यूपीएससी पूर्व परीक्षेत वेगवेगळ्या प्राणी प्रजातींवर प्रश्न विचारताना त्यांचा अधिवास, त्यांची वैशिष्ट्ये, आययूसीएन स्टेटस, वन्यजीव संरक्षण कायद्यातील त्यांचे स्थान इ. बाबींवर विशेष भर दिला जातो. India Environment Portal वर संकटग्रस्त प्राणी प्रजातींची यादी उपलब्ध आहे. याशिवाय चालू घडामोडीतील प्राणी प्रजातींचाही अभ्यास अपेक्षित आहे. जसे की – ‘भारतातील डॉल्फिन’.
नुकतीच राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची ७ वी बैठक गिर राष्ट्रीय उद्यानात झाली, जिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील पहिल्या डॉल्फिन जनगणना सर्वेक्षणाचे निकाल जाहीर केले. हे सर्वेक्षण पंतप्रधान मोदी यांनी १५ ऑगस्ट २०२० रोजी सुरू केलेल्या प्रोजेक्ट डॉल्फिनशी सुसंगत आहे, ज्याचा उद्देश संवर्धन प्रयत्नांना चालना देणे हा आहे.भारतातील पहिल्या विस्तृत डॉल्फिन जनगणना सर्वेक्षणानुसार, गंगा आणि ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यांमध्ये ६,३२४ ‘गंगा नदीतील डॉल्फिन’आढळले आहेत, तसेच पंजाबमधील बियास नदीच्या खोऱ्यात ३‘सिंधू नदीतील डॉल्फिन’ आढळले आहेत. २०२१ ते २०२३ दरम्यान केलेल्या या सर्वेक्षणामुळे भारतातील प्रमुख नद्यांमधील डॉल्फिनच्या संख्येचा सखोल अंदाज येतो.यामुळे आपण ‘गंगा नदीतील डॉल्फिन’ व ‘सिंधू नदीतील डॉल्फिन’ यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो.

२०२४ यूपीएससी पूर्वपरीक्षेत विचारलेला खालील प्रश्न बघा.
● प्र. खालील विधानांचा विचार करा:
विधान I : भारतीय फ्लाइंग फॉक्स यांना वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ मध्ये ‘उपद्रवी’ श्रेणी अंतर्गत ठेवले आहे.
विधान II : भारतीय फ्लाइंग फॉक्स इतर प्राण्यांचे रक्त पितात.
● उपरोक्त विधानांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे?
अ) विधान- I आणि विधान- II दोन्ही बरोबर आहेत आणि विधान- II, विधान- क चे स्पष्टीकरण आहे.
ब) विधान- I आणि विधान- II दोन्ही बरोबर आहेत, परंतु विधान- II, विधान- क चे स्पष्टीकरण नाही.
क) विधान- I बरोबर आहे, परंतु विधान- II चुकीचे आहे.
ड) विधान- I चुकीचे आहे, परंतु विधान- II बरोबर आहे.
‘भारतीय फ्लाइंग फॉक्स’म्हणजेच ‘ग्रेट इंडियन फ्रूट बॅट’ यांना वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ मध्ये ‘उपद्रवी’ श्रेणी अंतर्गत ठेवले आहे कारण यामुळे फळांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले जाते. दुसरे विधान चुकीचे असून नावावरूनच हे स्पष्ट होते की त्यांचे अन्न हे फळे आहे. ऑक्टोबर २०२३ मध्ये हे चर्चेत होते कारण मोठ्या प्रमाणावर बिबटे त्यांची शिकार करत होते. आयोगाने २०२४ च्या पूर्वपरीक्षेत प्रश्न विचारला.
● २०२३ युपीएससी पूर्वपरीक्षेत विचारलेला खालील प्रश्न बघा.
प्र. खालील विधानांचा विचार करा:
विधान- I: मार्सुपियल भारतात नैसर्गिकरित्या आढळत नाहीत.
विधान- II: मार्सुपियल केवळ पर्वतीय गवताळ प्रदेशातच वाढू शकतात, जिथे शिकारी प्राणी नाहीत.
● उपरोक्त विधानांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते योग्य आहे?
अ) विधान- I आणि विधान- II दोन्ही बरोबर आहेत आणि विधान- कक हे विधान- I चे योग्य स्पष्टीकरण आहे.
ब) विधान- I आणि विधान- II दोन्ही बरोबर आहेत आणि विधान- II हे विधान- I चे योग्य स्पष्टीकरण नाही.
क) विधान- I बरोबर आहे पण विधान- II चुकीचे आहे.
ड) विधान- I चुकीचे आहे पण विधान- II बरोबर आहे.
वर सांगितल्याप्रमाणे ‘अधिवास’यावर विचारलेला हा प्रश्न आहे. प्राण्यांसाठी अधिवास महत्त्वाचा असतो. जसे की भारतात आशियाई चित्ता होता जो नामशेष झाला. आता आपण भारतात आणलेला चित्ता हा आफ्रिकन चित्ता असून त्याचा अधिवास हा आफ्रिकेतील देश आहेत. त्यामुळेच त्यांच्या अधिवासाशी मिळतेजुळते मध्य प्रदेश मधील ‘कुनो राष्ट्रीय उद्यान’ आपण ‘चित्ता प्रकल्पा’साठी निवडले. या दोन्ही प्रजातींमधला फरक समजून घेऊयात –

आयोगाद्वारे विचारलेल्या प्रश्नात आययूसीएन स्टेटस हेही विचारले जाते. आययूसीएनची धोक्यात असलेल्या प्रजातींची लाल यादी ही प्रजातींच्या संवर्धन स्थितीची जागतिक यादी आहे, जी नामशेष होण्याच्या धोक्याचे मूल्यांकन करण्यासाठी आणि संवर्धन प्रयत्नांना मार्गदर्शन करण्यासाठी ‘जीवनाचे बॅरोमीटर’ म्हणून काम करते. यातील वर्गीकरणाप्रमाणे प्राणी प्रजातीचे आययूसीएन स्टेटस लक्षात घ्यावे लागते. प्राणी प्रजातींवर नियमित प्रश्न असल्याने या घटकाचा अभ्यास चांगला करा.
sushilbari10 @gmail. com