वृषाली धोंगडी

मागील लेखातून आपण सागरी परिसंस्थेविषयी माहिती घेतली. या लेखातून आपण वाळवंटीय परिसंस्थेविषयी जाणून घेऊ. मागील लेखात बघितल्याप्रमाणे परिसंस्थेचे मुख्य दोन प्रकार पडतात. एक म्हणजे भूस्थित परिसंस्था आणि दुसरी म्हणजे जलीय परिसंस्था. पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या केवळ एक-चतुर्थांश भाग जरी भूमीने व्यापलेला असला तरीही भूस्थित परिसंस्थांची क्लिष्टता व विविधता ही जलीय परिसंस्थांपेक्षा बरीच अधिक आहे. हवामानाची विविधता, शिलावरण विविधता व जीवसमुदायांची असमानता यांच्यातील फरकांमुळे भूस्थित परिसंस्थेचे विविध प्रकार पडतात. उदाहरणार्थ- टुंड्रा परिसंस्था, अल्पाइन परिसंस्था, गवताळ प्रदेश परिसंस्था इत्यादी. त्यापैकीच एक महत्त्वाचा प्रकार म्हणजे वाळवंट परिसंस्था होय.

Vasu Baras 2024
Vasu Baras 2024:धेनुगळ म्हणजे काय?
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
formation of the earth
भूगोलाचा इतिहास : धरतीची जन्मकथा
Diwali festival sale of eco friendly sky lanterns in the market Pune news
पर्यावरणपूरक आकाशकंदिलांचा झगमगाट
Steering Committee Approves Maharashtra Revised Curriculum with CBSE Influence
लेख : देशांतर्गत वसाहतीकरणाचा ‘आराखडा’!
Work of second tunnel in Matheran hill of Baroda Mumbai highway completed
बडोदा मुंबई महामार्गाच्या माथेरान डोंगरातील दुसऱ्या बोगद्याचे काम पूर्ण
dr madhukar bachulkar new mahabaleshwar
नवीन महाबळेश्वर प्रकल्पामुळे पर्यावरणाची मोठी हानी, डॉ. मधुकर बाचूळकर यांचे टीकास्त्र
new method for elephants counting
विश्लेषण: हत्ती गणनेच्या नव्या पद्धतीतून अचूक संख्या समोर येईल?

वाळवंट परिसंस्था ही अत्यंत कोरड्या पर्यावरणामध्ये आढळते. त्यासाठी कमी पडणारा पाऊस जबाबदार असतो. वाळवंट परिसंस्था हे एक क्षेत्र आहे. जिथे मानवाला वास्तव्य करणे कठीण असते. मानवी जीवनासाठी सहन करण्यायोग्य परिस्थिती येथे उपलब्ध नसतात. त्यामुळे मानवी वस्ती व लोकसंख्या यांची घनता कमी असते. बऱ्याच लोकांना वाळवंट म्हटल्यावर अतिजास्त तापमान, पाण्याची कमतरता, वाळू-रेती यांचे किल्ले यांसारख्या गोष्टी डोळ्यांसमोर येतात. परंतु, ज्याप्रमाणे उष्ण वाळवंटे विकसित होतात, त्याचप्रमाणे कमी तापमान असलेल्या वाळवंटांचेही अस्तित्व आहे; ज्यास आपण ‘थंड वाळवंट’ असे म्हणतो.

हेही वाचा – UPSC-MPSC : प्लास्टिक प्रदूषणासंदर्भात भारत सरकारचे धोरण काय?

