Thane Mahanagarpalika Bharti 2023 : ठाणे महानगरपालिकेत काम करण्याची एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे. ती म्हणजे महापालिकेने कनिष्ठ निवासी पदाच्या रिक्त पदांसाठी नवीन भरतीची अधिसूचना जाहीर केली आहे. या भरती अंतर्गत ११६ जागा भरल्या जाणार आहेत. ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या आस्थापनेवरील कनिष्ठ निवासी या पदाकरीता एकत्रित वेतनावर १७९ दिवसाच्या कालावधीसाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. भरतीसाठी पात्र व इच्छूक उमेदवारांना छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय, पहिला मजला, कळवा, ठाणे येथे ३ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ११ या वेळेत थेट मुलाखतीस (Walk in Interview) उपस्थित रहावे लागणार आहे. भरती संबंधित अधिकची माहिती जाणून घेऊया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पदाचे नाव – कनिष्ठ निवासी

एकूण पदसंख्या – ११६

शैक्षणिक पात्रता –

  • एम. डी. पदव्युत्तर पदवी.
  • डी.एन. बी. पदव्युत्तर पदवी.
  • Diploma.
  • FCPS
  • एम.बी.बी.एस पदवी दंतचिकित्सा
  • बी.डी.एस पदवी (एक वर्षांचा अनुभव)

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात अवश्य वाचा.

हेही वाचा- पुण्यात नोकरीची सुवर्णसंधी! महापालिका अंतर्गत विविध शिक्षक पदांची भरती सुरु, जाणून घ्या कधी आणि कसा करायचा अर्ज

नोकरीचे ठिकाण – ठाणे</strong>

निवड प्रक्रिया – मुलाखतीद्वारे

मुलाखतीचा पत्ता –

  • छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय, पहिला मजला, कळवा, ठाणे.

मुलाखतीची तारीख – ३ ऑगस्ट २०२३

अधिकृत वेबसाईट – thanecity.gov.in

पगार – निवडेलल्या उमेदवारांना ७५ हजार १४४ ते ७६ हजार ५८७ रुपयांपर्यंत पगार मिळणार.

भरती संबंधित सविस्तर माहितीसाठी (https://drive.google.com/file/d/1yHa6hKtjI9V7iTtL-hR8rv49DgQxlo_T/view) या लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tmc bharti 2023 job opportunity in thane municipal corporation recruitment for 116 posts of junior resident post started jap