यूपीएससी नागरी सेवा परीक्षेचे तीन टप्पे म्हणजे पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखत होय. यामधील पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी अर्थशास्त्रा विषयाची तयारी कशी करावी, याची माहिती आपण या लेखात घेणार आहोत. पूर्व परीक्षेसाठी अर्थशास्त्र हा प्रमुख विषय मानला जातो. दरवर्षी ॅर मध्ये १०० पैकी किमान १५ ते कमाल ३० प्रश्न अर्थशास्त्रावर विचारलेले असतात, यावरून अर्थशास्त्राचे या परीक्षेतील महत्त्व समजते. तर मुख्य परीक्षेतील ॅर 3 या पेपरमध्ये साधारण १२० ते १३० मार्कांचे प्रश्न आपल्याला अर्थशास्त्र विषयावर पाहावयास मिळतात. यावरून दोन्ही टप्प्यांवर अर्थशास्त्रा विषयाचे महत्त्व स्पष्ट होते.

अर्थशास्त्र विषयाच्या तयारीची सुरवात अभ्यासक्रम समजून घेण्यापासून करावी. यूपीएससी पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम जितका अपूर्ण पद्धतीने दिला गेला आहे तितकाच विस्तृत व निश्चित असा अभ्यासक्रम मुख्य परीक्षेसाठी दिला गेला आहे. मुख्य परीक्षेत विचारले गेलेले प्रश्न बहुतांश वेळा अभ्यासक्रमाच्या कक्षेमध्येच विचारले जातात. परंतु हे प्रश्न सरळरीतीने न विचारता विविध मूलभूत संकल्पनांच्या परस्पर संबंधांवर अथवा अनुप्रयोगांवर (Concept Application) अवलंबून असतात. त्याचबरोबर चालू घडामोडींमध्ये चर्चेत असलेल्या विषयांवर देखील प्रश्न विचारलेले दिसून येतात. बहुतांश वेळा चालू घडामोडींमध्ये चर्चेत असलेल्या विषयाच्या मुळाशी जाऊन ज्या मूलभूत संकल्पनेवर तो विषय अवलंबून आहे अशा मूलभूत संकल्पनेवर प्रश्न विचारले जातात.

Loksatta editorial on Gau rakshak killed Brahmin boy Aryan Mishra in Faridabad
अग्रलेख: वाद आणि दहशत
Amitabh Bachchan And Rajesh Khanna
“आम्ही अमिताभ बच्चन यांना आणून राजेश खन्नाचे करिअर…
kedar Dighe on Anand Dighe
Anand Dighe Death Case : “आनंद दिघेंचा घात झालाय”, शिरसाटांच्या विधानावर केदार दिघेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “माझी तयारी आहे की…”
charges on upi payments
‘…तर ७५ टक्के युजर UPI पेमेंट करणं बंद करतील’, ताज्या सर्व्हेमधून समोर आले निष्कर्ष!
Who is WWE Wrestler Kavita Dalal Julana Assembly seat election
Vinesh Phogat vs Kavita Dalal: विनेश फोगटच्या विरोधात उतरली सलवार सूटमधील कुस्तीपटू; निवडणुकीच्या आखाड्यात कुणाचा विजय?
Govandi honour-killing case
Govandi honour-killing case: हिंदू मुलाशी मुस्लीम मुलीने लग्न केल्यामुळे दोघांचे ऑनर किलिंग; चार अल्पवयीन आरोपींवर प्रौढ म्हणून खटला चालणार
Akshay Shinde Encounter Case Bombay High Court Hearing Updates in Marathi
Mumbai High Court on Akshay Shinde Encounter Case : “हे एन्काउंटर असू शकत नाही”, अक्षय शिंदे मृत्यूप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचे ताशेरे!
Sarpanch Upasarpanch Salary
Sarpanch Salary Hike : सरपंच आणि उपसरपंचांच्या मानधनात दुप्पट वाढ; राज्य सरकारचे २४ मोठे निर्णय

