RRC Recruitment 2024 : रेल्वे रिक्रुटमेंट सेल (RRC), उत्तर रेल्वेने भरतीसाठी अधिसूचना प्रकाशित केली आहे. उत्तर रेल्वेवरील विविध विभाग/युनिट्स/कार्यशाळा येथे प्रशिक्षण देण्यासाठी शिकाऊ कायदा १९६१ अंतर्गत ४०९६ ॲक्ट अप्रेंटिसकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. नोव्हेंबर २०२४ मध्ये गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. पात्र व इच्छुक उमेदवार या भरतीसाठी १६ ऑगस्ट ते १६ सप्टेंबरपर्यंत अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज शुल्क किती, रिक्त पदे व पदसंख्या, अर्ज कसा करायचा याबद्दल सविस्तर जाणून घेऊ या…

RRC Recruitment 2024 : रिक्त पदे व पदसंख्या

उत्तर रेल्वे या भरती मोहिमेद्वारे शिकाऊ पदाच्या विविध राज्यांतील एकूण ४,०९५ रिक्त जागा भरणार आहे.

57 lakh worth of goods seized in Nashik district in two days nashik news
नाशिक जिल्ह्यात दोन दिवसात ५७ लाखांचा मुद्देमाल जप्त
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Vanchit Bahujan Aghadi, Bahujan Samaj Party,
आंबेडकरी पक्षांच्या उमेदवारांचा वेलू गगनावरी !
GAIL India Recruitment 2024
GAIL India Recruitment 2024 : सिनिअर इंजिनिअरच्या पदासाठी मागवले अर्ज, १,८०,०००पर्यंत मिळू शकतो पगार
investors of DSK, Maval-Mulshi sub-divisional magistrate, Court, DSK,
‘डीएसके’ यांच्या गुंतवणूकदारांची यादी सादर करण्याचे मावळ-मुळशी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना न्यायालयाचे आदेश
Mega Housing Lottery application process, entension, CIDCO
सिडकोच्या २६ हजारांच्या महागृहनिर्माण सोडत प्रक्रियेला महिन्याभराची मुदतवाढ
job opportunity in ordnance factory update in marathi
नोकरीची संधी :ऑर्डनन्स फॅक्टरीत भरती
article about sudhamma life in forest
व्यक्तिवेध : सुधाम्मा

RRC Recruitment 2024 : शैक्षणिक पात्रता

उमेदवार किमान ५० टक्के गुणांसह १० वी आणि आयटीआय (ITI) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

RRC Recruitment 2024 : वयोमर्यदा

उमेदवराचे वय १५ ते २४ वर्षांपर्यंत असावे.

हेही वाचा…Success Story : वडील अभिनय क्षेत्रात अन् लेकराने निवडला यूपीएससीचा मार्ग; समजून घ्या असा झाला परीक्षा पास होऊन IAS अधिकारी; वाचा प्रवास

अर्ज शुल्क :

उमेदवारांना १०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. तर, एससी (SC), एसटी (ST), ईडब्ल्यूएस (EWS), पीडब्ल्यूडी (PwD) आणि महिला उमेदवारांना शुल्क भरण्यातून सूट देण्यात आली आहे.

अधिसूचना डाउनलोड करा :

शिकाऊ उमेदवारांच्या भरतीसाठी १३ ऑगस्ट रोजी अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे. उमेदवार अधिसूचनेवर क्लिक करू शकतात आणि सर्व माहिती तपासून पाहू शकतात.

लिंक : https://www.rrcnr.org/rrcnr_pdf/Act_Apprentice_2024.pdf

अर्ज कसा करायचा?

पायरी १ : रेल्वे रिक्रूटमेंट सेलच्या (RRC NR) अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

पायरी २ : होमपेजवर दिलेल्या ऑनलाइन अर्ज लिंकवर क्लिक करा.

पायरी ३ : अर्ज भरा आणि सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.

पायरी ४ : अर्ज शुल्क भरा आणि सबमिट करा.

पायरी ५ : पुढील प्रक्रियेसाठी अर्जाची प्रिंटआउट कॉपीही घ्या.

अशा प्रकारे उमेदवाराने या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करायचा आहे.