UPSC Specialist Recruitment 2024: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. तब्ब्ल ३२२ रिक्त जागांसाठी ही भरती होणार आहे. इच्छुक व पात्र उमेदवार https://www.upsconline.nic.in या अधिकृत वेबसाईटद्वारे अर्ज करू शकतात. भरती प्रक्रिया २५ मे पासून सुरू झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ जून २०२४ असणार आहे. भरतीसाठी आवश्यक वयोमर्यदा, शैक्षणिक पात्रता, रिक्त पदे व पदसंख्या याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रिक्त पदे आणि पदसंख्या –

ही भरती प्रक्रिया उप अधीक्षक पुरातत्व रसायनशास्त्रज्ञ , उप अधीक्षक पुरातत्वशास्त्रज्ञ, नागरी जलविज्ञान अधिकारी, विशेषज्ञ ग्रेड III , न्यायवैद्यक औषधातील सहाय्यक प्राध्यापक आदी बऱ्याच जागांसाठी होणार आहे.

उपअधीक्षक- ०४
उपअधीक्षक पुरातत्वशास्त्रज्ञ- ६७
सिव्हिल हायड्रोग्राफिक अधिकारी- ०४
विशेषज्ञ ग्रेड III असिस्टंट प्रोफेसर (फॉरेंसिक मेडिसिन) = ०६
विशेषज्ञ ग्रेड III असिस्टंट प्रोफेसर (जनरल औषध)- ६१
विशेषज्ञ ग्रेड III असिस्टंट प्रोफेसर (जनरल शस्त्रक्रिया)- ३९
विशेषज्ञ ग्रेड III असिस्टंट प्रोफेसर (बाल नेफ्रोलॉजी)- ०३
स्पेशालिस्ट ग्रेड III असिस्टंट प्रोफेसर (बालरोगशास्त्र) – २३
विशेषज्ञ ग्रेड-III (अनेस्थेसियोलॉजी)- ०२
विशेषज्ञ ग्रेड-III (त्वचाविज्ञान, वेनिरोलॉजी आणि कुष्ठरोग)- ०२
विशेषज्ञ ग्रेड-III (जनरल औषध)- ०४
विशेषज्ञ ग्रेड-III (जनरल शस्त्रक्रिया)- ०७
स्पेशालिस्ट ग्रेड-III (ऑब्स्टेट्रिक्स आणि गायनॅकॉलॉजी)- ०५
स्पेशालिस्ट ग्रेड-III (नेत्रविज्ञान)- ०३
स्पेशालिस्ट ग्रेड-III (ऑर्थोपेडिक्स)- ०२

प्रत्येक पदासाठी वयोमर्यादा आणि शैक्षणिक पात्रता वेगळी आहे जी खाली अधिसूचनेत नमूद करण्यात आली आहे.

लिंक –

अर्ज कसा कराल ?

१.सुरवातीला केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या http://www.upsconline.nic.in अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
२. होम पेजवरील ‘UPSC recruitment 2024’ या लिंकवर क्लिक करा.
३. आवश्यक माहिती प्रदान करा.
४. अर्ज सबमिट करा.
५. आवश्यक कागदपत्रे सबमिट करा.
६. भविष्यातील संदर्भासाठी त्याची प्रिंटआउट सुद्धा काढून ठेवा.

प्रत्येक उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन तेथील अधिसूचना काळजीपूर्वक वाचून घ्यावी आणि मग भरती प्रक्रियेसाठी अर्ज करायचा आहे.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Union public service commission released specialist recruitment for 322 various positions check out other deatils asp
Show comments