देवदत्त पट्टनायक

UPSC: स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी झटणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष लेखांची मालिका सुरू करत आहोत. यामध्ये नावाजलेले विद्वान विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. इतिहास, राजकारण, आंतरराष्ट्रीय संबंध, कला संस्कृती व वारसा, पर्यावरण, भूगोल, विज्ञान व तंत्रज्ञान असे अनेक विषय आपण समजून घेणार आहोत. या तज्ज्ञांच्या विद्वत्तेचा लाभ घ्या आणि स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी व्हा. या लेखात, पौराणिक कथा आणि संस्कृती या विषयात पारंगत असलेले प्रख्यात लेखक देवदत्त पट्टनायक यांनी भारतातील जातिव्यवस्थेची सूक्ष्म माहिती दिली आहे.

भारतीय जातिव्यवस्थेची तुलना या आफ्रिकन जमातींशी करून वैशिष्ट्यपूर्ण प्रथा, श्रद्धा आणि त्यांचे सामाजिक परिणाम समजावून सांगणे महत्त्वाचे आहे. यामुळे परकीय व्यक्तीला भारतीय जातिव्यवस्थेची गुंतागुंत समजण्यास मदत होऊ शकेल.

अधिक वाचा: देवदत्त पट्टनायक यांच्यासह कला आणि संस्कृती | वेदांचे महत्त्व आणि विधी

West Bengal vs Odisha on tigers
West Bengal vs Odisha on Tigers : वाघांच्या मुद्द्यावर पश्चिम बंगाल विरुद्ध ओडिशा संघर्ष… यापूर्वीही प्राण्यांवरून जगभरात झालेत वाद
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
Article about large religious conference in marathi
तर्कतीर्थ विचार :  वेदांचे पावित्र्य माझ्या हृदयात
Special article on occasion of Swami Vivekanandas birth anniversary
धर्म, अस्मिता आणि हिंदू!
India’s culture encourages diversity in practice and thought.
चलनी नोटा, वस्त्राचा तुकडा आणि भारतीय थाळी विविधतेत एकतेचं प्रतीक कसं ठरतात?
Bhandara, Selfie , tiger , Suhani tiger ,
VIDEO : झुडपात बसलेल्या वाघासोबत चक्क ‘सेल्फी’, सुहानीच्या बछाड्याला पुन्हा लोकांनी…..
Threat to bar owner Chikhli , Chikhli bar Loot ,
बुलढाणा : रात्रीची वेळ; बार मालकाच्या गळ्याला चाकू लावला अन…
Two men commit unnatural torture on a minor child in Buldhana district
आता…बालकेही सुरक्षित नाहीत!…खामगावच्या शाळेत अंध मुलावर…

UPSC Preparation: India’s Caste System and Its Social Impact: भारतीय जातिव्यवस्था समजावून घेण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे आफ्रिकेकडे पाहणे. एका आफ्रिकन व्यक्तीला त्याची आदिवासी ओळख (मसाई, झुलू), धार्मिक ओळख (ख्रिश्चन, मुस्लिम), राष्ट्रीय ओळख (रवांडा, युगांडा), आणि अगदी वांशिक ओळख (भूमध्य, उप-सहारा, युरोपीय) देखील असते. यापैकी, आदिवासी ओळख ही मूळ (organic) आणि स्थानिक असते. आफ्रिकन राष्ट्रांतील वांशिक संघर्ष आणि प्रगतीच्या अभावासाठी अनेकदा विचारवंत आदिवासीवादाला (tribalism) दोष देतात. एका पातळीवर भारतातील जात व्यवस्था ही आफ्रिकेतील आदिवासींसारखीच आहे. आदिवासींप्रमाणेच प्रत्येक जातीचे स्वतःचे अनोखे रीतिरिवाज आणि श्रद्धा असतात. अनेक जातींमध्ये समान प्रथा- रितीभाती आढळतात. तर काहींमध्ये पूर्णतः भिन्न परंपरा असतात.

मात्र, जात ही आदिवासी समाजापेक्षा खूप वेगळी आहे. जातिव्यवस्था ही एका व्यापक संरचनेत अस्तित्वात असते, ज्यात अनेक प्रादेशिक भिन्नता अस्तित्त्वात असतात. वसाहतवादी कालखंडात ब्रिटिशांनी जातिव्यवस्थेवर निर्बंध घालण्यापूर्वी त्याची तीव्रता अधिक होती. हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की, ‘कास्ट’ हा शब्द युरोपियन आहे; पारंपरिक भारतीय शब्द ‘जात’ आहे. भारतामध्ये २००० हून अधिक जाती आहेत आणि त्या ऋग्वेदात नमूद केलेल्या चार वर्णांमध्ये विभागल्या गेल्या आहेत. प्रत्यक्ष परिस्थिती अधिक भिन्न आणि गुंतागुंतीची आहे.