उष्ण वाळवंट : जगातील बहुतेक वाळवंटे ही उपोष्ण कटिबंधातील खंडांच्या पश्चिम किनार्‍यावर स्थित आहेत. उदा. सहारा, अटाकमा, गोबी इ. कारण- उष्ण कटिबंधातील पूर्वीय वारे येथे प्रचलित आहेत. उष्ण कटिबंधीय पूर्वीय वारे महाद्वीपांच्या पश्चिम किनार्‍यापर्यंत पोचल्यावर ते कोरडे होतात आणि त्यामुळे पाऊस पडत नाही. उष्ण वाळवंटात सकाळच्या वेळी तापमान ४५° ते ५०° सेल्सिअसपर्यंत असते; तर रात्रीच्या वेळी तापमान ०° पर्यंत कमी असते. अशा प्रकारच्या वाळवंटामध्ये पाणी वाया न जाऊ देता साठवून ठेवणारी वनस्पती प्रजाती आढळतात. या वनस्पती झुडूपमय असतात आणि दुष्काळी परिस्थितीत अनुकूलित झालेल्या असतात. लहान आकाराची पाने, पानांवर काटे, पानांवर तेलासारखा चिकट थर ही अनुकूलने बाष्पोत्सर्जनातून वाया जाणारे पाणी कमी करतात. या वनस्पतींची मुळे उत्तम विकसित झालेली असतात आणि पर्जन्यजलाचा जास्तीत जास्त वापर करून घेण्यासाठी मृदेच्या वरच्या भागात (१ मीटरपर्यंत) वाढतात. या वनस्पतींमध्ये निवडुंग (कॅक्टस), खजूर, कसावा, मॅगी, अकेसियास, प्रिकली पेअर्स यांचा समावेश होतो. याच वनस्पती या परिसंस्थेत उत्पादकाचे कार्य करतात.

वाळवंटामध्ये प्रामुख्याने सरपटणारे प्राणी (उदा. सरडे, साप, गेको), कीटक (उदा. बीटल, विंचू, कोळी) व जमीन उकरणारे उंदीरवर्गीय प्राणी आढळतात. या सरपटणाऱ्या प्राण्यांची व कीटकांची त्वचा जाड असते आणि हे सामान्यतः जमिनीच्या आतमध्ये राहतात. रात्री तापमान कमी असल्यामुळे बरेचसे प्राणी निशाचर असतात आणि रात्री शिकार करतात. उंट, कोल्हे, मिअरकॅट यांसारखे सत्सन प्राणी आणि कॅक्टस व्रेन, रोडरनर, जमिनीत राहणारे घुबड व शहामृगासारखे पक्षी उष्ण वाळवंटात आढळतात. येथील शाकाहारी प्राणी निवडुंगाची पाने खाऊन, त्यातून तहान भागवतात.

थंड वाळवंट : हे सहसा उंच भागात किंवा पर्वतांच्या शिखरावर आढळते. उदा. लडाखचे मैदान, हिमालय व हिंदकुश रांगांमधील भाग. उन्हाळ्यात इथे तापमान ०° सेल्सिअसपर्यंत असते; तर हिवाळ्यात येथील तापमान -३०° सेल्सिअसपर्यंत खाली येते. येथे असलेली माती पूर्णपणे खडकाळ आहे आणि वर्षाचा जास्त काळ बर्फाने झाकलेला असल्यामुळे येथे वनस्पती उगवत नाहीत. येथील वातावरण सामान्यतः पूर्णपणे वनस्पती किंवा प्राणी प्रजातींच्या पोषणासाठी विसंगत आहे. तथापि, थंड वाळवंटात सॉल्टबुश, ब्लॅक सेज, राइस ग्रास व क्रायसोथॅमनस यांसारख्या झुडूपवर्गीय वनस्पती आढळतात; ज्या ठिकाणी मुबलक सूर्यप्रकाश पडतो. त्या ठिकाणी पोपलार व विलोज यांसारखी झुडपे आढळतात.

हेही वाचा – UPSC-MPSC : सागरी परिसंस्था म्हणजे काय? त्याचे मुख्य घटक कोणते?

प्राणी प्रजातींचा विचार केल्यास सरपटणारे, उभयचर, सत्सन प्राणी, पक्षी अशी सर्वच प्रकारच्या प्रजाती इथे पाहावयास मिळतात. शरीरावर जास्त चरबी, केस ही येथील प्राण्यांची वैशिष्ट्ये आहेत. या भागात ससे, तिबेटियन हरीण, स्नो लेपर्ड, हिमालयन ब्लॅक बेअर, हिमालयन ब्राउन बेअर, ध्रुवीय अस्वल, लाल कोल्हे, तिबेटियन लांडगे, हिमालयन आयबेक्स, हिमालयन मार्मोट, हिमालयन नीली मेंढी, रेड बिलेड चाफ, चुकर पॅट्रीज, स्नो पॅट्रिज, ब्लू रॉक कबूतर, हिमालयन कबूतर, हिमालयन स्नोकॉक यांसारखे प्राणी आढळतात. वाळवंटातील हवामान, परिस्थिती अत्यंत तीव्र व कठीण असूनही तेथील परिसंस्थेचे चक्र चालू आहे आणि ही जीवसंहिता असाधारण जैवविविधतेचे प्रतिनिधित्व करते.