The Chatpata Affairs Owner Shiju Pappen’s Success Story: शिजू पप्पेन यांची उद्योजकीय कहाणी जिद्द आणि चिकाटीची आहे; त्यांच्या करिअरची सुरुवात पिझ्झा हटमध्ये सर्व्हिंग आणि साफसफाई कामगार म्हणून सुरू झाली होती. पण, याच मुलाने अखंड मेहनतीने स्वत:ची कॅफेची चेन सुरू करून कोटींचा व्यवसाय केला.

भारतातील शाकाहारी स्ट्रीट फूडची परंपरा सुरू करणाऱ्या रेस्टॉरंटचे संस्थापक, ‘द चटपाटा अफेयर्स’चे संस्थापक शिजू पप्पेन यांनी एकेकाळी दरमहा रु. ५०००-६००० साठी काम केले आहे. परंतु, आज ते एका कॅफे चेनचे नेतृत्व करत आहेत. संपूर्ण भारतामध्ये या कॅफे चेनचे ५० आउटलेट आहेत. पप्पेन यांचा उद्योजकीय प्रवास अनेकांना यश गाठण्यासाठी आणि त्यांच्या कल्पनेला पंख देण्यासाठी प्रेरणा देणारा आहे.

baba siddique shot dead
“माझा मुलगा पुण्यात भंगारचं काम करायचा, तो मुंबईला…”; बाबा सिद्दीकींची हत्या करणाऱ्या आरोपीच्या आईची प्रतिक्रिया!
18th October 2024 Horoscope In Marathi
१८ ऑक्टोबर पंचांग: नोकरदारांच्या कुंडलीत अच्छे दिन तर…
Shiv Sena (UBT) Chief Uddhav Thackeray Hospitalized at Reliance Hospital for Angioplasty
Uddhav Thackeray Hospitalized : उद्धव ठाकरेंची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
shrikant shinde mahakaleshwar darshan row
खासदार श्रीकांत शिंदेंनी बंदी असूनही केला उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश; विरोधकांची टीका!
saurabh gadgil Success Story
Success Story: भारतातील अब्जाधीशांच्या यादीत पुण्यातील ‘या’ व्यक्तीच्या नावाचा समावेश; १९२ वर्ष जुन्या कंपनीच्या IPO द्वारे झाला अब्जाधीश
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती…”; शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत
justin trudeau on hardeep singh nijjar murder case (1)
“भारतानं एक भयंकर चूक केली ती म्हणजे…”, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडोंचा पुन्हा आरोप; म्हणाले…
IPS Shivdeep Lande Resign
IPS Shivdeep Lande Resign : आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांचा तडकाफडकी राजीनामा; कारण काय?

हेही वाचा… फक्त ८ वी शिकून झाले कोटींचे मालक, प्रसिद्ध कौटुंबिक व्यवसाय सोडला अन्…, वाचा शिवरतन अग्रवाल यांचा प्रेरणादायी प्रवास

सुरुवातीचे जीवन आणि संघर्ष

आपल्या दोन्ही पालकांच्या लवकर झालेल्या मृत्यूनंतर एका लहानशा राजस्थानी शहरात लहानाचे मोठे होत असताना शिजू पप्पेन यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला. पप्पेन १९९७ मध्ये दिल्लीत स्थलांतरित झाले आणि त्यांनी पिझ्झा हटमध्ये साफसफाई आणि सर्व्हिंगसह विविध कामे केली.

“मी जवळजवळ एक वर्षासाठी फक्त ५०००-६००० प्रति महिना रुपये कमवत होतो. भाडे, वीज आणि जेवणाची व्यवस्था करणे या पैशांत कठीण होते. तथापि, मी जे काही कमवत होतो, त्यातच मॅनेज करण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नव्हता,” असे शिजू पप्पेन यांनी स्टार्टअपेडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

‘द चटपटा अफेयर्स’ केलं लॉंच

कमी पगार आणि दैनंदिन खर्च भागवण्याचे आव्हान असतानाही पप्पेन थांबले नाहीत. फास्ट फूड क्षेत्रात त्यांनी वीस वर्षे नोकरी केली. साउदर्न फ्राइड चिकनचे सीईओ म्हणून उल्लेखनीय अनुभवासह आणि त्यातून त्याला मिळालेल्या कौशल्यासह, पप्पेन यांनी स्वतःची कंपनी सुरू करण्याचा निर्णय घेतला. मार्केट रिसर्च करून ते बाजारातील एक महत्त्वाची तफावत ओळखू शकले—भारतीय स्ट्रीट फूडची कमी उपस्थिती. भारतीय स्ट्रीट फूडसाठी प्रचार करण्याच्या महत्त्वाकांक्षेने ‘चटपटा अफेयर्स’ची स्थापना झाली.

हेही वाचा… रतन टाटांच्या एका भेटीने आयुष्य बदललं; परदेशातून परतलेल्या जोडप्यानं मायदेशी कसा उभारला कोटींचा बिझनेस, वाचा

पप्पेन यांनी २०२० मध्ये ‘द चटपटा अफेअर्स’ची स्थापना केली. आपल्या कंपनीला समर्थन देण्यासाठी सुरुवातीला कमी उत्पादनांच्या निवडीसह त्यांनी स्मार्टपणे मोबाइल कार्ट संकल्पना स्वीकारली. कालांतराने त्यांच्या सततच्या मेहनतीमुळे पप्पेन यांच्या व्यवसायात लक्षणीय वाढ झाली. बंगळुरू, चेन्नई, गुडगाव आणि हैदराबाद या महत्त्वाच्या केंद्रांसह त्यांची कंपनी देशभरात आधीच ५० ठिकाणी वाढली आहे. कॅफेची चेन वर्षाला सुमारे आठ कोटी रुपये कमावते.

बिहारच्या क्लासिक लिट्टी चोख्यापासून उत्तर भारतातील लज्जतदार चाटपर्यंत, पप्पेन यांच्या ‘द चटपटा अफेयर्स’च्या मेनूमध्ये सुमारे २०० पदार्थ आहेत. पप्पेन यांची महत्त्वाकांक्षा मोठी आहे. भारतीय स्ट्रीट फूडसह त्यांना पिझ्झा आणि बर्गरसारख्या आंतरराष्ट्रीय स्टेपल्सशी स्पर्धा करण्याची आशा आहे. “समोसे आणि चाट हे बर्गर आणि पिझ्झा सारख्याच आकर्षणास पात्र आहेत,” यावर त्यांनी मुलाखतीत जोर दिला.