जात आणि शुद्धतेचा सिद्धांत

जातिव्यवस्थेत आर्थिक आणि राजकीय उच्च- नीच भावाचाही समावेश आहे. त्यामुळे तिची तुलना युरोपातील ‘क्लास सिस्टीम’बरोबर होऊन गोंधळ निर्माण होऊ शकतो. परंतु जातिव्यवस्थेला वेगळेपण देणारी गोष्ट म्हणजे ‘शुद्धतेचा सिद्धांत’. किमान १,५०० वर्षांपासून कदाचित त्याहूनही अधिक काळ जी गोष्ट सातत्याने टिकून आहे ती म्हणजे जातिव्यवस्थेत आढळणारे शुद्ध आणि अशुद्ध हे दोन स्तर. ब्राह्मण हा सर्वाधिक उच्चस्तरीय गट मानला जातो आणि तो आजही भारताच्या राजकारण, प्रशासकीय व्यवस्था, न्यायव्यवस्था आणि अगदी कॉर्पोरेट जगतात वर्चस्व गाजवत आहे. याच्या उलट टोकाला अशुद्ध मानले जाणारे समुदाय आहेत; जे प्रामुख्याने अंत्यसंस्कार, मांसप्रक्रिया, चामड्याचे काम आणि स्वच्छता यांसारख्या व्यवसायांमध्ये गुंतलेले असतात. त्यामुळेच त्यांना ‘अस्पृश्य’ मानले गेले आणि त्यामुळेच त्यांचे मानवी अधिकार नाकारले गेले. त्यांना गावातील विहीर, चौक यांसारख्या सार्वजनिक सुविधांचा वापर करण्यास मनाई करण्यात आली. त्यांची दृष्टी आणि सावली पडू नये तसेच स्पर्श होऊ नये याची विशेष काळजी घेतली जाई. ते गावाच्या वेशीवर राहत असत आणि गावातील लोक घरात गेले की त्यांना नेमून दिलेली जातनिहाय काम करण्यासाठी ते गावात येत असत.

‘जातिनाश’- Dr. B.R. Ambedkar and the ‘Annihilation of Caste’

हिंदू सामाजिक सुधारक वर्ग हा प्रामुख्याने उच्चभ्रू होता. व्यवहारवादी दृष्टिकोनामुळे त्यांनी जातिव्यवस्थेच्या व्यापक संरचनेला थेट आव्हान दिले नाही. उदाहरणार्थ, महात्मा गांधी यांनी लंडनमध्ये वकिलीचे शिक्षण घेतले होते. त्यांनी या अस्पृश्य समुदायांचे उत्थान करण्यासाठी ‘हरिजन’ (देवाचे लोक) हा शब्द वापरला. परंतु, कालांतराने या शब्दाचा त्याग करण्यात आला, कारण या शब्दामागील मथितार्थ हा दयाभाव दर्शवणारा होता.

याविरुद्ध स्वतःची ओळख या समाजाने ‘दलित’ म्हणून करून दिली. दलित म्हणजे दबलेला. या शब्दाने शतकानुशतके झालेल्या अत्याचारांची आठवण करून दिली. अलीकडील काळात अनेकांनी भारतीय खेड्यांतील दलितांच्या दयनीय स्थितीची तुलना अमेरिकन वसाहतींतील आफ्रिकन गुलामांच्या अवस्थेशी केली आहे. त्यामुळे अनेकजण जातिव्यवस्थेला वर्णद्वेषाच्या दृष्टिकोनातून पाहत आहेत आणि संरचनात्मक बदलांची मागणी करत आहेत.

