सुहास पाटील

युनियन बँक ऑफ इंडिया, मुंबई. २०२४-२५ मध्ये स्पेशलाईज्ड ऑफिसर्सपदांची भरती. एकूण रिक्त पदे – ६०६ (अजा – ८९, अज – ४४, इमाव – १६१, ईडब्ल्यूएस – ५९, खुला – २५३) (२५ पदे दिव्यांग (कॅटेगरी VI – , VHI –  OC – , MD – ४) साठी राखीव). (१) असिस्टंट मॅनेजर (फोरेक्स) (JMGS- I) – ७३ पदे (अजा – ११, अज – ५, इमाव – २०, ईडब्ल्यूएस – ७, खुला – ३०) (४ पदे दिव्यांग कॅटेगरी VI, HI, OC, MD साठी प्रत्येकी १ पद राखीव).

US-based company shuts down without notice Mass layoffs
Mass layoffs : अमेरिकेतील कंपनीने पूर्वसूचना न देता गुंडाळलं भारतातील कामकाज! हजारो कर्मचार्‍यांना मिळाले नोकरीहून काढल्याचे ईमेल
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Central Bank of India Credit Officer Recruitment 2025:
बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी; १ हजार जागांसाठी होतेय भरती; कसा करायचा अर्ज? जाणून घ्या
job opportunity in indian oil corporation and clerk recruitment in mumbai high court
नोकरीची संधी: इंडियन ऑईल कॉर्पोरेशनमध्ये संधी
Bank Of Maharashtra Recruitment 2025: Application Begins For 172 Posts, No Written Exam how to apply know details
BOM Recruitment: बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; कोणत्याही परिक्षेशिवाय मिळणार नोकरी, अर्ज कसा करायचा जाणून घ्या
chief minister devendra fadnavis appointment of ministers staff swearing ceremony
मंत्र्यांच्या शपथविधीला दीड महिना होऊनही कर्मचारी नियुक्ती प्रलंबित असल्याने अडचणी
मुंबई : नायर रुग्णालयातील रोजंदारी कर्मचारी तीन महिने वेतनापासून वंचित, ७४ कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ
मुंबई : नायर रुग्णालयातील रोजंदारी कर्मचारी तीन महिने वेतनापासून वंचित, ७४ कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ
Central Bank Of India ZBO Recruitment 2025: Registration Begins For 266 Posts, Salary Up To Rs 85,000 Monthly
सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी; ८५ हजारांपर्यंत मिळणार पगार; अर्ज कसा कराल जाणून घ्या

पात्रता – (दि. २३ फेब्रुवारी २०२४ रोजी) पदवी (कोणतीही शाखा) किमान सरासरी ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण. (अजा/अज/इमाव/ दिव्यांग – ५५टक्के गुण) आणि पूर्ण वेळ MBA/ PGDBA/ PGDBM/ PGPM/ PGDM फिनान्स स्पेशलायझेशनसह उत्तीर्ण. (फॉरेन एक्स्चेंजमधील सर्टिफिकेट कोर्स उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.)

(२) असिस्टंट मॅनेजर (टेक्निकल) (JMGS- I) – ३० पदे (अजा – ४, अज – २, इमाव – ८, ईडब्ल्यूएस – ३, खुला – १३) (३ पदे दिव्यांग कॅटेगरी VI, HI, OC साठी प्रत्येकी १ पद राखीव).

(३) मॅनेजर (टेक्निकल ऑफिसर) (MMGS- II) – १९ पदे (अजा – २, अज – १, इमाव – ५, ईडब्ल्यूएस – १, खुला – १०) (१ पद दिव्यांग कॅटेगरी OC साठी राखीव).

हेही वाचा >>> करिअर मंत्र

पद क्र. २ व ३ साठी पात्रता – सिव्हील/ इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/ प्रोडक्शन/ मेटॅलर्जी/ इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलीकम्युनिकेशन/कॉम्प्युटर सायन्स/इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी/टेक्स्टाईल/केमिकल इ. विषयातील इंजिनिअरींग पदवी. (मॅनेजर पदासाठी २ वर्षांचा अनुभव आवश्यक.)

(४) असिस्टंट मॅनेजर (आर्किटेक्ट) (JMGS- I) – १ पद (खुला).

पात्रता – आर्किटेक्चर पदवी उत्तीर्ण

(५) असिस्टंट मॅनेजर (सिव्हील इंजिनिअर) ( JMGS- I) – २ पदे (अज – १, खुला – १).

(६) असिस्टंट मॅनेजर (इलेक्ट्रिकल इंजिनिअर) (JMGS- I) – २ पदे (अजा – १, खुला – १).

पद क्र. ५ व ६ साठी पात्रता – संबंधित विषयातील इंजिनिअरींग पदवी उत्तीर्ण.

(७) मॅनेजर (इंटिग्रेटेड ट्रेझरी ऑफिसर) ( MMGS- II) – ५ पदे (इमाव – १, ईडब्ल्यूएस – १, खुला – ३).

पात्रता – MBA/ PGDBA/ PGDBM/ PGPM/ PGDM फिनान्स स्पेशलायझेशनसह संबंधित कामाचा किमान २ वर्षांचा अनुभव किंवा स्टॅटिस्टिक्स/ इकॉनॉमिक्समधील पदव्युत्तर पदवी.

(८) मॅनेजर (लॉ) ( MMGS- II) – २५ पदे (अजा – ४, अज – २, इमाव – ७, ईडब्ल्यूएस – ३, खुला – ६) (४ पदे दिव्यांग कॅटेगरी VI, HI, OC, MD साठी प्रत्येकी १ पद राखीव).

