नाटय़ क्षेत्रातील करिअर करावयाचे आहे! देशातील मुख्य नाटय़ प्रशिक्षण संस्था नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, दिल्ली येथे नाटय़ कलेमध्ये (पूर्ण वेळ निवासी) तीन वर्षीय डिप्लोमा अभ्यासक्रम (२०२३-२०२६) शिकण्याची सुवर्णसंधी. छोटय़ा पडद्यावरील आणि मोठय़ा पडद्यावरील आघाडीचे कलाकार NSD मधून घडलेले आढळतात. शिक्षणाचे माध्यम – हिंदी/ इंग्रजी.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
प्रवेश क्षमता – २९ (अजा – ४, अज – २, इमाव – ७, ईडब्ल्यूएस – ३) (दिव्यांग उमेदवारांना नियमानुसार आरक्षण दिले जाईल.)
पात्रता : (१) पदवी उत्तीर्ण, (२) किमान ६ थिएटर निर्मितीमध्ये सहभाग असावा. (३) हिंदी/इंग्रजीचे कामचलाऊ ज्ञान असावे. (४) किमान एका थिएटर तज्ञाचे शिफारस पत्र.
वयोमर्यादा : दि. १ जुलै २०२२ रोजी १८ ते ३० वर्षे. (कमाल वयोमर्यादेत सूट – इमाव – ३ वर्षे, अजा/अज – ५ वर्षे)
निवड पद्धती : उमेदवारांची निवड दोन स्तरांवर केली जाईल. (१) प्रीलिमिनिअरी एक्झामिनेशन/ऑडिशन, (२) पहिल्या स्तरावर निवडले गेल्यास फायनल एक्झामिनेशन वर्कशॉपला सामोरे जावे लागेल.
(१) प्रीलिमिनिअरी एक्झामिनेशन/ ऑडिशन जुलै २०२३ मध्ये देशभरातील १५ केंद्रांवर घेतली जाईल. ( i) दिल्ली (१८-१९ जुलै), ( ii) बेंगलुरू, चेन्नई, गुवाहाटी, आगरतळा, सिक्कीम (२१-२२ जुलै), (iii) पुणे, भोपाळ, कोलकता, पाटणा, भुवनेश्वर (२४, २५, २६ जुलै), ( iv) चंदिगड, जयपूर, वाराणसी, श्रीनगर (२८, २९, ३० जुलै).
उमेदवारांना पूर्व परीक्षेची नेमकी तारीख ई-मेलद्वारे कळविण्यात येईल, जी NSD च्या वेबसाईटवर जून/ जुलैमध्ये उपलब्ध केली जाईल.
पूर्व परीक्षा (ऑडिशन) उत्तीर्ण करणाऱ्या उमेदवारांना अंतिम ५ दिवसांची परीक्षा जी १६ ते २० ऑगस्ट २०२३ दरम्यान नवी दिल्ली येथे कार्यशाळेसाठी बोलाविले जाईल. कार्यशाळेसाठी जाण्या-येण्याचा प्रवासाचा खर्च तिकीट दाखवून परत मिळू शकेल. याशिवाय दैनिक भत्ता प्रदान करण्यात येईल. राहण्याची ठरऊ मार्फत सोय पुरविली जाईल.
स्टायपेंड : सर्व निवडलेल्या उमेदवारांना दरमहा रु. ९,५००/- स्टायपेंड दिले जाईल.
वैद्यकीय तपासणी : निवडलेल्या उमेदवारांची वेळोवेळी वैद्यकीय तपासणी करण्यात येईल.
शैक्षणिक वर्ष : ३ वर्षांचा शिक्षणक्रम २० आठवडय़ांच्या ६ सेमिस्टर्समध्ये विभागलेला असेल. पहिले ३ सेमिस्टर्स एकत्रितपणे सर्व उमेदवारांना शिकविले जाईल. त्यानंतरचे तीन सेमिस्टर्समध्ये नाटय़ विषयक वेगवेगळी कौशल्ये जसे की, अभिनय (Acting)) डिझाईन आणि डायरेक्शन शिकविले जातील.
डिझाईन आणि डायरेक्शनमधील स्पेशलायझेशनसाठी फक्त ५ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल.
अर्जाचे शुल्क : रु. ५०/-.
ऑनलाइन अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे.
प्रवेश प्रक्रियेच्या विषयी विस्तृत माहितीसाठी http://www.nsd.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ऑनलाइन अर्ज www.nsd.gov. in किंवा http:// http://www.onlineadmission.nsd.gov.in या संकेतस्थळावर दि. १० जुलै २०२३ पर्यंत करावेत.