UPSC– स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी झटणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष लेखांची मालिका आम्ही सुरू करत आहोत. यामध्ये नावाजलेले विद्वान विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. इतिहास, राजकारण, आंतरराष्ट्रीय संबंध, कला संस्कृती व वारसा, पर्यावरण, भूगोल, विज्ञान व तंत्रज्ञान असे अनेक विषय आपण समजून घेणार आहोत. या तज्ज्ञांच्या विद्वत्तेचा लाभ घ्या आणि स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी व्हा. या लेखात, मिथकशास्त्रात पारंगत असलेले प्रसिद्ध लेखक देवदत्त पट्टनायक भारतीय शास्त्रीय संगीत आणि पाश्चात्य संगीतातील फरक स्पष्ट करत आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
शिवाने गायन सुरु केले आणि विष्णू वितळले. त्यांचे शरीर गंगेच्या पाण्यात परिवर्तित झाले. रावणाने तंबोऱ्याचा शोध लावला. त्यासाठी त्याने स्वतःच्या हाडांपासून तंबोऱ्याचा सांधा, नसांपासून तारा आणि तंबोऱ्याच्या शीर्षस्थानी आपल्या शिराचा वापर केला. हिंदू लोककथांमध्ये अशा प्रकारच्या अनेक कथा आढळतात. परंतु बुद्ध किंवा जैन तीर्थंकर कधीही वाद्यासह दिसत नाहीत. संगीताचे संन्यासाशी कोणतेही नाते नव्हते. संगीत हे भक्ती संप्रदायातील संतांमध्ये लोकप्रिय होते. पारंपरिक ख्रिश्चन आणि मुस्लिम समाजांमध्ये देवाची स्तुती करणारी गाणी आणि भजन यांना वगळता संगीत पाप मानले जात असे. त्यामुळे संगीत हे एखाद्या विशिष्ट संस्कृतीबद्दल खूप काही सांगते.
भारतीय आणि पश्चिमी संगीत
भारतीय शास्त्रीय संगीत पाश्चिमात्य शास्त्रीय संगीतापेक्षा भिन्न आहे. भारतीय शास्त्रीय संगीत हे मेलडी किंवा एकेरी स्वरांवर आधारित आहे, यात एकजण (गायक) स्वर लावतो आणि इतर वादक किंवा गायक त्या स्वराचे अनुसरण करतात आणि त्याला साथ देतात. पाश्चिमात्य शास्त्रीय संगीत हे हार्मनीवर आधारित आहे. यात दोन संगीत ध्वनी एकमेकांशी संबंधित असतात आणि काउंटर पॉइंट्स तयार करतात. त्यामुळे पाश्चिमात्य शास्त्रीय संगीत हे ‘पॉलिफोनिक’ आहे. ज्यात वेगवेगळ्या ध्वनींचे संयोजन करून नवीन आणि वेगळ्या संगीतकल्पना निर्माण केल्या जातात. तर भारतीय संगीत हे ‘मोनोफोनिक’ आहे. जिथे एकाच सुरावर लक्ष केंद्रित केले जाते. भारतीय शास्त्रीय संगीत खूप मोठ्या प्रमाणावर ‘इम्प्रोवाइज्ड’ (तत्काळ रचना) असते. ज्यात आलाप किंवा ‘आ’ स्वरावर आधारित गायन समाविष्ट असते. जे मुक्त आणि असंरचित स्वरूपाचे असते. तर पाश्चात्त्य शास्त्रीय संगीत अधिक कठोर नियमांवर आधारित असून त्यामध्ये तत्काळ रचना करण्यास परवानगी नसते. जॅझ हे ‘इम्प्रोवायझेशन’वर आधारित आहे. हा आफ्रिकेमधून पाश्चात्त्य संगीतात आलेला एक नवा विचार आहे. पाश्चात्त्य शास्त्रीय संगीत सहजपणे लिहिले जाऊ शकते. मात्र, भारतीय शास्त्रीय संगीत लिहून ठेवणे कठीण असते. हे भारताच्या ‘मौखिक परंपरेला’ पाठ्यपरंपरेच्या तुलनेत अधिक महत्त्व देण्याची आठवण करून देते. भारतीय संगीतामध्ये सात स्वर किंवा नोट्स विविध क्रमांत वापरल्या जातात आणि त्यातून ‘राग’ तयार होतो. हा राग ‘ताल’ किंवा बीटवर गायला जातो. ज्यामुळे रस आणि भाव निर्माण होतात. प्रेक्षकांच्या संवेदना, भावना आणि मूडला प्रभावित करणारे अनुभव निर्माण होतात. रस आणि भाव हे संगीताचा भाग नसून ते ‘संगीताचा अनुभव’ आहेत. यामध्ये प्रेक्षक कलाकाराला इम्प्रोव्हाईज करण्यास (स्वतःहून नवीन घडवण्यास) मदत करतात. पाश्चिमात्य शास्त्रीय संगीताच्या बाबतीत प्रेक्षक असो किंवा नसो संगीत साधारणपणे एकसारखेच ऐकायला मिळते. रस आणि भाव यांना महत्त्व दिले जात नाही. उलट मूळ रचनेप्रती निष्ठा ठेवणे अधिक महत्त्वाचे मानले जाते.