पात्रता – कायदा विषयातील पदवी किमान सरासरी ५०टक्के गुणांसह उत्तीर्ण. (अजा/ अज/ इमाव/ दिव्यांग उमेदवारांसाठी ४५टक्के गुण) किमान ४ वर्षांचा संबंधित कामाचा अनुभव.

(९) मॅनेजर (क्रेडिट) (MMGS- II) – ३७१ पदे (अजा – ५६, अज – २८, इमाव – १००, ईडब्ल्यूएस – ३८, खुला – १४९) (९ पदे दिव्यांग कॅटेगरी VI – ३, HI – ३, OC – २, MD – १ साठी राखीव).

पात्रता – पदवी (कोणतीही शाखा) उत्तीर्ण. (MBA (फिनान्स)/सी.ए./आयसीडब्ल्यूए असल्यास प्राधान्य) किमान ३ वर्षांचा संबंधित कामाचा अनुभव.

(१०) मॅनेजर (रिस्क) (MMGS- II) – २७ पदे (अजा – ४, अज – २, इमाव – ८, ईडब्ल्यूएस – २, खुला – ११) (२ पदे दिव्यांग कॅटेगरी VI व MD साठी प्रत्येकी १ पद राखीव).

पात्रता – पदवी (कोणतीही शाखा) उत्तीर्ण आणि फिनान्शियल रिस्क मॅनेजमेंट सर्टिफिकेट किंवा CFA/ CA/ ICWA/ CS किंवा MBA /(फिनान्स) PGDM किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण (अजा/ अज/ इमाव/ दिव्यांग ५५ टक्के गुण) किंवा मॅथ्स/ स्टॅटिस्टिक्स/ इकॉनॉमिक्समधील पदव्युत्तर पदवी किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण. (अजा/ अज/ इमाव/ दिव्यांग ५५ टक्के गुण)

(११) मॅनेजर आयटी (एपीआय प्लॅटफॉर्म इंजिनीअर/ इंटिग्रेशन स्पेशालिस्ट) (MMGs- II) – २ पदे (अजा – १, खुला – १).

(१२) मॅनेजर आयटी (फ्रंट एण्ड/मोबाइल अॅप डेव्हलपर) – २ पदे (ईडब्ल्यूएस).

पद क्र. ११ व १२ साठी पात्रता – कॉम्प्युटर सायन्स/ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी/ इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड कम्युनिकेशन इंजिनीअरिंग विषयातील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी किंवा एमसीए

पद क्र. ८ मॅनेजर लॉ (MMGS- II) वगळता सर्व पदांसाठी पदवीला ६० टक्के गुण आवश्यक (अजा/अज/ इमाव/ दिव्यांग – ५५ टक्के गुण).

आणि सिनियर मॅनेजर (सीए/ रिस्क/रिपोर्टिंग अॅण्ड ELT Specialist Monitoring & Logging/ Dev/ Sec Ops Engineer/ अॅप्लिकेशन डेव्हलपर) ( MMGS- III) – ४२ पदे.

चिफ मॅनेजर आयटी ( SMGS- IV) – ५ पदे (किमान १० वर्षांचा अनुभव).

वयोमर्यादा – (दि. १ फेब्रुवारी २०२४ रोजी) असिस्टंट मॅनेजर (JMGS- I) – २० ते ३० वर्षे, मॅनेजर ( MMGS- II) (मॅनेजर लॉ/ मॅनेजर रिस्क पदे वगळता) – २५ ते ३५ वर्षे. मॅनेजर लॉ – २६ ते ३२ वर्षे, मॅनेजर रिस्क – २५ ते ३२ वर्षे.

वेतन श्रेणी – असिस्टंट मॅनेजर (JMGS- I) – ३६,००० – ६३,८४०; मॅनेजर – ४८,१७० – ६९,८१०.

निवड पद्धती – ऑनलाइन परीक्षा/ ग्रुप डिस्कशन आणि/ किंवा पर्सोनल इंटरह्यू.

असिस्टंट मॅनेजर – ऑनलाइन लेखी परीक्षा – (१) क्वांटिटेटिव्ह अॅप्टिट्यूड – २५ प्रश्न, २५ गुण; (२) रिझनिंग – ५० प्रश्न, ५० गुण; (३) पदाशी संबंधित प्रोफेशनल नॉलेज – ५० प्रश्न, १०० गुण; (४) इंग्लिश लँग्वेज – २५ प्रश्न, २५ गुण. एकूण १५० प्रश्न, २०० गुण.

प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी प्रश्नास असलेल्या गुणांच्या २५ टक्के गुण वजा केले जातील.

पर्सोनल इंटरह्यू – रिक्त पदांच्या १:३ प्रमाणात उमेदवार ५० गुणांच्या इंटरह्यूसाठी बोलाविले जातील.

ग्रुप डिस्कशनसाठी ५० गुण असतील.

परीक्षा केंद्र – मुंबई/ नवी मुंबई/ ग्रेटर मुंबई/ ठाणे, अहमदाबाद/ गांधीनगर, बेंगळूरु, भोपाळ, हैदराबाद इ.

प्रोबेशन – निवडलेल्या उमेदवारांना २ वर्षांचा प्रोबेशन कालावधी असेल.

अर्जाचे शुल्क – अजा/ अज/ इमाव – रु. १७५; इतर उमेदवारांसाठी रु. ८५०/-.ऑनलाइन अर्ज www.unionbankofindia.co.in या संकेतस्थळावर दि. २३ फेब्रुवारी २०२४ पर्यंत करावेत. ((ए) अॅप्लिकेशन रजिस्ट्रेशन, (बी) पेमेंट ऑफ फीस, (सी) फोटोग्राफ, सिग्नेचर, डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा, स्व-हस्ताक्षरात लिहिलेले घोषणापत्र स्कॅन करून ऑनलाईन अर्जासोबत अपलोड करणे.)

Story img Loader