UCO Bank Recruitment 2025: तुम्ही बँकेत नोकरीच्या शोधात असाल तर, तुमच्यासाठी नामी संधी चालून आली आहे. UCO बँकेत स्थानिक बँक अधिकारी पदासाठी अर्ज स्वीकारले जात आहेत. इच्छूक उमेदवार ucobank.com या UCO बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करू शकतात. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेच्या तयारीला लागावे. ही एकप्रकारची मेगा भरती किंवा बंपर भरतीच म्हणावी लागेल. या भरती प्रक्रियेसाठी वयाची आणि शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. चला तर मग या भरती प्रक्रियेबद्दल अधिक माहिती आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया जाणून घेऊयात.

UCO बँकेमध्ये तब्बल २५० उमेदवारांची ही भरती असणार आहेत. ज्यासाठी उमेदवारांनी भारत सरकार किंवा त्याच्या नियामक संस्थांनी मान्यता दिलेल्या मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे.

SSC HSC Exam 2025 caste category on hall Ticket
१० वी, १२ वीच्या हॉल तिकीटांवर जातप्रवर्गाचा उल्लेख; SSC, HSC परिक्षेआधीच वाद; शिक्षण मंडळ स्पष्टीकरण देत म्हणाले…
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Daily Horoscope On 30 October
३० ऑक्टोबर पंचांग: दिवाळीआधीच येईल सोनेरी संधी, आर्थिक बळ वाढेल; कसा जाईल १२ राशींचा बुधवार?
ARvind sawant and Shaina nc
Arvind Sawant : “शायना एन. सी. माझी जुनी मैत्रीण…”, ‘त्या’ वक्तव्यावरून अरविंद सावंत यांचं स्पष्टीकरण!
saudi arabia snowfall
सौदी अरेबियाच्या रखरखीत वाळवंटात झाली चक्क बर्फवृष्टी; कारण काय?
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
elon musk danger for world
इलॉन मस्क नावाचा धोका
sai godbole brand ambassador of the apple company
मराठी अभिनेत्रीची लेक झाली ‘Apple’ कंपनीची ब्रँड अँबॅसेडर! आईसाठी अभिमानास्पद क्षण; म्हणाली, “लॉस एंजेलिस येथे…”

महत्त्वाच्या तारखा:

नोंदणी सुरू: १६ जानेवारी

नोंदणी बंद: २ फेब्रुवारी २०२५

रिक्त जागा तपशील:

आसाम: ३० पदे

गुजरात : ५७ पदे

J&K: ५ पदे

कर्नाटक: ३५ पदे

केरळ: १५ पदे

महाराष्ट्र: ७० पदे

मेघालय : ४ पदे

नागालँड: ५ पदे

सिक्कीम : ६ पदे

त्रिपुरा: १३ पदे

तेलंगणा आणि आंध्र प्रदेश: १० पदे

पात्रता निकष:

शैक्षणिक पात्रता:

सरकारद्वारे मान्यताप्राप्त भारतीय विद्यापीठातील कोणत्याही क्षेत्रातील पदवी.

केंद्र सरकारने मंजूर केलेल्या समकक्ष पात्रता देखील स्वीकार्य आहेत.

उमेदवारांकडे वैध गुणपत्रिका किंवा पदवी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

पदवी दरम्यान मिळालेल्या गुणांची टक्केवारी अर्जाच्या वेळी नमूद करणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा:

उमेदवारांचे वय २० ते ३० वर्षे दरम्यान असावे.

अर्ज शुल्क:

SC/ST/PwBD उमेदवारांसाठी फी: १७५

इतर श्रेणींसाठी शुल्क: ८५०

अतिरिक्त शुल्क:

उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज आणि फी भरण्यासाठी बँक व्यवहार शुल्क भरावे.

नॉन-रिफंडेबल फी:

एकदा फी भरल्यानंतर परत मिळणार नाही तसेच भविष्यातील कोणत्याही परीक्षा किंवा निवड प्रक्रियेसाठी पुढे हीच फी फॉरवर्ड केली जाऊ शकत नाही.

अर्ज कसा करावा:

UCO बँकेच्या मुख्य वेबसाइट ucobank.com वर जा.

“करिअर” पृष्ठ निवडल्यानंतर, “भरती संधी” वर जा.

स्थानिक बँक अधिकारी (LBO) 2025-2026 पदासाठी, “ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा” निवडा.

नोंदणी करण्यासाठी तुमची वैयक्तिक माहिती भरा.

अर्ज भरा आणि आवश्यक पेमेंटसह सबमिट करा.

फॉर्म भरा आणि तुमच्या रेकॉर्डसाठी एक प्रत घ्या.

निवड प्रक्रिया:

लेखी परीक्षा हा निवड प्रक्रियेचा एक भाग आहे. चाचणीमध्ये खालील क्षेत्रांतील प्रश्नांचा समावेश असेल: डेटा विश्लेषण आणि व्याख्या, सामान्य/अर्थव्यवस्था/बँकिंग जागरूकता, तर्क आणि संगणक योग्यता आणि इंग्रजी भाषा. प्रत्येक चुकीच्या उत्तराचे गुण वजा केले जातील. रिक्त सोडलेल्या प्रश्नाचे कोणतेही गुण वजा होणार नाहीत.

Story img Loader