वृषाली धोंगडी

मागील काही लेखांतून आपण नैसर्गिक व मानवी आपत्तीचे प्रकार, त्यांची कारणे आणि त्यावरील उपायांबाबत माहिती घेतली. या लेखातून आपण आपत्ती उदभवण्याच्या कालावधीवरून आपत्तीचे प्रकार जाणून घेऊ. आपत्ती उदभवण्याच्या कालावधीवरून आपत्तीचे १) एक जलद सुरू होणारी आपत्ती (Rapid Onset) व २) हळूहळू सुरू होणारी आपत्ती (Slow Onset), असे साधारण दोन प्रकार पडतात.

drought-prone villages Pune, works in drought-prone villages pune, drought-prone villages fund,
पुणे : दरडप्रवण गावातील कामांना गती, २०० कोटींचा निधी मंजूर
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Thane , government projects, dust, health,
सरकारी प्रकल्पांमुळेच धुळधाण, नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता
Satara , development work Satara, code of conduct Satara, Satara latest news,
आचारसंहिता संपल्याने साताऱ्यात दीडशे कोटींच्या विकासकामांना प्रारंभ
Pune Water Supply, Water Resources Department,
पुण्याच्या पाण्याचे नियंत्रण जाणार जलसंपदा विभागाच्या ताब्यात? नक्की काय आहे कारण !
house damaged by falling tree branch in goregaon
गोरेगावमधील झाडाची फांदी पडून घराचे नुकसान
It is picture of never ending natural calamities Farmers injured by heavy rains are now in a new crisis
नैसर्गिक आपत्तीचा ससेमीरा कायमच! गडद धुक्यामुळे तूरपीक संकटात; शेतकरी हवालदिल
Cold weather Thane district, Thane district temperature,
ठाणे जिल्हा पुन्हा गारठला, जिल्ह्यातील तापमान सरासरी १२ अंश सेल्सिअस

१) जलद सुरू होणारी आपत्ती

आपत्ती सुरू होणे आणि त्याचा विनाशकारी परिणाम दिसणे यांत वेळेचे अंतर कमी असते. या आपत्तीमध्ये भूकंप, ज्वालामुखी, पूर यांचा समावेश होतो.

२) हळूहळू सुरू होणारी आपत्ती

आपत्ती सुरू होणे आणि त्याचा विनाशकारी परिणाम दिसणे यांत वेळेचे अंतर अधिक असते. सुरुवातीला या आपत्तीचे परिणाम जास्त विनाशकारी नसतात. परंतु, जसजसा काळ जातो, तसतशी ती आपत्ती अधिक विनाशकारी होत जाते. त्यामध्ये वाळवंटीकरण, हवामान बदल, पाण्याची क्षारता वाढणे, दुष्काळ, पाण्याची पातळी वाढणे यांसारख्या आपत्तींचा समावेश होतो.

हेही वाचा – UPSC-MPSC : भारतात दुष्काळ जाहीर करण्याचे निकष काय? त्यावरील उपाय कोणते?

१) वाळवंटीकरण : वाळवंटीकरण ही एक अशी प्रक्रिया आहे की, ज्यामध्ये कोरड्या जमिनीची जैविक उत्पादकता नैसर्गिक किंवा मानवनिर्मित घटकांमुळे कमी होते. वाळवंटीकरणाचा अर्थ अस्तित्वात असलेले वाळवंट वाढणे, असा होत नाही. या क्रियेस मानवाद्वारे करण्यात येत असलेली वृक्षतोड, अतिचराई, झूम शेतीसारख्या शेती पद्धती, शहरीकरण व वाळवंटी संसाधनांचा अधिक वापर यांसारख्या मानवी क्रिया जबाबदार आहेत. त्याचप्रमाणे नैसर्गिक आपत्ती, पाणी व वाऱ्यामुळे होणारे अपक्षरण यांसारख्या नैसर्गिक क्रियासुद्धा जबाबदार आहेत.

