CCI Recruitment 2024: कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (CCI) येथे असिस्टंट मॅनेजर, मॅनेजमेंट ट्रेनी, ज्युनिअर कमर्शिअल एक्झिक्युटिव्ह आणि ज्युनिअर असिस्टंट या पदांच्या विविध पदांसाठी एकूण २१४ रिक्त जागांसाठी ही भरती आयोजित करण्यात आली आहे. ही अधिसूचना ११ जून २०२४ रोजी अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच इच्छुक आणि पात्र उमेदवार – https:// cotcorp. org. या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रिया १२ जून २०२४ पासून सुरू झाली असून अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २ जुलै असणार आहे. भरतीसाठी आवश्यक माहिती म्हणजेच रिक्त पदे, शैक्षणिक पात्रता, अर्ज कसा करायचा याबद्दल सविस्तर जाऊन घेऊ या…

CCI Recruitment 2024: रिक्त पदे, पदसंख्या, शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा

Sharad Pawar NCP Complete Candidate List in Marathi
Sharad Pawar NCP Candidate List: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सर्व उमेदवारांची यादी, एकूण ८६ उमेदवार मैदानात
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
NCP Ajit Pawar Candidates
Full List of NCP AP Candidates : अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांची यादी एका क्लिकवर, कोणाला कुठून उमेदवारी?
GAIL India Recruitment 2024
GAIL India Recruitment 2024 : सिनिअर इंजिनिअरच्या पदासाठी मागवले अर्ज, १,८०,०००पर्यंत मिळू शकतो पगार
Mega Housing Lottery application process, entension, CIDCO
सिडकोच्या २६ हजारांच्या महागृहनिर्माण सोडत प्रक्रियेला महिन्याभराची मुदतवाढ
job opportunity in ordnance factory update in marathi
नोकरीची संधी :ऑर्डनन्स फॅक्टरीत भरती
Nurses without pay for four months Mumbai print news
परिचारिका चार महिने वेतनाविना
KTCL Goa Bharti 2024 Job Opportunity in KTCL Recruitment
KTCL Goa Bharti 2024 : KTCLमध्ये नोकरीची संधी! कंडक्टरच्या ७० पदांसाठी होणार भरती, १०वी पास उमेदवार करू शकतात अर्ज

असिस्टंट मॅनेजर (Legal) – १ पद. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कायद्याची पदवी असावी व या उमेदवाराचे वय ३२ वर्षापर्यंत असावे.

असिस्टंट मॅनेजर (अधिकृत भाषा) – १ पद. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने हिंदी किंवा इंग्रजी विषयात पोस्ट ग्रॅज्युएशन केलेले असावे व या उमेदवाराचे वय ३२ वर्षापर्यंत असावे.

मॅनेजमेंट ट्रेनी (मार्केटिंग) – ११ पदे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कृषी क्षेत्रात एमबीए केलेले असावे व या उमेदवाराचे वय ३० वर्षापर्यंत असावे.

मॅनेजमेंट ट्रेनी (अकाउंट्स) – २० पदे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने सीए / सीएमए / एमबीए / एम.कॉम / एमएमएस / कॉमर्समध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन) केलेले असावे व या उमेदवाराचे वय ३० वर्षापर्यंत असावे.

ज्युनिअर कमर्शिअल एक्झिक्युटिव्ह – १२० पदे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने ॲग्रीकल्चर विषयात बी.एससी केलेले असावे व या उमेदवाराचे वय २७ वर्षापर्यंत असावे.

ज्युनिअर असिस्टंट (जनरल) – २० पदे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने ॲग्रीकल्चर विषयात बी.एससी केलेले असावे व या उमेदवाराचे वय २७ वर्षापर्यंत असावे.

ज्युनिअर असिस्टंट (अकाउंट्स ) – ४० पदे. या पदासाठी अर्ज करणारे उमेदवार बी.कॉम झालेले असावे व या उमेदवाराचे वय २७ वर्षापर्यंत असावे.

ज्युनिअर असिस्टंट (हिंदी अनुवादक) – १ पद. या पदासाठी अर्ज करणारे उमेदवार हिंदी किंवा इंग्रजी विषयात पोस्ट ग्रॅज्युएशन केलेले असावे व या उमेदवाराचे वय २७ वर्षापर्यंत असावे.

CCI Recruitment 2024: अर्ज फी –

जनरल, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस या उमेदवारांसाठी अर्ज फी १०० रुपये असणार आहे.

एससी / एसटी / ईएसएम / पीडब्ल्यूडी या उमेदवारांसाठी अर्ज फी २५० रुपये असणार आहे.

तसेच सर्व उमेदवारांना अर्ज फी ऑनलाइन भरावी लागणार आहे.

CCI Recruitment 2024: निवड प्रक्रिया –

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराची निवड लेखी परीक्षा, कागदपत्रांची पडताळणी, वैद्यकीय तपासणीद्वारे होईल.

उमेदवार या भरती प्रक्रियेद्वारे थेट अर्ज करू शकतात …

लिंक – https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/1258/89103/Index.html

अर्ज करण्यापूर्वी प्रत्येक उमेदवाराने अधिसूचना काळजीपूर्वक वाचून घ्यावी…

लिंक – https://cdn.digialm.com//per/g01/pub/726/EForms/image/ImageDocUpload/12/1111323155850324371405.pdf