Truck Driver Turned YouTuber: कष्ट करून आपल्या पोटाची खळगी भरणारे लोक, कधी सुखाचे चार दिवस येतील याची वाट पाहत असतात. गरिबीची झळ असली तरी आपल्या कुटुंबासाठी राबणं हे जणू त्यांचं ध्येयच असतं, अशा परिस्थितीत जर त्या कष्टाचं चीज झालं तर आनंद गगनात मावेनासाच होतो. अशीच कहाणी आहे अपार कष्ट करणाऱ्या राजेश रवानी यांची.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
२५ वर्षांपासून ट्रकचालक असणारे राजेश रवानी आज प्रसिद्ध यूट्यूबर आहेत. ट्रकचालक म्हणून भारताच्या रस्त्यांवर फिरणाऱ्या राजेश यांना त्यांच्या स्वयंपाकाच्या प्रेमामुळे ‘R Rajesh Vlogs’ या नावाचे YouTube चॅनल सुरू करण्याची प्रेरणा मिळाली.
झारखंडच्या जामतारा येथे राहणारे राजेश (Truck Driver Turned YouTuber) आता एक प्रसिद्ध यूट्यूबर असून त्यांचे यूट्यूबवर १.८८ हून अधिक सबस्क्रायबर्स आहेत. त्यांच्या या अपार कष्टातून त्यांनी एक नवं घरदेखील घेतलं आहे. चला तर मग जाणून घेऊयात ट्रकचालकाचा हा प्रेरणादायी प्रवास.
अलीकडेच सिद्धार्थ कन्नन यांच्या पॉडकास्टमध्ये राजेश रवानी यांनी हजेरी लावली होती. यादरम्यान राजेश यांनी त्यांच्या कमाईबद्दल आणि त्यांच्या नव्या घराबद्दल सांगितले.
‘असा’ झाला यूट्यूबचा प्रवास सुरू (Truck Driver Turned YouTuber)
सिद्धार्थ कन्नन यांनी त्यांच्या पहिल्या व्हायरल व्हिडीओबद्दल विचारले असता राजेश म्हणाले, “मी व्हॉइसओव्हरसह एक व्हिडीओ युट्यूबवर शेअर केला होता; ज्यात मी माझा चेहरा दाखवला नव्हता, तेव्हा लोकांनी मला माझा चेहरा दाखवण्याचा आग्रह केला. त्यामुळे माझ्या मुलानं माझा चेहरा दिसेल असा एक व्हिडीओ बनवला; ज्याला एका दिवसात तब्बल ४.५ लाख व्ह्युज मिळाले.”
यूट्यूबवर व्हिडीओ अपलोड करणाऱ्या रवानी यांनी त्यांच्या मुलांना या गोष्टीचं श्रेय दिलं. “आम्ही दोन्ही वाहनं आणि YouTube चॅनेल एकत्र चालवत आहोत. माझ्या कुटुंबाच्या पाठिंब्याशिवाय आणि मदतीशिवाय हे कधीच शक्य झालं नसतं,” असं ते म्हणाले.
राजेश रवानी यांचे नेटवर्थ
ट्रक चालविण्याच्या (Truck Driver Turned YouTuber) कामातून ते दरमहा २५ ते ३० हजार रुपये कमावतात, असे राजेश रवानी यांनी उघड केले. तर आता त्यांचे YouTube चॅनेल हे त्यांच्या उत्पन्नाचे प्रमुख स्रोत बनले आहे, जिथे त्यांनी दरमहा ४-५ लाख रुपये कमावले आहेत; तर अनेकदा त्यांनी १० लाखदेखील कमावले आहेत.
अपघात झाला अन्…
जसे आयुष्यात सुखाचे क्षण असतात तसेच दुखाचे क्षण यायला फार वेळ लागत नाही. राजेश रवानी यांचा एकदा गंभीर अपघात झाला होता, पण त्एयातून ते बचावले. या अपघातात त्यांच्या हाताला दुखापत झाली होती. परंतु, कुटुंबाला हातभार लावण्यासाठी व घराच्या बांधकामासाठी त्यांनी त्यांचे काम सुरूच ठेवले, असंही ते म्हणाले.
कुटुंबासाठी केला संघर्ष
झारखंडमध्ये जन्मलेल्या राजेश रवानी यांचे वडीलदेखील वाहनचालक होते. कुटुंबातील पाच जणांच्या पोटाची खळगी भरणारे राजेश हे एकमेव कमावते होते. राजेश सर्व खर्च भागवण्यासाठी वडिलांना दरमहा ₹५०० पाठवीत असत. त्यांना अनेकदा इतरांकडून पैसे घ्यावे लागायचे. कष्ट आणि मेहनत करून एवढ्या संघर्षानंतर राजेश रवानी यांनी मोठा पल्ला गाठला आहे, असं म्हणणं वावग ठरणार नाही.
उत्कटता आणि कठोर परिश्रम यांच्या जोरावर जीवन कसे बदलता येऊ शकते याचे प्रेरणादायी उदाहरण म्हणजे राजेश रावानी.