सुहास पाटील

युनियन बँक (Union Bank of India) (भारत सरकारचा उपक्रम) अॅप्रेंटिसेस अॅक्ट, १९६१ अंतर्गत अॅप्रेंटिसेसची सन २०२४-२५ करिता भरती. एकूण पदे – ५००. महाराष्ट्रातील रिक्त पदे – ५६ (अजा – १, अज – ५, इमाव – १५, ईडब्ल्यूएस – ५, खुला – २६ (३ पदे दिव्यांग कॅटेगरी HI/ OC/ VI साठी प्रत्येकी १ पद राखीव)). गोवा राज्यातील पदे – ४ (खुला) (१ पद दिव्यांग कॅटेगरी श्क साठी राखीव.) पात्रता – (दि. १७ सप्टेंबर २०२४ रोजी) पदवी (कोणतीही शाखा) उत्तीर्ण. पदवी परीक्षा १ एप्रिल २०२० नंतर उत्तीर्ण केलेली असावी.

57 lakh worth of goods seized in Nashik district in two days nashik news
नाशिक जिल्ह्यात दोन दिवसात ५७ लाखांचा मुद्देमाल जप्त
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
job opportunities direct recruitment in directorate of medical education
नोकरीची संधी : वैद्याकीय शिक्षण संचालनालयात सरळसेवेने भरती
GAIL India Recruitment 2024
GAIL India Recruitment 2024 : सिनिअर इंजिनिअरच्या पदासाठी मागवले अर्ज, १,८०,०००पर्यंत मिळू शकतो पगार
Careers in banking jobs
नोकरीची संधी: बँकेत ‘सिनियर एक्झिक्युटिव्ह’ पदांसाठी संधी
Mega Housing Lottery application process, entension, CIDCO
सिडकोच्या २६ हजारांच्या महागृहनिर्माण सोडत प्रक्रियेला महिन्याभराची मुदतवाढ
job opportunity in ordnance factory update in marathi
नोकरीची संधी :ऑर्डनन्स फॅक्टरीत भरती

वयोमर्यादा : (दि. १ ऑगस्ट २०२४ रोजी) २० ते २८ वर्षे. (उमेदवाराचा जन्म दि. २ ऑगस्ट १९९६ ते १ ऑगस्ट २००४ दरम्यानचा असावा.) कमाल वयोमर्यादेत सूट – इमाव – ३ वर्षे; अजा/अज – ५ वर्षे; दिव्यांग – खुला – १० वर्षे, इमाव – १३ वर्षे, अजा /अज – १५ वर्षे.

अॅप्रेंटिसशिप ट्रेनिंगचा कालावधी १ वर्षाचा असेल. ट्रेनिंग दरम्यान उमेदवारांना दरमहा रु. १५,०००/- स्टायपेंड दिला जाईल.

निवड पद्धती : ( i) ऑनलाइन ऑब्जेक्टिव्ह टाईप लेखी परीक्षा (१) जनरल फिनान्शियल अवेअरनेस, (२) जनरल इंग्लिश, (३) क्वांटिटेटिव्ह अँड रिझनिंग अॅप्टिट्यूड, (४) कॉम्प्युटर नॉलेज. प्रत्येकी २५ प्रश्न, २५ गुण, कालावधी प्रत्येकी १५ मिनिटे, एकूण १०० प्रश्न, वेळ ६० मिनिटे.

( ii) टेस्ट ऑफ लोकल लँग्वेज – उमेदवारांनी ज्या राज्यातील पदांसाठी अर्ज केला आहे त्या राज्यातील स्थानिय भाषेची परीक्षा द्यावी लागेल. (ज्या उमेदवारांनी १० वी/१२ वीला संबंधित राज्यातील स्थानिय भाषा अभ्यासली असेल त्याचा पुरावा सादर केल्यास त्यांना लँग्वेज टेस्ट द्यावयाची गरज नाही.)

