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, आयटी, मेकॅनिकलमधील बीई/बीटेक.

एकूण पदसंख्या : ३०.

डिप्लोमा : एरोनॉटिक्स, ऑटोमोबाईल, आर्किटेक्चर, सिव्हिल, कॉम्प्युटर सायन्स, डेटा ॲनालिसिस, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, आयटी, मेकॅनिकल, गणित/सांख्यिकी.

एकूण पदसंख्या : ४५.

आयटीआय (ITI) ट्रेड : संगणक ऑपरेटर प्रोग्रामिंग असिस्टंट, इलेक्ट्रिकल, मेकॅनिक, इलेक्ट्रॉनिक्स, स्टेनो.

एकूण पदसंख्या : ५५.

हेही वाचा…दहावी, बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षांबाबत राज्य मंडळाचा मोठा निर्णय…

AAI Recruitment 2024 : शैक्षणिक पात्रता

उमेदवारांकडे विद्यार्थी म्हणून AICTE, GOI द्वारे प्राप्त पदवीधर किंवा डिप्लोमामध्ये पूर्ण वेळ (नियमित) चार वर्षांचा किंवा तीन वर्षांचा तरी अभियांत्रिकी डिप्लोमा केलेला असावा. तसेच उमेदवारांकडे AICTE आणि GOI या संस्थांकडून नमूद केलेल्या ट्रेडमध्ये आयटीआय/एनसीव्हीटी (ITI/NCVT) प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

AAI Recruitment 2024 : वयोमर्यादा आणि अर्ज शुल्क

भरतीसाठी किमान १८ आणि कमाल २६ वर्षे वयोमर्यादा आहे. तसेच लक्षात ठेवा की, भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून भरती २०२४ साठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही.