UPSC EPFO JTO Recruitment: केंद्रीय लोकसेवा आयोग युपीएससीने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) येथे कनिष्ठ भाषांतर अधिकारी (JTO) पदासाठी निवडलेल्या उमेदवारांची यादी प्रकाशित केली आहे. आयोगाने नामंजूर केलेल्या उमेदवारांचे रोल नंबरही प्रसिद्ध केले आहेत. तुम्ही या यादीमध्ये तुमच्या रोल नंबरवरुन तुमचे नाव पाहू शकता. तसेच ज्यांची निवड झाली नाहीये त्यांनी आयोगानं ३१ मार्चपर्यंतची एक संधी दिली आहे.

UPSC EPFO ​​JTO 2024: नाकारलेले उमेदवार आव्हान देऊ शकतात

schedule for postgraduate medical admissions announced after changing eligibility criteria
पात्रता निकष बदलल्यानंतर वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशासाठीचे वेळापत्रक जाहीर
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
important tips to filling upsc personality test application form
मुलाखतीच्या मुलखात : छंदांची माहिती भरतानाचे तारतम्य
ESIC Recruitment 2025
ESIC Recruitment 2025 : परीक्षेशिवाय ESICमध्ये नोकरीची संधी! महिन्याला मिळू शकतो १,३१,०६७ रुपयांपर्यंत पगार, जाणून कोण करू शकते अर्ज?
mpsc result latest marathi news
‘एमपीएससी’च्या समाज कल्याण अधिकारी पदाचा निकाल जाहीर, मात्र केवळ ‘या’ उमेदवारांना मुलाखतीची संधी
CET registration, students, Ticket facility, CET ,
सीईटी नोंदणीदरम्यान विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी ‘तिकीट सुविधा’
MPSC announced that it will now conduct screening exams for 33 posts of various types
मोठी बातमी: ‘एमपीएससी’कडून तब्बल ३३ पदांच्या चाळणी परीक्षेसाठी…
upsc exam preparation tips,
यूपीएससीची तयारी : सीसॅट पेपर

तथापि, ज्या उमेदवारांचा अर्ज मुलाखत फेरीसाठी नाकारण्यात आला आहे किंवा रद्द करण्यात आला आहे, ते त्यासाठी आव्हान देऊ शकतात.

आयोगाने म्हटले आहे की, ज्या उमेदवारांची निवड झाली नाही त्यांनी पुन्हा एकदा ३१ मार्चपर्यंत upsc.spc1@nic.in वर कागदोपत्र पुराव्यासह सादर करावे. कागदपत्रे स्पीड पोस्टाने अंडर सेक्रेटरी (SPC-I), रूम नंबर 3, मेन बिल्डिंग, UPSC, ढोलपूर हाऊस, शाहजहान रोड, नवी दिल्ली- 110069 या पत्त्यावर पाठवू शकता.३१ मार्चनंतर पुढील कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही. असे आयोगाने स्पष्ट केले आहे.मुलाखतीसाठी उमेदवारांची निवड करण्याच्या पद्धती, नाकारण्याची कारणे आणि तात्पुरती सूचना अधिसूचनेत नमूद केली आहेत. सर्व निवेदने आणि कागदपत्रे तपासली जातील आणि निकषांनुसार योग्य असल्याचे आढळल्यास, ते अर्ज शॉर्टलिस्ट केले जातील, असे आयोगाने सांगितले आहे.

आयोग उमेदवारांनी पाठवलेल्या सर्व निवेदने/कागदपत्रांची तपासणी करेल आणि जर कोणत्याही परिस्थितीत, त्यात नमूद केलेले कारण/निकषांनुसार आणि स्वीकारलेल्या पद्धतीनुसार योग्य असल्याचे आढळल्यास, अशा अर्जांची निवड केली जाईल. त्यानंतर, सुधारित आणि अद्ययावत तपशील अधिकृत वेबसाइटवर अपलोड केले जातील.

या युपीएससी EPFO ​​भरती मोहिमेमध्ये कामगार आणि रोजगार मंत्रालय, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) मध्ये कनिष्ठ भाषांतर अधिकारी पदासाठी एकूण ८६ रिक्त जागा भरल्या जातील.

हेही वाचा >> सरकारी नोकरी करण्याची मोठी संधी, ‘या’ पदासाठी होणार भरती; जाणून घ्या संपूर्ण तपशील

निवडलेल्या उमेदवारांची यादी

Click to access 86_JTO_EPFO_Scru_Eng_20032024.pdf

आयोगाने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर ज्या उमेदवारांची उमेदवारी रद्द/नाकारली आहे त्यांची यादी देखील प्रसिद्ध केली आहे. या पदांसाठी अर्ज केलेले उमेदवार अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या रोल नंबरनुसार त्यांची स्थिती तपासू शकतात.

Story img Loader