नव्या वर्षात अनेक तरुणतरुणी यूपीएससी परीक्षा देऊन आपली क्षमता अजमावणार आहेत. या युवा वर्गासाठी यूपीएससीची तयारी अगदी सुरुवातीपासून कशी करायची त्याचे मार्गदर्शन दर मंगळवारी आणि गुरुवारी डॉ. सुशील बारी या लेखमालेतून करणार आहेत. यात जानेवारी ते मे २०१५ पर्यंत पूर्वपरीक्षेची तयारी, अभ्यासक्रम, विश्लेषण, संभाव्य विषय, गतवर्षींचे प्रश्न यांचा उहापोह होईल. जून ते डिसेंबर २०२५ या कालावधीत मुख्य परीक्षेच्या एकूण ९ पेपर्सचे अभ्यासक्रम, विश्लेषण, बंधनकारक आणि पर्यायी विषयांची रणनिती, संभाव्य प्रश्न आदींविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे.

विद्यार्थी मित्रांनो, या सदरातून आपण UPSCच्या परीक्षेबाबत इत्थंभूत माहिती घेणार आहोत.दि. २५ मे २०२५ रोजी UPSC पूर्वपरीक्षा होणार असून त्यासंबंधीचे ‘ Notification’१२ जानेवारी रोजी UPSC द्वारे काढले जाईल. UPSC ची परीक्षा एकूण ३ टप्प्यात पार पडते – पूर्वपरीक्षा, मुख्यपरीक्षा व मुलाखत. या परीक्षेद्वारे IAS, IPS, IFS, IRS इ. विविध २१ सेवांकरिता UPSC उमेदवारांची शिफारस करते.

mpsc exam loksatta
नोकरीची संधी : आयोगाच्या अर्जांना मुदतवाढ
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
mpsc exam result list announced social welfare category
वादात सापडलेल्या एमपीएससीच्या या परीक्षेची उत्तरतालिक जाहीर, हरकतीसाठी मुदत…
CBSE Recruitment 2025: Registration for 212 Superintendent & Junior Assistant posts
१२ वी पास तरुणांसाठी नव्या वर्षात सरकारी नोकरीची संधी; CBSE मध्ये २१२ रिक्त जागांसाठी भरती, अर्ज कुठे अन् कसा कराल?
mpsc exam new pattern loksatta
MPSC मंत्र : नव्या पॅटर्नची प्रतीक्षा
education abroad loksatta
दूरदेशीच्या ज्ञानवाटा : परदेशातील उच्चशिक्षण एक उत्तम पर्याय
mpsc comfort zone loksatta
MPSC मंत्र : ‘कम्फर्ट झोन’च्या बाहेर
government job opportunity MPSC conducted Various exams
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! तब्बल दोन हजार पदांसाठी अर्ज करण्यास काहीच दिवस शिल्लक

पात्रता :

१. नागरिकत्व: IAS, IPS, IFS या सेवांसाठी उमेदवार भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे. इतर सेवांसाठी Subject of Nepal / Bhutan इत्यादींनाही पात्र ठरविले आहे.

२. शिक्षण: उमेदवाराचे किमान ‘पदवी’पर्यंतचे शिक्षण पूर्ण असावे. पदवीच्या अंतिम वर्षातील उमेदवारही परीक्षेसाठी पात्र असतो, परंतु उमेदवाराला मुख्यपरीक्षेआधी पदवी उत्तीर्ण झाल्याचा पुरावा देणे बंधनकारक आहे.

३.वय :

४.परीक्षा शुल्क :

परीक्षेचे तीन टप्पे :

१. पूर्व परीक्षा: पूर्व परीक्षेत GS (GeneralStudies) व CSAT (Civil Services Aptitude Test) हे दोन पेपर Objective – MCQ स्वरूपाचे असतात. यात CSAT पेपर हा पात्रतेचा असून त्यात २०० पैकी ६ गुण घेणे अपेक्षित आहे. गुणवत्ता यादीसाठी केवळ GS चे गुण ग्राह्य धरले जातात.

नोट: ही पूर्वपरीक्षा UPSC नागरी परीक्षेसह भारतीय वनसेवेसाठी (IFoS) सामायिक पूर्वपरीक्षा आहे.

२. मुख्य परीक्षा: ही लेखी स्वरूपाची (Descriptive) परीक्षा आहे. यात एकूण ९ पेपर असून त्यातील भाषा विषयाचे दोन पात्रतेचे पेपर तर इतर ७ पेपर हे गुणवत्ता यादीसाठी ग्राह्य धरले जातात.

मुख्य परीक्षेसाठी माध्यम : मुख्य परीक्षेतही पूर्व परीक्षेप्रमाणे ‘इंग्रजी’ व ‘हिंदी’ या दोन्ही भाषेत प्रश्न विचारले जातात. उत्तर लिहिण्यासाठी उमेदवारपात्रतेचे पेपर सोडून इतर पेपरसाठी इंग्रजी वा भारतीय संविधानाच्या ८व्या परिशिष्टातील कोणत्याही भाषेची निवड करू शकतो. जरी उमेदवाराने पेपर I ते V साठी ८व्या परिशिष्टातील कोणतीही भाषा निवडली असेल तरी तो वैकल्पिक विषयासाठी इंग्रजी भाषेची निवड करू शकतो. महाराष्ट्रातील विद्यार्थी हे ‘मराठी’ भाषेतूनदेखील UPSCची मुख्य परीक्षा लिहू शकतात.

३. मुलाखत (२७५ गुण) : मुलाखतीला‘ Personality Test’ असे संबोधले आहे. उमेदवाराच्या‘व्यक्तिमत्त्वाचे परीक्षण’इथे अपेक्षित आहे. उमेदवाराचे ‘ज्ञान’ हे ‘पूर्व’ व ‘मुख्य’ परीक्षेच्या आधारे UPSCने आधीच तपासलेले असते.

मुख्य परीक्षेतील १७५० व मुलाखतीचे २७५ गुण म्हणजेच एकूण २०२५ गुणांच्या आधारे उमेदवारांची अंतिम गुणवत्ता यादी लावली जाते. दरवर्षी साधारणपणे ८०० ते १००० इतक्या पदांसाठी ही परीक्षा घेतली जाते.

एखादा उमेदवार ही परीक्षा किती वेळा देऊ शकतो (Attempts) हे जाणून घेऊयात:

परीक्षा केंद्रे : २०२४ मध्ये संपूर्ण भारतात UPSC पूर्व परीक्षा एकूण ८० परीक्षा केंद्रांवर तर मुख्य परीक्षा २४ परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली.

महाराष्ट्रातील परीक्षा केंद्रे :

पूर्व परीक्षा (७)- मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक

मुख्य परीक्षा: मुंबई

हाच अभ्यासक्रम व परीक्षेचे स्वरूप सन २०२५ पासून MPSC राज्यसेवा परीक्षेसाठी लागू असणार आहे. त्यामुळे २०२५ पासून UPSC बरोबर राज्यसेवेतही यश मिळवण्याची दुहेरी संधी विद्यार्थ्यांनी समजून घ्यावी. पुढील लेखात आपण पूर्व परीक्षेतील अभ्यासक्रम व त्यासाठीची संदर्भ पुस्तके जाणून घेणार आहोत.

sushilbari10 @gmail. com

Story img Loader