अधिक वाचा: ‘एक फुटी कौडी… ते नाणी’; भारतातील नाण्यांचा आकर्षक इतिहास काय सांगतो? । देवदत्त पट्टनाईक यांच्याबरोबर कला आणि संस्कृती

या समाजाचे प्रतिनिधित्त्व करणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जातिनाश या मूलभूत विचाराची मांडणी करून खऱ्या समानतेकडे जाण्याचा मार्ग सुचवला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचे संविधान तयार करणाऱ्या समितीचे नेतृत्त्व केले आणि स्वातंत्र्यानंतरच्या भारताची अनेक धोरणे आकारास आणली. आज भारत सरकार दलित समुदायांना ‘अनुसूचित जाती (SCs)’ आणि ‘अनुसूचित जमाती (STs)’ म्हणून संबोधते. त्यांना शैक्षणिक आणि रोजगाराच्या संधींमध्ये आरक्षणाच्या माध्यमातून सकारात्मक लाभ दिला जातो.

जात आणि हिंदू धर्म

परंतु, जात ही हिंदू धर्माचा मूलभूत घटक आहे का? दलित समाज म्हणतो, होय. संपन्न उच्चवर्गीय म्हणतात, नाही. जातिव्यवस्थेच्या बाहेर हिंदू धर्म आहे का? दलित समाज म्हणतो, नाही. संपन्न उच्चवर्गीय म्हणतात, होय. जर दलित समाजाच्या मताला मान्यता दिली, तर जातिविरोधी चळवळी मूलतः हिंदूविरोधी चळवळी ठरतात. सर्व धार्मिक प्रचारक जातिविरोधी चळवळींना पाठिंबा देतात. जर दलित समाजाच्या दृष्टिकोनाला मान्यता दिली, तर जातिविरोधी चळवळी या मूलतः हिंदूविरोधी चळवळी ठरतात. तर सर्व धार्मिक मिशनऱ्यांनी जातिविरोधी चळवळींना पाठिंबा दिला आहे.
जरी या इतर धर्मांनी आपला विश्वास समानतेवर आधारित असल्याचा दावा केला असला तरी धर्मांतरानंतरही जात कधीच पूर्णपणे नष्ट होत नाही हे भारतातील वास्तव आहे. उदाहरणार्थ, गोव्यातील ब्राह्मण कॅथलिक स्वतःला अभिमानाने ब्राह्मण म्हणवतात आणि ते कधीच दलित ख्रिश्चनांशी विवाह करत नाहीत. पाकिस्तानात मुस्लिम राजपूत आपल्या जातीचा मोठा अभिमान बाळगतात आणि ख्रिश्चन धर्म स्वीकारलेल्या दलितांवर होणारा जातीय अत्याचार धार्मिक हिंसेच्या स्वरूपात लपवला जातो. ईशान्य भारतात दिसणारा हिंदू-ख्रिश्चन संघर्ष हा प्रत्यक्षात जुन्या आदिवासी वैमनस्याचा परिणाम असल्याचे दिसून येते.

जात आणि जमात या मूलभूत ओळखी आहेत, ज्या सहज नष्ट होऊ शकत नाहीत. कारण जात ज्यावेळी भेदभावाला चालना देते, त्याचवेळी ती समुदायांना ओळख आणि अभिमानालाही जागा देते. प्रत्येक जात आपला ‘सांस्कृतिक अभिमान’ जपण्यासाठी आपल्या वीरपुरुषांचे आणि इतिहासाचे उत्सव साजरे करते. हीच प्रवृत्ती ‘वोट बँक राजकारणा’च्या मुळाशी आहे.

विषयाशी संबंधित प्रश्न:

१. जात आणि जमात या समाजाच्या मूलभूत ओळखी असून त्या सहजपणे नष्ट होऊ शकत नाहीत; याबाबत तुमचे मत मांडा.

२. भारतातील जातिव्यवस्थेची संकल्पना आणि आफ्रिकेतील जमातींच्या प्रथा व श्रद्धांमध्ये कोणते साम्य आणि भिन्नता आहे, याचे विश्लेषण करा.

३. भारतीय समाजाच्या घडणीत जातिव्यवस्थेचा प्रभाव कसा आहे? तसेच, प्रादेशिक पातळीवर जातिव्यवस्थेतील विविधतेबद्दल उदाहरणांसहित चर्चा करा.

४. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘जातिनाश’ संकल्पनेने जातिविषयक सकारात्मक कृती आणि सामाजिक न्यायाबद्दलच्या सध्याच्या चर्चांवर काय परिणाम केला आहे? यावर प्रकाश टाका.

५. जात आणि हिंदू धर्म यांच्यातील संबंधाबाबत दलित आणि उच्चवर्णीय संपन्न वर्ग यांचे दृष्टिकोन कसे भिन्न आहेत? सविस्तर विश्लेषण करा.

Story img Loader