हेही वाचा : नोकरीची संधी: स्टेट बँक ऑफ इंडियातील संधि

अर्थशास्त्राचा अभ्यास करताना पूर्व परीक्षेचा वेगळा व मुख्य परीक्षेचा वेगळा असा अभ्यास करू नये. अर्थशास्त्राच्या संकल्पना एकमेकांशी अतिशय संलग्न असल्याने त्यांचे विभाजन करून अभ्यास करणे चुकीचे ठरू शकते व संकल्पनांच्या अनुप्रयोगांमध्ये अडचण येऊ शकते. त्यामुळे एकंदरच अर्थशास्त्राचा अभ्यास एकात्मिक पद्धतीने करावयास हवा. अर्थशास्त्राचे असे गतिशील (डायनॅमिक) स्वरूप असल्यामुळे या विषयाची तयारी विशिष्ट पद्धतीनेच करावी लागते. या पद्धतीला एका प्रक्रियेचे स्वरूप देऊन ते आत्मसात करणे परीक्षार्थीना गरजेचे असते. या प्रक्रियेचा पहिला टप्पा म्हणजे वर उल्लेख केल्याप्रमाणे अभ्यासक्रम समजून घेणे. अभ्यासक्रम समजून घेताना अभ्यासक्रमातील प्रत्येक संकल्पनेची व्याप्ती समजून घेणे गरजेचे असते. त्यासाठी प्राथमिक पातळीवर अर्थशास्त्राचा अभ्यास असणे ही पूर्व अट आहे. परंतु या ऐवजी यूट्यूबवर उप्लब्ध्र ५ीि२ पाहून विद्यार्थी प्राथमिक पातळीवर अभ्यास न करता मागील वर्षीच्या प्रश्नांचे विश्लेषण करण्यापासून सुरवात करतात. परंतु जर संकल्पना व त्यांची व्याप्ती स्पष्ट नसेल तर त्याचे विश्लेषण कसे करता येईल? यासाठी अर्थव्यवस्थेच्या मूलभूत संकल्पना समजून घेणे गरजेचे आहे. त्या समजून घेण्यासाठी NCERT ची इयत्ता नववी ते बारावी पर्यंतची पुस्तके वाचणे किंवा तमिळनाडू बोर्डाची पुस्तके वाचणे फायद्याचे ठरू शकते.

Basics ची अशा पद्धतीने ओळख झाल्यावर मग मागील वर्षीच्या प्रश्नांचे विश्लेषण केले जाऊ शकते. ते करत असताना बाजारातील रेडीमेड पुस्तकांची देखील मदत घेतली जाऊ शकते. या विश्लेषणातून व यूपीएससीने दिलेल्या अभ्यासक्रमावरून टॉपिक्स व त्या अंतर्गत येणारे सब-टॉपिक्स यांची विस्तृत यादी करणे गरजेचे असते. या सर्व प्रक्रियेतून अर्थशास्त्राचा विस्तृत अभ्यासक्रम बनवावा. या सर्व टॉपिक्स व सबटॉपिक्सचा अभ्यास संदर्भ साहित्यामधून विस्तृत स्वरुपात करावा. ठरवलेला अभ्यास करत असताना संकल्पनांची स्पष्टता, त्यांचे अनुप्रयोग (Application) समजून घेणे गरजेचे आहे. हे सर्व अर्थशास्त्राचा अर्धाच भाग पूर्ण करतात.

हेही वाचा : अपघातात गमावले दोन्ही पाय पण पठ्ठ्याने जिद्द सोडली नाही; IIT-JEE परीक्षा उत्तीर्ण करत मिळवली गुगलमध्ये नोकरी, नागा नरेशचा प्रेरणादायी प्रवास एकदा वाचाच

यूपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी अर्थशास्त्राचा आणखी एक पैलू म्हणजे अर्थव्यवस्थे संबंधातील चालू घडामोडी. हाच पैलू अर्थशास्त्राला डायनॅमिक बनवतो. चालू घडामोडींचा मागोवा घेणे आणि त्यांची मूलभूत संकल्पनांशी असलेली जोडणी व दोन्हींचे अनुप्रयोग समजून घेणे महत्त्वाचे असते. इथे अर्थशास्त्राचा अभ्यास करणे आव्हानात्मक बनते. यासाठी वर सांगितल्याप्रमाणे अर्थशास्त्र विषयाच्या अभ्यासाची एक प्रक्रिया बनवावी लागते, व अतिशय शिस्तपूर्वक पद्धतीने त्या प्रक्रियेची अंमलबजावणी करावी लागते. चालू घडामोडींचा योग्य पद्धतीने मागोवा घेण्यासाठी रोजचे वृत्तपत्र वाचन करणे गरजेचे असते. अशात मराठी माध्यामातून वढरउ ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मराठी वृत्तपत्रासोबत इंग्रजी वृत्तपत्र वाचणे देखील गरजेचे असते. मराठी मधील लोकसत्ता व इंग्रजीमध्ये The Hindu अथवा Indian Express पैकी कोणतेही वृत्तपत्र वाचावे. वृत्तपत्र वाचताना त्यामधील घडामोडींच्या मुळाशी जाऊन त्या घडामोडी ज्या संकल्पनांवर आधारित आहेत त्या अभ्यासणे अतिशय फायद्याचे ठरू शकते. वृत्तपत्र वाचन हे सुरुवातीला फार वेळखाऊ व कंटाळवाणे वाटते. त्यामुळे वृत्तपत्र वाचन टाळून विद्यार्थी बाजारातील रेडीमेड मॅगझिन्सचा वापर करतात. परंतु यामुळे जे विश्लेषणात्मक कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये विकसित होणे अपेक्षित असते ते होत नाही व त्याचा तोटा मुख्य परीक्षेत प्रश्नांचे विश्लेषण करताना होतो. वृत्तपत्र वाचनाची पद्धत व काही युक्त्या अंमलात आणल्यास वृत्तपत्र वाचनाचा वेळ कमी होऊ शकतो. अशा पद्धतीने तयारी केल्यास अर्थशास्त्र हा विषय यूपीएससी परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवून देऊन आपला यशाचा मार्ग सुनिश्चित करण्यास मदत करतो.

आपल्या प्रतिक्रियांसाठी आमचा ई-पत्ता : careerloksatta@gmail. com