डॉ. महेश शिरापूरकर

प्रस्तुत लेखामध्ये यूपीएससी मुख्य परीक्षा सामान्य अध्ययन पेपर दोन मधील पंचायती राज व्यवस्था या घटकाची परीक्षाभिमुख तयारी कशी करावी याबाबत आपण चर्चा करणार आहोत. भारतात प्राचीन काळापासून ग्रामपंचायती ग्रामीण जीवनाचा एक भाग होत्या. भारतात वसाहतवादी राजवटीच्या काळात संसदीय शासन पद्धतीचा पाया घातला गेला. तथापि, संसदीय व्यवस्था केंद्रीकरणाकडे झुकलेली आहे, हे स्वातंत्र्य लढय़ातील धुरीणांना ज्ञात होते. त्यातूनच लोकशाही विकेंद्रीकरणाची चर्चा सुरू झाली. महात्मा गांधी यांनी विकेंद्रीकरणाचे प्रारूप म्हणून स्वावलंबी आणि स्वायत्त खेडे हाच केंद्रबिंदू मानला. स्वातंत्र्यानंतर भारतासमोर अनेक समस्या होत्या, त्यातून मार्ग काढण्यासाठी देशव्यापी विकास योजना आखण्यात आल्या. यामध्ये २ ऑक्टोबर १९५२ साली महात्मा गांधी जयंतीपासून समुदाय विकास कार्यक्रम लागू करण्यात आला. ग्रामीण समाजाचा सर्वागीण विकास घडवून आणणे हा समुदाय विकास कार्यक्रमाचा उद्देश होता. समुदाय विकास कार्यक्रम व त्याला पूरक अशी राष्ट्रीय विस्तार सेवा यांचे मूल्यमापन करण्यासाठी बळवंतराय मेहता समिती नियुक्त करण्यात आली. या समितीने सुचविलेल्या त्रिस्तरीय आराखडय़ातून पंचायती राज व्यवस्था निर्माण झाली. २०२२ च्या मुख्य परीक्षेमध्ये पंचायती राज व्यवस्थेच्या कारभारप्रक्रियेविषयी प्रश्न विचारला आहे. उदा. ‘तुमच्या मते, भारतातील सत्तेच्या विकेंद्रीकरणामुळे तळपातळीवरील कारभार प्रक्रियेची परिस्थिती कितपत बदलली आहे?’ (गुण १०, शब्दसंख्या १५०).

article about mpsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र :  राज्य सेवा मुख्य परीक्षा – मानवी हक्क विकासात्मक मुद्दे
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
mpsc exam preparation
MPSC मंत्र : राज्य सेवा मुख्य परीक्षा- मानवी हक्क पारंपरिक अभ्यास
Ajit Pawar
Ajit Pawar : RSS कडून लोकसभेतील पराभवाचं खापर, विचारधाराही वेगळी, तरी महायुतीत का? अजित पवार म्हणाले…
ajit pawar on ravi rana
विनाशकाले विपरीत बुद्धी! ‘त्या’ विधानानंतर अजित पवारांकडून रवी राणांची कानउघडणी; म्हणाले, “देवेंद्र फडणवीसांनी त्यांना…”
maharashtra assembly election 2024 maha vikas aghadi vs mahayuti battle in konkan region
विश्लेषण : कोकणात लोकसभेतील यशाची पुनरावृत्ती महायुती दाखवणार का? महाविकास आघाडीला संधी किती?
politics of religion and caste still resonate in Maharashtra
लेख : जात खरंच जात नाही का?
MPSC Mantra State Services Main Exam Science and Technology
MPSC मंत्र: राज्यसेवा मुख्य परीक्षा; विज्ञान व तंत्रज्ञान

पंचायती राज व्यवस्था या घटकावर बहुतांश प्रश्न समकालीन घडामोडींच्या पार्श्वभूमीवर विचारण्यात आले आहेत. या घटकाची तयारी करत असताना पंचायत राज व्यवस्थेच्या निर्मितीची पार्श्वभूमी, पंचायत राज व्यवस्थेशी संबंधित केंद्र सरकारकडून वेळोवेळी नेमण्यात आलेले आयोग, ७३ वी आणि ७४ वी घटनादुरुस्ती कायदा व गेल्या सुमारे ७३ वर्षांतील पंचायती राज व्यवस्थेची जडण-घडण, आव्हाने, समस्या इत्यादी बाबी जाणून घ्याव्यात. १९९३ साली करण्यात आला व या घटनेला २०२३ मध्ये म्हणजे यावर्षी ३० वर्ष पूर्ण होतात. या पार्श्वभूमीवर संघराज्य शासनाचा तिसरा स्तर असलेल्या या यंत्रणेच्या लोकशाही, प्रशासन, राजकीय प्रतिनिधित्व, आर्थिक आणि कार्यात्मक स्वायत्तता, आणि दुर्बळ सामाजिक घटकांचे सबलीकरण असे विविध पैलू विचारात घेऊन उत्तरे लिहिण्याची तयारी करावी.  

