या लेखात आपण प्राचीन भारताच्या इतिहाचा यूपीएससी पूर्वपरीक्षेच्या दृष्टीने आढावा घेणार आहोत.मध्ययुगीन भारताचा इतिहास लक्षात घेता; त्यामानाने प्राचीन भारताच्या इतिहासावर अधिक प्रश्न विचारण्याची आयोगाची वृत्ती आपणास दिसून येते. त्यामुळे या विषयावर भर देणे अपेक्षित आहे. बहुतेक विद्यार्थी या विषयाला गांभीर्याने घेताना दिसून येत नाहीत किंवा ते तेवढ्यापुरते शॉर्टकट शोधून अभ्यास करतात. परंतु २०२०, २०२३, २०२२, २०२१ व २०१६ ही पूर्वपरीक्षा बघितली तर त्यात अनुक्रमे १०, ९, ८, ७, ७ इतके प्रश्न विचारलेले दिसून येतात. ही संख्या पूर्वपरीक्षेत यश मिळविण्याच्या दृष्टीने नक्कीच महत्त्वाची आहे. प्राचीन भारताचा इतिहास अभ्यासताना या विषयाचा अभ्यासक्रम समजून घ्या. त्यावर विचारलेले प्रश्न व त्यांचे स्वरूप लक्षात घेवून त्यानुसार स्वत:च्या नोट्स काढा. जुने व नवे (थीम्स) एनसीआरटी यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या १० वर्षातील जीएस पेपरमधील १०० पैकी मध्ययुगीन भारताच्या इतिहासचे प्रश्न

वर्ष प्रश्न वर्ष प्रश्न

२०२४ ५ २०१९ ४

२०२३ ९ २०१८ ३

२०२२ ८ २०१७ ४

२०२१ ७ २०१६ ७

२०२० १० २०१५ १

प्राचीन भारताचा इतिहास अभ्यासताना पुढील घटकांचा अभ्यास अपेक्षित आहे.

● पूर्व ऐतिहासिक काळ-भारतीय प्राचीन इतिहासाची कालगणना, प्राचीन इतिहासाचे स्राोत, पैलियोलिथिक, मेसोलिथिक, निओलिथिक काळ, तांबे-पाषाण युग, प्रारंभिक लोहाचा काळ, भौगोलिक वितरण आणि वैशिष्ट्ये.

● सिंधु झ्र सरस्वती संस्कृती (हडप्पा संस्कृती) – महत्त्वाची ठिकाणे, नगराची योजना, समाज आणि संस्कृती, लिपि आणि भाषा, सील आणि प्रतिमा, अर्थव्यवस्था, कृषी, पशुपालन, हरप्पा संस्कृतीचे पतन.

● वेदिक काळ व उत्तर वेदिक काळ -समाज आणि संस्कृती स्त्रोत, राजकीय संघटन, सामाजिक संस्था, आर्थिक व्यवस्था, धार्मिक संस्कृती.

● जैन धर्म- वर्धमान महावीराचा काळ (५४० झ्र४६८ ई.पू.), त्यांची शिकवण, जैन धर्माची संघटना आणि पंथ, जैन धर्माचे साहित्यव साहित्य परिषदा, प्रसार आणि राजेशाही संरक्षक.

● बौद्ध धर्म- गौतम बुद्धाचा काळ (५६३ -४८३ ई.पू.), त्यांची शिकवण, बौद्ध धर्माचे संघटन आणि पंथ, बौद्ध धर्माचे साहित्यव साहित्य परिषदा, प्रसार आणि राजकीय पाठबळ व अवनतीची कारणे.

● १६ महाजनपदे – गणतंत्र व राजेशाही महाजनपदे, महत्त्वाचे राजवंश झ्रहर्यंक; शिशुनाग; नंद, पर्शियन आक्रमण, अलेक्झांडरचे आक्रमण, समाज आणि शहरी केंद्रांचा उदय, आर्थिक व्यवस्था, प्रशासकीय प्रणाली.

● मौर्य साम्राज्य- स्राोत, मौर्यांचे शासक आणि राजकीय इतिहास, चाणक्य व मेगस्थनीज, सम्राट अशोक आणि त्याचे उत्तराधिकारी, मौर्य प्रशासन, विदेश संबंध, मौर्यांची अधोगती.

● मौर्यानंतरचा भारत- सातवाहन, शुंग आणि कण्व, शक, कुशाण, कनिष्क.

● गुप्त काळ – स्राोत, शासक आणि राजकीय इतिहास कालक्रम, विदेशी प्रवासी, प्रशासन, इतर महत्त्वाच्या राजवंशांची माहिती, समाज, धर्म आणि संस्कृती, गुप्ता कालातील शहरी केंद्रे, अर्थव्यवस्था, विज्ञान आणि तंत्रज्ञान, साहित्य.

● हर्षवर्धनाचा काळ- प्रशासन, समाज आणि संस्कृती, अर्थव्यवस्था.

● संगम काळ – संगम साहित्य, दक्षिण भारतीय राजघराणे झ्रचोळ; चेर; पांड्या, राजनिती; समाज आणि संस्कृती, अर्थव्यवस्था, परकीय राजघराणे, विदेश संबंध, कला.