वाळवंटीकरणामुळे जैवविविधेत घट, तापमानवाढ, दुष्काळात वाढ, पूर, जमिनीची क्षारतावाढ, जमिनीची धूप यांसारखे विनाशकारी परिणाम उदभवतात. यांसारख्या परिणामामुळे मानवी उपभोगाच्या संधी कमी होतात आणि गरिबीसारखी सामाजिक समस्या निर्माण होते. वाळवंटीकरण रोखण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेने वाळवंटीकरणविरोधी करार १९९४ ला केला आहे. या कराराचा भारत सदस्य आहे. वाळवंटीकरण रोखण्यासाठी देशात विविध योजना राबवल्या जातात. कोरड्या भागात वृक्षारोपण, जलसंधारण योजना, वाळवंट विकास कार्यक्रम यांसारख्या योजना देशात चालू आहेत.

२) हवामान बदल : तापमान किंवा हवामान यांच्या पॅटर्नमध्ये होणारा दीर्घकालीन बदल म्हणजे हवामान बदल होय. हवामान बदल हा सौरचक्रातील बदलासारख्या नैसर्गिक कारणांमुळे किंवा हरितगृह वायूंचे उत्सर्जनासारख्या मानवी कारणांमुळे होऊ शकतो. १९ व्या शतकानंतर जगात औद्योगिक क्रांती झाली. मोठ्या प्रमाणत इंधनाचा वापर सुरू झाला. इंधनाच्या ज्वलनामुळे वातावरणात कार्बन डाय-ऑक्साइड, कार्बन मोनॉक्साइड, मिथेन यांचे प्रमाण वाढले आणि याच गोष्टी तापमान वाढण्यास कारणीभूत ठरल्या.

हवामान बदलाचे परिणाम केवळ तापमानवाढीवर होत नसून, ते सर्व क्षेत्रांत आपणास पाहावयास मिळतात. ते परिणाम खालीलप्रमाणे :

अ) तापमानवाढ : हवामानात बदल झाल्यामुळे तापमानात वाढ होऊन, ध्रुवावर बर्फ वितळून समुद्राची पातळी वाढते; तर विषुववृत्तावर पाण्याची क्षारता वाढते.

ब) मोसमी पावसाच्या वेळापत्रकात बदल : हवामान बदलामुळे मोसमी पावसाच्या वेळापत्रकात बदल होतो. पाऊस उशिरा येतो आणि लवकर जातो. त्याचा सर्वाधिक फटका शेती क्षेत्राला बसतो. टोळ आणि कृमी यांचे शेतीवर आक्रमण, नित्य दुष्काळ यांसारख्या समस्या उदभवतात.

क) वादळांच्या प्रमाणात वाढ : काही भागांत वादळे येण्याचे प्रमाण वाढले आहे. वादळे ही अतितीव्र झाली आहेत. त्यामुळे आर्थिक नुकसान होते.

हेही वाचा – UPSC-MPSC : जैविक आपत्ती म्हणजे काय? त्याचे स्वरुप व त्यावरील उपाय कोणते?

ड) जंगलांमध्ये वणवे : तापमानवाढीमुळे जंगलांमध्ये वणवे लागतात. त्यात अनेक मुके प्राणी मरण पावतात आणि जैवविविधतेचा ऱ्हास होतो. मागील शतकामध्ये अनेक प्राणी व वनस्पती प्रजाती पूर्णतः नष्ट झाल्या आहेत.

इ) अन्नसुरक्षेची समस्या : हवामान बदलामुळे शेतीच्या व सागरी उत्पादनात भविष्यात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अन्नसुरक्षेची समस्या उदभवू शकते.

उ) आरोग्यावर परिणाम : मानवी आरोग्यासाठी सर्वांत मोठा धोका म्हणजे हवामान बदल. वायुप्रदूषण, आजारपण, कोरडे हवामान, जबरदस्तीने स्थलांतर, मानसिक आरोग्यावरील ताण, वाढती भूक व अपुरे पोषण हे हवामान बदलाचे आरोग्यावर होणारे काही परिणाम आहेत. हवामान बदलावर मात करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक प्रयत्न चालू आहेत. संयुक्त राष्ट्राकडून दरवर्षी हवामान बदल परिषद घेऊन, त्यात हवामान बदल रोखण्यासाठी ठळक पावले उचलली जातात.

Story img Loader