अधिक वाचा: भारतीय नसलेल्या व्यक्तीला जातिव्यवस्था कशी समजावून सांगाल?
सामवेद: भारतीय संगीताचा प्रारंभिक पुरावा
संगीताचा उगम प्रागैतिहासिक काळात झाला. अश्मयुगात लोक दगडांवर प्रहार करून संगीत निर्माण करत. अशा प्रकारचे दगड ओडिशामध्ये पुरातत्त्वशास्त्रज्ञांनी शोधून काढले आहेत. त्यानंतर तंतुवाद्यांची निर्मिती झाली. इतिहासाच्या दृष्टीने हडप्पा संस्कृतीतील एका शिक्क्यावर सात लोक एकसारखी वस्त्रे घालून एका झाडाभोवती नृत्य करताना दर्शविले आहेत. याबरोबर संगीतही असावे अशी शक्यता व्यक्त केली जाते. वाद्ये सेंद्रिय पदार्थांपासून तयार केली जात असल्यामुळे ती टिकून राहात नव्हती . त्यामुळे आपल्याला हडप्पा संस्कृतीतील मातीची वाद्ये सापडलेली नाहीत. परंतु, हडप्पा लोक सुमेरियन लोकांशी व्यापार करत असत आणि त्यांनी सुमेरियन थडग्यांमध्ये व त्यांच्या कलेत आढळणाऱ्या वीणेसारखी (हार्प) वाद्ये निर्यात केली असण्याची शक्यता आहे. भारतीय संगीताचा पहिला स्पष्ट पुरावा सामवेदातून (इ.स.पू. १००० नंतर) मिळतो. सामवेद ऋग्वेदातील ऋचांना संगीताच्या रूपात सादर करतो. गंधर्व म्हणजेच दैवी संगीतकार संगीत वाजवत असल्याचा उल्लेखही वेदांमध्ये आहे. संस्कृत नाटकांमध्ये संगीतकार राजांचे मनोरंजन करत असल्याचे वर्णन आढळते. हिंदू मंदिरांच्या भिंतींवर आणि बौद्ध लेणींमध्ये महिला संगीतकारांच्या शिल्पकृती आढळतात. यातून संगीत त्या काळी महत्त्वाचा सांस्कृतिक भाग असल्याचे सिद्ध होते.
इस्लामचे आगमन आणि संगीतातील मोठा बदल
इस्लामच्या भारतात आगमनानंतर संगीत क्षेत्रात मोठा बदल झाला. पर्शियन संगीत परंपरा भारतात आली. त्यामुळे प्राचीन आणि पारंपरिक दक्षिण भारतीय (कर्नाटक) संगीत प्रणालीपासून वेगळ्या असलेल्या उत्तर भारतीय (हिंदुस्तानी) संगीत प्रणालीचा उदय झाला. हिंदुस्तानी संगीताला राजवाड्यांमध्ये आणि घराण्यांमध्ये आश्रय मिळाला. तसेच उच्चभ्रू तवायफ (नाचगाण्यात प्रवीण दरबारी महिला) यांच्याकडूनही प्रोत्साहन मिळाले. कर्नाटक संगीताला मात्र मुख्यतः मंदिरांमध्ये आणि देवदासी कुटुंबांमध्ये आश्रय मिळत राहिला.
ब्रिटिश कालखंड आणि संगीताचा प्रभाव
ब्रिटिशांबरोबर ऑर्केस्ट्रा आणि सैन्याचे बँड भारतात आले. भारतीय सैन्याचा नेहमीच ढोल आणि बिगुलशी संबंध होता. परंतु, ब्रिटिश सैन्याच्या बँडच्या आगमनामुळे दक्षिण भारतीय संगीतकारांवर मोठा प्रभाव पडला. कर्नाटक संगीताला समृद्ध करणाऱ्या त्रिमूर्तींचा उदय देखील याच काळात झाला. १८व्या शतकात त्यागराजा, मुथुस्वामी दीक्षितर आणि श्यामा शास्त्री या तीन संगीतकारांनी कर्नाटक संगीताला अभूतपूर्व योगदान दिले.
अधिक वाचा: हडप्पा ते चोल कालखंड: भारतीय शिल्पकृती इतिहास कसा उलगडतात?
भारतीय संगीत परंपरेला देवदासी आणि तवायफ यांचा आधार
भारतीय संगीत परंपरेला दक्षिणेत देवदासी आणि उत्तर भारतात तवायफ महिलांनी आधार दिला. उदाहरणार्थ, बंगळुरू नागरत्नम्मा यांनी त्यागराजा यांचे मंदिर उभारले. उत्तर भारतात गौहर जान या भारतात ७८ आरपीएम रेकॉर्डवर संगीत ध्वनिमुद्रित करणाऱ्या पहिल्या कलाकारांपैकी एक होत्या आणि बेगम अख्तर यांसारख्या व्यक्तींनी संगीताच्या क्षेत्रात महत्त्वाचे स्थान निर्माण केले. हा इतिहास अनेकदा विसरला जातो. तवायफ आणि देवदासी यांनी भारतीय संगीताला दिलेल्या अमूल्य योगदानाची दखल घेतली जात नाही.