राज्यनिहाय कॅटेगरीनुसार मेरिट लिस्ट उमेदवारांच्या लेखी परीक्षेतील गुणवत्तेनुसार बनविली जाईल. प्रतीक्षा यादीसुद्धा बनविली जाईल. उमेदवाराचे वैद्याकीय फिटनेस तपासून मगच नेमणूक दिली जाईल. अॅप्रेंटिसशिप ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांची असेसमेंट टेस्ट घेतली जाईल. (थिअरी असेसमेंट BFSI सेक्टर स्किल काऊन्सिल ऑफ इंडिया (BFSI SSC) करेल आणि प्रॅक्टिकल असेसमेंट बँकेकडून केली जाईल.)

हेही वाचा >>> चौकट मोडताना : सारेच सुंदर… तरीही विषाद 

उमेदवारांना अॅप्रेंटिसशिप पोर्टल https:// www. apprenticesshipindia. gov. in/ apprenticeship/ opportunity आणि NATS पोर्टल https:// nats. education. gov. in/ st udent_ type. php ( Student Register/ Student Login वर आपले नाव यापूर्वी रजिस्टर केले नसेल तर रजिस्टर करावे लागेल. रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर union Bank of India Apprenticeship Engagement शोधून त्यावर अर्ज करा. अर्ज केल्यानंतर Application Management मधून  Application Status चेक करा. उमेदवारांनी अॅप्रेंटिस रजिस्ट्रेशन कोड ( NAPS पोर्टलने जारी केलेला) व ‘ Enrolment ID’ (NATS पोर्टलने जारी केलेला) जपून ठेवावा.

यशस्वीरित्या अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना BFSI SSC (naik. ashwini@bfsissc. com) यांचेकडून मेलद्वारे ट्रेनिंगसाठी निवडलेल्या जिह्याची माहिती विचारली जाईल आणि अर्जाचे शुल्क भरण्याबाबत सूचित केले जाईल.

अर्जाचे शुल्क : खुला/ इमाव/ ईडब्ल्यूएस – रु. ८००/-. (अजा/ अज/ महिला उमेदवारांना रु. ६००/- आहे.) दिव्यांग उमेदवारांना रु. ४००/-.

परीक्षा केंद्र – छत्रपती संभाजी नगर, मुंबई/ नवी मुंबई/ ठाणे/ टटफ/ नागपूर/ पुणे/ नाशिक/ जळगाव/अमरावती, अहमदनगर.

ऑनलाइन अर्जासोबत (१) पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटोग्राफ (४.५ सें.मी. बाय ३.५ सें.मी.) (२०-५० KB), (२) स्वाक्षरी (१०-२० KB), (३) डाव्या हाताच्या अंगठ्याची निशाणी (२०-५० KB), (४) स्वहस्ते लिहिलेले घोषणापत्र (५०-१०० KB) (रुंदी १० सें.मी. बाय उंची ५ सें.मी.) स्कॅन करून अपलोड करावयाच्या आहेत. उमेदवारांना ज्या राज्यातील पदांसाठी अर्ज करावयाचा आहे, त्या राज्यातील ३ जिल्ह्यांचा पसंतीक्रम नोंदवायचा आहे.

अजा/ अज/ इमाव उमेदवारांनी Govt. of India ने Prescribed केलेल्या Format मधील दाखले कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर करणे आवश्यक.

शंकासमाधानासाठी apprentice@unionbankofindia.bank किंवा naik.ashwini@bfsissc.com यावर संपर्क साधावा. तसेच या ई-मेल आयडीवरून परीक्षेचा दिनांक, वेळ इ. माहिती सप्टेंबर २०२४ मध्ये उमेदवारांना पाठविली जाईल.

उमेदवारांना नेमून दिलेल्या दिवशी व वेळी स्वतचा camera enabled desktop किंवा Laptop किंवा tablet किंवा smart plune वापरून ऑनलाइन परीक्षा द्यावी लागेल. अॅप्रेंटिसशिप पोर्टलवर अपलोड केलेला आयडी प्रूफ उमेदवारांना परीक्षेच्या वेळी स्क्रीनवर दाखवावा (Display) लागेल.

विस्तृत माहिती आणि ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लिंक http://www.unionbankofindia.co.in या वेबसाईटवरील Careers Section मध्ये उपलब्ध आहे. ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १७ सप्टेंबर २०२४.