– डॉ. मिलिंद आपटे

सर, माझे ग्रॅज्युएशन बी.ए. फायनल राज्यशास्त्र या विषयात सुरू आहे. माझा सीजीपीए ६.८ आहे. तसेच माझे दहावी व बारावीचे मार्क अनुक्रमे ६४ व ८२ आहेत. माझ्या गुणांकनानुसार मी कंबाईनची तयारी करावी की राज्यसेवेची तयारी करावी?

– सुनील कदम

दहावीतील गुणांपेक्षा बारावीतील गुण जास्त आहेत, म्हणजे तू बारावीतही कला शाखेचा विद्यार्थी असशील असा अंदाज येतोय. त्यामुळे मराठी भाषा जास्त चांगली असावी असं दिसतंय, पीजी राज्यशास्त्र विषयात सुरू करणे. चौफेर माहिती असावी. लक्ष्य राज्यसेवा परीक्षा डोळ्यासमोर ठेवून ठरवावे , कंबाईनच्या भानगडीत न पडता पूर्ण लक्ष्य राज्यसेवा ठेवावे. बाकी तयारी आतापर्यंत ‘करिअर वृतांत’मध्ये बरेचदा दिली आहे त्याचा उपयोग करावा.

मी सध्या बीएससी, एलएलबी पूर्ण केले आहे आणि एलएलएम शिकत आहे. त्याचबरोबर वकिलीचा सराव करत आहे. मी बीएससी फायनल वर्षाला असताना यूपीएससीची तयारी करत होतो, परंतु नंतर मी त्याचा अभ्यास सोडून दिला पण त्याची खंत आजही असून मला यूपीएससी करावी वाटते, मार्गदर्शन करावे.

– प्रणित भोजने

प्रणित, आता वय किती आहे याचा उल्लेख नाही, त्यामुळे किती वेळ द्यावा याचे गणित मांडता येणार नाही. पण वकिलीचा सराव सुरू केलाय तर त्याकडे लक्ष केंद्रित केल्यास पुढील तीन वर्षात नक्कीच प्रगती करशील. उल्लेख केल्याप्रमाणे यूपीएससीची तयारी करत होतास आणि सोडून दिलीस, आता वकिली करतोय आणि सोडून परत यूपीएससीचे विचार करतोय ही धरसोड वृत्ती असल्यास कशातच यश येणार नाही. सातत्य हा सर्वात अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे स्वत: जरा नीट विचार कर. आता यूपीएससी सुरू करून ही तीन वर्षे लागतीलच, त्यापेक्षा हातातील वकिलीकडे लक्ष केंद्रित केल्यास तीन वर्षांत नक्कीच एक आकार प्राप्त होईल.

careerloksatta@gmail.com