संगीताची उपेक्षित परंपरा
संगीताची उपेक्षित परंपरा ही देखील बर्याचदा विसरली जाते. उदाहरणार्थ, पराई या वाद्याचा उल्लेख संगम साहित्यामध्ये आढळतो. हे वाद्य प्रामुख्याने दलित समाजाने वाजवले आहे. या वाद्याचा वापर घोषणांसाठी केला जाई आणि घोषणा करणाऱ्यांना परैयार असे म्हणत. परैयार या शब्दावरून इंग्रजी शब्द पेरिया (Pariah) तयार झाला आहे. अनेक संगीतकार आणि मनोरंजन करणाऱ्यांना हलक्या जातीचे म्हणून पाहिले जाई. त्यांची उपस्थिती केवळ विधी आणि सणांपुरतीच मर्यादित होती. त्यामुळे या उपेक्षित संगीत परंपरेला ऐतिहासिकदृष्ट्या योग्य तो मान मिळालेला नाही.
शास्त्रीय संगीत आणि लोकसंगीत
शास्त्रीय संगीत अधिक संरचित आणि नियमबद्ध असते. तर लोकसंगीत अंगाईगीतांपासून लग्नगीतांपर्यंत, बिहारचे बिरहा किंवा गुजरातचा गरबा अधिक मातीशी जोडलेले असते. लोकसंगीत सामान्य माणसाशी जोडलेले असते आणि त्यांच्या दैनंदिन प्रथा व विधी यांचे भावपूर्ण दर्शन घडवते. यामध्ये नावाड्यांची धून, शेतकऱ्यांचे ताल, लग्नाच्या गोड चाली आणि शोक व्यक्त करण्यासाठीच्या सुरेल स्वरांचा समावेश होतो. लोकसंगीत हा समाजाच्या हृदयाचा आवाज असतो. तो त्यांच्या जीवनशैलीला प्रकट करतो. असे म्हणतात की, राजासाठी कालिदास संस्कृतमध्ये काव्य रचत असे. परंतु, तो जेव्हा प्रवास करत असे तेव्हा लोक भाषेत गाणी रचत असे. कालिदास लोकसंगीतातील नौटंकी “सांगित” आणि मुख्य प्रवाहातील नाट्यशास्त्रीय “संगीत” या दोन्ही प्रकारांत निपुण होता. यामुळे लोकसंगीत आणि शास्त्रीय संगीत, देशी आणि मार्गी संगीत यांच्यात समान स्रोत आणि अनेक परस्पर संबंध असल्याचे दिसून येते. या संगीत प्रकारांनी एकमेकांना समृद्ध केले आणि भारतीय संगीत परंपरेला व्यापकतेची देणगी दिली.
अधिक वाचा: ‘एक फुटी कौडी… ते नाणी’; भारतातील नाण्यांचा आकर्षक इतिहास
भक्ती चळवळीला लोकप्रिय करण्यासाठी संगीताचा वापर
भारतामध्ये भक्ती चळवळीला लोकप्रिय करण्यासाठी संगीताचा महत्त्वपूर्ण वापर करण्यात आला. सीख गुरबाणीपासून महाराष्ट्रीय वारकरी परंपरेपर्यंत, जागरणे आणि रामायण कथनांपासून वैष्णव मणिपुरी ढोलांपर्यंत संगीताने देवदेवतांच्या कथा आणि कल्पना भारतीय ग्रामीण भागात पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. लोकपरंपरांमध्ये नौटंकी आणि जत्रा यांसारख्या नाटकांत रंगमंचावर गायक असत. या परंपरांनी पुढे चित्रपटांमध्ये प्लेबॅक सिंगिंग आणि बॅकग्राउंड स्कोर्सची सुरुवात केली. नूरजहाँ आणि लता मंगेशकर यांच्यापासून इलयराजा आणि एआर रहमान यांच्यापर्यंत संगीताने भारतीय कला आणि संस्कृतीला नवा आयाम दिला.
विषयाशी संबंधित प्रश्न
१. भारतीय शास्त्रीय संगीत आणि पश्चिमी शास्त्रीय संगीत यामध्ये सुरेलता (मेलडी) आणि हार्मनीच्या दृष्टिकोनातून कोणते महत्त्वाचे वैविध्य आढळते?
२. सामवेदाचा भारतीय संगीताच्या घडणीत आणि प्रगतीत काय महत्त्वाचा वाटा आहे?
३. भारतीय संस्कृतीत संगीताचा वापर धार्मिक आणि आध्यात्मिक विचारांचा प्रसार करण्यासाठी कसा केला गेला?
४. लोकसंगीत आणि शास्त्रीय संगीत प्रेक्षकांशी जोडले जाण्याच्या आणि भावनांच्या अभिव्यक्तीमध्ये एकमेकांपेक्षा कसे भिन्न आहेत?