TMC Thane Municipal Corporation Recruitment 2024 : ठाणे महापालिकेअंतर्गत विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून वैद्यकीय आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी, परिचारिका महिला, पुरुष आणि बहुउद्देशीय कर्मचारी पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहे. या भरती प्रक्रियेतील उमेदवारांना ११ महिने २९ दिवस कालावधीसाठी कंत्राटी स्वरूपात व करार पद्धतीने नोकरीवर ठेवले जाणार आहे. इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे, अर्ज करण्याची शेवटी तारीख ७ सप्टेंबर २०२४ आहे. पण, अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता, पगार आणि इतर अटी नियम यांची सविस्तर माहिती करून घ्यावी.

ठाणे महानगरपालिका भरती २०२४ (Thane Mahanagarpalika Bharti 2024)

रिक्त जागा – ३६

NCP Sharad Pawar Third Candidate List
NCP Sharad Pawar Third Candidate List : मोठी बातमी! शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तिसरी यादी जाहीर; धनंजय मुंडेंच्या विरोधात दिला ‘हा’ तगडा उमेदवार
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
BMC Recruitment 2024 Brihanmumbai Municipal Corporation City Engineer 690 seats check all details
मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी! ६९० जागा अन् १ लाख ४० हजारांपर्यंत पगार; कसा कराल अर्ज? जाणून घ्या
R Madhavan Dubai Home Video
आर माधवनचं दुबईतील घर पाहिलंत का? मराठमोळ्या पत्नीबरोबर दिवाळीची पूजा, सरिताच्या मराठी लूकने वेधलं लक्ष
Anganwadi Mukhya Sevika Bharti 2024
Anganwadi Mukhya Sevika Bharti 2024 : अंगणवाडी मुख्यसेविकेच्या १०२ रिक्त पदांसाठीभरती प्रक्रिया सुरू; आजच करा अर्ज, एवढा मिळणार पगार
youth crowd at mankoli bridge to burst crackers
डोंबिवलीतील माणकोली पुलावर दिवाळीचा आखाडा; फटाके फोडण्यासाठी तरूणाईची गर्दी
job opportunities in banking sector career in banking bank jobs in india zws
नोकरीची संधी : बँकेतील भरतीसुहास पाटील

पदाचे नाव आणि तपशील

वैद्यकीय अधिकारी – १२
परिचारिका (महिला) – ११
परिचारिका (पुरुष) – ०१
बहुउद्देशीय कर्मचारी – १२

शैक्षणिक पात्रता :

वैद्यकीय अधिकारी पदासाठी उमेदवार MBBS/BAMS पदवीधार असावा; यासह महिला, पुरुष परिचारिका पदासाठी उमेदवाराने बीएसस्सी नर्सिंगचा कोर्स पूर्ण केलेला असावा. याशिवाय बहुउद्देशीय पदासाठी उमेदवार १२ वी (Science) उत्तीर्ण असण्याशिवाय त्याने पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स उत्तीर्ण केलेला असावा.

Read More Career News : SCI Recruitment 2024 :१० वी पास उमेदवारांसाठी भारतीय सर्वोच्च न्यायालयात नोकरीची संधी; जाणून घ्या तपशील….

वयाची अट :

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे किमान वय १८ ते कमाल ७० वर्षांपर्यंत असावे, पण ही वयोमर्यादा प्रत्येक पदानुसार वेगळी आहे, त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी वयोमर्यादा तपासून पाहा.

पगार :

वैद्यकीय अधिकारी : ६० हजार रुपये प्रति महिना
परिचारिका (महिला, पुरूष) : २० हजार रुपये प्रति महिना
बहुउद्देशीय कर्मचारी (पुरुष) MPW) : १८ हजार रुपये प्रति महिना

अर्ज पाठविण्याचा पत्ता :

ठाणे महानगरपालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी, पांचपाखाडी, ठाणे (प)-४००६०२.

अर्ज करण्याची शेवटची तारीख :

०७ सप्टेंबर २०२४

नोकरीचे ठिकाण : ठाणे

अर्ज शुल्क

खुल्या प्रवर्गातील उमेदवार : १५० रुपये

राखीव प्रवर्गातील उमेदवार : १०० रुपये

महत्त्वाच्या लिंक

ठाणे महापालिका भरती जाहिरात
Municipal Corporation Recruitment PDF

ऑनलाइन अर्जाची लिंक
TMC//docs.google.com/forms

अधिकृत वेबसाइट
https://thanecity.gov.in/tmc/CitizenHome.html