वरील घटकांना खालील ४ भागात वर्गीकृत करण्यात आले आहे. त्यावरून त्यांचे पूर्वपरीक्षेतील त्यांचे महत्त्व लक्षात येईल –

२०११ ते २०२४ मधील घटकनिहाय प्रश्न

घटक प्रश्न संख्या

१. राजकारणआणिसमाज २४

२. धर्मआणितत्त्वज्ञान २४

३.स्थापत्यशैली २२

४. साहित्य ११

प्राचीन भारताचा इतिहास’ याबाबत आयोगाने विचारलेले प्रश्न समजून घेवूयात झ्र

प्र.खालील राजवंशांचा विचार करा:

१. होयसाळा २. गहडवाला

३. काकतीय ४ . यादव

उपलब्ध राजवंशांपैकी किती राजवंशांनी ईसवी सनाच्या आठव्या शतकात आपली राज्ये स्थापन केली?

अ) फक्त एक ब) फक्त दोन

क) फक्त तीन ड) यापैकी नाही

२०२३ च्या पूर्वपरीक्षेतील हा प्रश्न असून यात राजवंश व त्यांचा काळ विचारलेला आहे. अभ्यास करताना राजवंश, त्यांचा काळ, त्या वेळचा समाज; संस्कृती व प्रशासन इ. चा अभ्यास करणे अपेक्षित आहे.

प्र. खालील गोष्टी विचारात घ्या:

आर्कियोलॉजिकल साइट झ्र राज्य झ्र वर्णन

१. चंद्रकेतुगड झ्र ओडिशा झ्र व्यापार बंदर शहर

२. इनामगांव झ्र महाराष्ट्र झ्र कांस्य युगाचे ठिकाण

३. मंगाडू झ्र केरळ झ्र मेगालिथिक साइट

४. सालीहुंडम झ्र आंध्र प्रदेश झ्र खडकात कोरलेले गुहा तीर्थस्थळे

वरील कोणत्या रांगेत दिलेली माहिती योग्यरीत्या सामाविष्ट केली आहे?

अ) १ व २ ब) २ व ३

क) ३ व ४ ड) १ व ४

२०२४ मधील पूर्वपरीक्षेतील हा प्रश्न प्राचीन भारतातील महत्त्वाच्या स्थळांवर विचारलेला आहे. प्राचीन भारतातील अशी ठिकाणे व त्यांचे महत्त्व आपल्याला माहित असणे अपेक्षित आहे. एनसीआरटीमधील मॅप यासाठी अभ्यासायला हवेत.

प्र. खालील विधानांचा विचार करा:

१. उपनिषदांमध्ये कोणत्याही नैतिक किंवा धार्मिक शिक्षण देणाऱ्या कथानाहीत.

२. उपनिषदे पुराणांपेक्षा पूर्वी रचण्यात आले.

वरील दिलेल्या विधानांपैकी कोणती/कोणती योग्य आहे/आहेत?

अ) फक्त १ ब) फक्त २

क) दोन्ही १ आणि २ ड) यापैकी नाही

२०२४ पूर्वपरीक्षेतील हा प्रश्न आपल्याला वेद, पुराणे,उपनिषदे यांचा अभ्यास करताना त्यांचा काळ तसेच त्यात समाविष्ट घटकांची माहिती समजून घ्यायला सांगतो.

‘प्राचीन भारताचा इतिहास’ समजून घेताना चालू घडामोडींचाही अभ्यास आपण करायला हवा. उदा. हडप्पा संस्कृतीचा उल्लेख ‘सिंधु झ्र सरस्वती संस्कृती’ म्हणून करणे, तमिळनाडू राज्य सरकारने हडप्पा लिपीचा शोध घेण्यासाठी बक्षीसाची घोषणा करणे. अशा घटकांवर प्रश्न विचारले जाण्याची शक्यता अधिक असते. भेटूया पुढच्या लेखात – ‘कला व संस्कृती’ समजून घेण्यासाठी.

sushilbari10 @gmail. com

● जेईई मेन २०२५ च्या दुसऱ्या सत्रासाठी अर्ज करण्यासाठी २५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ९ वाजेपर्यंतची मुदत आहे. विद्यार्थ्यांना या दिवशी रात्री ११.५० वाजेपर्यंत शुल्क भरता येईल. २७ आणि २८ फेब्रुवारी या दोन दिवशी अर्जात सुधारणा करता येईल. ही परीक्षा १ ते ८ एप्रिल या कालावधीत होणार आहे. अर्जासाठी संकेतस्थळ – jeemain. nta. nic. in

● सीयूईटी यूजी २०२५ साठी राष्ट्रीय परीक्षा संस्थेने (एनटीए) नवे संकेतस्थळ सुरू केले आहे. cuet. nta. nic. in या अधिकृत संकेतस्थळावरून उमेदवारांना या परीक्षेसंबंधीची सर्व महत्त्वाची माहिती मिळू शकेल. २०२५ च्या अर्जप्रक्रियेची घोषणाही लवकरच होईल.