डिजिटल माध्यमांवरील आशय व कलाकृतींमुळे स्थानिक भाषांना एक वेगळा लहेजा प्राप्त झाला आहे, या वाहिनींवरील आशय हा लोकांच्या पसंतीस पडत आहे. यूटय़ूब या माध्यमाचे स्वरूप समजून घेणे महत्त्वाचे आहे. या माध्यमावर नि:शुल्कप्रमाणे आपल्या आवडीप्रमाणे आशय पाहायला मिळतो. त्यामुळे, हे दुसरे सर्वात मोठे सर्च इंजिन आहे. इतर आशय निर्मात्यांसोबतही तुम्हाला काम करण्याची संधी उपलब्ध होते. यूटय़ूब हे माध्यम तुम्हाला पैसे दाखविण्याचे पैसे देते. यूटय़ूबवरील आशयाचे विविध प्रकार आहेत. ट्रेंडी आशय म्हणजे जी घटना घडली आहे किंवा त्याबाबत घडामोडी घडत आहेत, त्यावर व्हिडिओ तयार करणे, तुमच्या ज्ञानात भर पाडणारे शैक्षणिक आशय, काल्पनिक आशय, व्हिडिओ पॉडकास्ट आदी प्रकार आहेत. तुम्ही एखाद्या विषयावर तुमचा वैयक्तिक दृष्टिकोन मांडता, म्हणजे व्लॉिगग होय. तुमच्या दैनंदिन जीवनाशी निगडित व्हिडिओ अपलोड करणे म्हणजे व्लॉिगग नाही. तुम्ही तयार केलेला व्हिडिओ एखाद्याच्या आयुष्यात बदल घडणार आहे का? जर बदल घडणार असेल, तरच तो व्हिडिओ चालेल आणि प्रेक्षकांच्या पसंतीस पडेल. स्वत:च्या दृष्टिकोनातून प्रवास मांडणे म्हणजे व्लॉिगग. प्रेक्षकांना तुमच्या व्हिडिओशी शेवटपर्यंत गुंतवून ठेवणे महत्त्वाचे असते. यूटय़ूब वाहिनी का सुरू करायची आहे, नेमका काय उद्देश आहे, याबाबत तुमच्या मनात स्पष्टता हवी. त्यामुळे तुमची आशय निर्मितीची संकल्पना स्पष्ट होते. तुमच्या संकल्पना स्पष्ट असणे महत्त्वाचे आहे, कारण शब्दांचा गोंधळ हा नेहमी विचारांचा गोंधळ असतो.

एकदाच व्हायरल व्हिडिओ तयार करून काही होणार नाही, दर आठवडय़ाला तुम्हाला सतत नवीन देत राहायचे आहे. आठवडय़ाला किमान एक व्हिडिओ अपलोड करावा. एकदा तुम्ही प्रेक्षकांना बांधून ठेवले, तर त्यानंतर हा कनेक्ट तुटता कामा नये. कारण, एकदा प्रेक्षक तुमच्या वाहिनीपासून दुरावले तर त्यांना तुमचे व्हिडिओज पाहण्यात रस उरणार नाही. यूटय़ूब वाहिनी चालवताना सर्जनशीलता, तांत्रिकपणा व व्यवसाय कौशल्ये हे गुण तुमच्यात असले पाहिजेत. हे गुण जर तुम्ही शिकलात तर यूटय़ूब वाहिनी या तुम्हाला नोकरी देऊ शकतात. सर्जनशीलतेमध्ये संकल्पना, विषय, संहिता, चित्रीकरण, संकलन, विपणन यांचा समावेश होतो. तांत्रिकपणात प्लॅटफॉर्म अंडरस्टँिडग, एसइओ, शॉट डिव्हिजन, संकलन, अपलोिडग तर व्यवसाय विभागात तुमचा ब्रॅण्ड मजबूत करणे, शाश्वत उत्पन्न तयार करणे आणि प्रगतपणाचा समावेश होतो. तुमच्या विचारात स्पष्टता येणे, अभिनय किंवा आवाजाचे प्रशिक्षण, चांगला आशय हा वाचत, ऐकत आणि पाहत रहा, लोकांशी बोला, दररोज लेखन करा आणि व्यक्त व्हा या गोष्टींचा तुम्हाला खूप फायदा होईल. नियोजन, संहिता लेखन, चित्रीकरण, संकलन, अपलोिडग आणि प्रसिद्धी हे यूटय़ूब व्हिडिओ तयार करण्याचे महत्त्वाचे टप्पे आहेत. यूटय़ूब या माध्यमांत स्वत:हून पैसे कमावण्यासह इतर नोकरीच्या संधीही उपलब्ध आहेत. लेखक – संशोधक, व्हिडिओग्राफर, संकलक, समाजमाध्यम व्यवस्थापक व तांत्रिक व्यवस्थापन प्रमुख, ग्राफिक डिझायनर, व्यवसाय व्यवस्थापक, दिग्दर्शक – निर्माता अशा संधी उपलब्ध आहेत. यूटय़ूब वाहिनीवरून पैसे कमावण्याचीही एक पद्धत आहे. तुमचा व्हिडिओ किती तास पाहिला गेला आहे आणि व्हिडिओच्या माध्यमातून दाखविण्यात येणाऱ्या जाहिरातींमुळेही पैसे दिले जातात.

More Stories onकरिअरCareer
मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The concept behind starting a youtube channel should be clear sukirta gumaste amy
First published on: 20-06-2024 at 03:58 IST