Union Public Service Commission- UPSC Recruitment 2024: केंद्रीय लोकसेवा आयोगाने सहाय्यक संचालक आणि इतर सहा रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. संस्थेतील सहाय्यक संचालकासह सहा विभागांतील १०० हून अधिक पदे भरण्यासाठी ही भरती मोहीम राबविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवार UPSC च्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जाऊन आपला अर्ज करू शकतात.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
१० फेब्रुवारीपासून नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे, तर २९ फेब्रुवारी २०२४ ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. अर्ज पूर्णपणे भरून सबमिट केल्यानंतर प्रिंटची अंतिम तारीख १ मार्च २०२४ आहे.
रिक्त पदांची संख्या
एकूण १२० रिक्त पदांवर भरती केली जाणार आहे. याच रिक्त पदांचा तपशील खालीलप्रमाणे –
१) सहाय्यक संचालक: ५१ पदे
२) प्रशासकीय अधिकारी : २ पदे
३) सायंटिस्ट-B (Physical-Civil): ०१ पद
४) सायंटिस्ट-B : ०९
५) सायंटिस्ट-B (Environmental Science) : ०२
६) स्पेशलिस्ट ग्रेड III: ५४ पदे
७) अभियंता आणि जहाज सर्वेक्षक सह उपमहासंचालक: १ पद
शैक्षणिक पात्रता
१) सहाय्यक संचालक
इंजिनिअरिंग पदवी (Civil/ Mechanical/Computer Science/ Information Technology/ Aeronautical / Electrical/ Electronics) आणि २ वर्षे कामाचा अनुभव किंवा पदव्युत्तर पदवी (Electronics/ Physics) आणि ०२ वर्षे कामाचा अनुभव किंवा B.Sc.(Physics/ Electronics) आणि ०५ वर्षे कामाचा अनुभव
२) प्रशासकीय अधिकारी
कोणत्याही विषयात पदवीधर आणि ०३ वर्षे कामाचा अनुभव
३) सायंटिस्ट-B (Physical-Civil)
M.Sc (Physics/Chemistry) आणि ०१ वर्षे कामाचा अनुभव किंवा B.E/B.Tech (Chemical Engineering/ Chemical Technology/ Civil Engineering) आणि ०२ वर्षे कामाचा अनुभव
४) सायंटिस्ट-B (Environmental Science)
M.Sc (Environmental Science) आणि ०३ वर्षे कामाचा अनुभव
५) सायंटिस्ट-B : ०९
M.Sc (Zoology) आणि ०३ वर्षे कामाचा अनुभव
६) स्पेशलिस्ट ग्रेड III
MBBS, M.Ch./MD आणि ०३ वर्षे कामाचा अनुभव
७) अभियंता आणि जहाज सर्वेक्षक सह उपमहासंचालक: १ पद
सागरी अभियंता अधिकारी वर्ग-१ यांचे योग्यतेचे प्रमाणपत्र आणि पाच वर्षे अनुभव.
वयाची अट
या पदांसाठी वयाची किमान मर्यादा ३५ आणि कमाल ४५ पर्यंत आहे. पण, प्रत्येक पदानुसार ती वेगळी आहे, त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने वयोमर्यादेबाबत योग्य माहिती घ्यावी.
(२९ फेब्रुवारी २०२४ रोजी, [SC/ST: ०५ वर्षे सूट, ओबीसी: ०३ वर्षे सूट)
अर्ज फी
अर्ज करण्यासाठी, सर्व उमेदवारांना २५ रुपये अर्ज शुल्क जमा करावे लागेल. पण, अपंग महिला/SC/ST/उमेदवारांना अर्ज शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.
उमेदवार SBI च्या कोणत्याही शाखेत रोखीने किंवा कोणत्याही बँकेच्या नेट बँकिंग सुविधेचा वापर करून किंवा व्हिसा/मास्टर/रुपे/क्रेडिट/डेबिट कार्ड/UPI द्वारे शुल्क भरू शकतात.
महत्वाच्या लिंक्स
१) UPSC ची अधिकृत वेबसाईट
२) UPSC भरती प्रक्रियेची जाहिरात
३) UPSC भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज