BARC Mumbai Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. थेट सरकारी नोकरी मिळविण्याची संधी आहे. भाभा अणुसंशोधन केंद्र, मुंबई अंतर्गत रिक्त जागांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. ५० रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे. तसेच इच्छुक उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑफलाइन सादर करायचे आहेत. भरती प्रक्रिया २७ मेपासून सुरू झाली असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ जून २०२४ असणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख उमेदवारांसाठी पुढे ढकलली आहे. त्यामुळे वेळ वाया न घालविता, उमेदवारांनी या संधीचे सोने करावे. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया आणि भरतीबद्दलची अधिक आणि सविस्तर माहिती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पदाचे नाव – ही भरती प्रक्रिया चालक (ड्रायव्हर) पदांच्या ५० रिक्त जागांसाठी होणार आहे. पण, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे हेवी मोटार व्हेईकल आणि लाइट मोटार व्हेईकल वाहने चालविण्याचे वैध लायसन्स असणे आवश्यक आहे.

शैक्षणिक पात्रता – अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता अधिसूचना वाचून व समजून घ्यावी.

लिंक – https://www.barc.gov.in/careers/vacancy8.pdf

हेही वाचा…Textiles Committee Mumbai Bharti: मुंबईच्या वस्त्रोद्योग समितीत ‘या’ रिक्त पदांसाठी भरती सुरू; अर्ज करण्यासाठी उरलेत काही दिवस

नोकरीचे ठिकाण – निवडलेल्या उमेदवारांचे नोकरीचे ठिकाण मुंबई येथे असणार आहे.

वयोमर्यादा- अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ४० वर्षे असावे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ‘मुख्य प्रशासकीय अधिकारी (कार्मिक) सेंट्रल कॉम्प्लेक्स, भाभा अणुसंशोधन केंद्र, ट्रॉम्बे, मुंबई-४०० ०८५ या पत्त्यावर पाठवायचे आहेत.

अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट एकदा पाहून घ्यावी.

लिंक – https://www.barc.gov.in/

इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालविता, या भरती प्रक्रियेसाठी लगेचच अर्ज करावा. भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर उमेदवारांनी अधिसूचनाही व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा. ७ जून २०२४ नंतर उशिरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The bhabha atomic research centre mumbai recruitment for fifty vacant posts of driver read the notification apply asp