सर्वप्रथम ७३ व ७४ व्या घटना दुरुस्तीबाबत जाणून घेऊया. जून १९८६ मध्ये एल.एम. सिंघवी यांच्या अध्यक्षतेखालील ‘लोकशाही आणि विकास कामासाठी पंचायतींचे पुनर्जीवन करण्यासाठी समितीची’ नियुक्ती केली गेली. पंचायती राज संस्थांची सध्याची स्थिती, वाटचाल आणि विकास कार्यातील भूमिका इत्यादींचे मूल्यमापन करण्याची तसेच ग्रामीण विकास व राष्ट्र बांधणीच्या कार्यात पंचायती राज्य संस्थांना भरीव योगदान कसे करता येईल याबाबत उपाय सुचविण्याची जबाबदारी या समितीवर होती. या समितीने अनेक शिफारशी केल्या त्यापैकी एक अत्यंत महत्त्वाची शिफारस म्हणजे पंचायती राज संस्थांना घटनात्मक दर्जा देणे होय. यानुसार १९९२ साली ७३ वी घटनादुरुस्ती कायदा १९९२ आणि ७४ वी घटनादुरुस्ती कायदा १९९२ हे संमत केले गेले. या कायद्यांची अंमलबजावणी १९९३ पासून करण्यात आली. हे दोन्ही कायदे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीत आमूलाग्र परिवर्तन घडवून आणणारे साधन ठरले. ७३ व्या घटनादुरुस्तीद्वारे राज्यघटनेमध्ये नवव्या भागात कलम २४३ ते २४३ ( ड) या कलमांचा समावेश करण्यात आला. तसेच, पंचायती राज संस्थांकडे २९ बाबी हस्तांतरित करण्यात आल्या. या बाबींचा अंतर्भाव असलेले अकरावे परिशिष्ट संविधानात समाविष्ट करण्यात आले. तसेच ७४ व्या घटना दुरुस्तीमध्ये कलम २४३ (P) ते २४३ (ZG) या कलमांचा समावेश केला गेला व भारतीय राज्यघटनेमध्ये नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित १८ विषयांचा समावेश असणारे बारावे परिशिष्ट जोडण्यात आले. ७३ व ७४ व्या घटनादुरुस्त्या अमलात आल्यानंतर त्याचे काही सकारात्मक परिणाम दिसून आले. यामध्ये प्रामुख्याने पंचायती राज व्यवस्थेने स्थानिक पातळीवर स्वशासनाला हातभार लावला, ग्रामीण जनतेला मूलभूत क्षमतांची जाणीव करून दिली, पंचायती राज व्यवस्थेमुळे शासकीय धोरणात जबाबदारी आणि पारदर्शकता वाढली, स्त्रियांच्या राजकीय व्यवस्थेतील सहभागामध्ये लक्षणीय वाढ झाली. पंचायती राज व्यवस्थेमुळे निर्णय निर्धारण प्रक्रियेचे विकेंद्रीकरण होताना दिसत आहे. या व्यवस्थेमुळे भारतीय संघराज्य व्यवस्थेला अधिक अर्थपूर्ण बनविले आणि शासनामध्ये घटनात्मक तिसरी पातळी अस्तित्वात आली. २०१९ च्या मुख्य परीक्षेमध्ये स्त्रियांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर प्रश्न विचारण्यात आला होता. उदा. ‘‘स्थानिक स्वराज्य संस्थांमधील स्त्री आरक्षणाच्या तरतुदीने भारतीय राजकीय प्रक्रियेच्या पुरुषसत्ताक स्वरूपावर मर्यादित परिणाम केला आहे.’’ भाष्य करा. (गुण १५, शब्दसंख्या २५०). पंचायती राज व्यवस्थेच्या सकारात्मक बाबीबरोबरच काही मर्यादाही दिसून येतात. राज्य यंत्रणेकडून अनेक विकासकामांची जबाबदारी स्थानिक यंत्रणेकडे सोपविण्यात आली. मात्र त्यासाठी आवश्यक असणारी संसाधने राज्य यंत्रणेकडून उपलब्ध केली गेली नाहीत. या घटनादुरुस्तीमध्ये राज्य सरकारांना निर्णायक अधिकार असल्याने कोणतेही राज्य सरकार स्थानिक स्वराज्य संस्थांकडे आपल्या अधिकारांचे व संसाधनांचे हस्तांतरण स्वेच्छेने करायला तयार नसल्याचे दिसते. पंचायती राज व्यवस्थेच्या वाटचालीमध्ये कार्य, यंत्रणा आणि निधीचा अभाव या समस्या पूर्वीप्रमाणेच राहिल्या. एकंदरीत पंचायती राज व्यवस्थेच्या विकासामध्ये राजकीय प्रतिनिधी व प्रशासकांचा उदासीन दृष्टिकोन दिसून येतो. यासोबतच पंचायती राज व्यवस्थेसमोरील आव्हाने जसे, निवडणूक सुधारणा, जनतेचा अधिकाधिक सहभाग, वित्तीय विकेंद्रीकरण, सामाजिक परिस्थितीतील बदल इत्यादींबाबत जाणून घ्यावे. या घटकाच्या तयारीकरिता ‘भारतीय राज्यघटना व घटनात्मक प्रक्रिया’ (खंड १) (युनिक अकॅडमी प्रकाशन) व इतर शासकीय संदर्भ ग्रंथांचा वापर करावा. याबरोबरच समकालीन घडामोडींकरीता ‘योजना’ आणि ‘कुरुक्षेत्र’ ही मासिके उपयोगी ठरतील. ‘द हिंदू’ किंवा ‘इंडियन एक्स्प्रेस’, ‘लोकसत्ता’ या वृत्तपत्रांचे वाचन उपयुक्त ठरते.