वृषाली धोंगडी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कुठलीच परिसंस्था ही कायमस्वरूपी स्थिर राहत नाही. कालानुरूप व वातावरणातील बदलांप्रमाणे बदल हे अपरिहार्य असतात. पर्यावरणातील बदलांप्रमाणे बदल घडून परिसंस्थेस/ जीव समुदायास स्थैर्य प्राप्त होण्याच्या प्रक्रियेस परिस्थितिकीय अनुक्रमण असे म्हणतात. परिसंस्थांचे आपणास दिसणारे आजचे स्वरूप हे विशिष्ट कालावधीत टप्प्याटप्प्याने घडलेल्या परिस्थितिकीय अनुक्रमण या प्रक्रियेचा परिणाम आहे. म्हणजेच पर्यावरणीय उत्तराधिकार ही कालांतराने पर्यावरणीय समुदायाच्या प्रजातींच्या संरचनेत बदल होण्याची प्रक्रिया आहे. कायमस्वरूपी सामुदायिक परिसंस्थेची स्थापना होईपर्यंत विकसनशील परिसंस्थेमध्ये उपस्थित असलेल्या विविध समुदायांमध्ये बदल होत राहतात, जे प्रामुख्याने जैविक घटक, जलीय, वातावरणीय घटक, मातीतील घटक आणि इतर पर्यावरणीय घटकांच्या कार्यामुळे होते. हा बदल जोपर्यंत जिवांचा असा वर्ग स्थापन होत नाही, जो त्या भागात यशस्वीपणे जगू शकतो आणि पुनरुत्पादन करू शकतो, तोपर्यंत चालू राहतो. यालाच जैविक उत्तराधिकार किंवा पर्यावरणीय उत्तराधिकार/अनुक्रमण म्हणतात.

हेही वाचा – UPSC-MPSC : पर्यावरणातील संतुलन

परिस्थितिकीय अनुक्रमणाचे प्रकार –

प्राथमिक अनुक्रमण

रिकामे क्षेत्र जसे की खडक, नव्याने तयार झालेले डेल्टा आणि वाळूचे ढिगारे, ज्वालामुखी आणि बेटे, वाहणारा लावा, हिमनद हेमॅटाइट्स (माघार घेत असलेल्या हिमनद्यांद्वारे तयार केलेले चिखलाने भरलेले क्षेत्र) जेथे पूर्वी कोणताही समुदाय अस्तित्वात नव्हता, अशा उजाड प्रदेशात सजीवसृष्टी नव्याने निर्माण होऊन, त्यात कालानुरूप बदल घडण्याच्या प्रक्रियेस प्राथमिक अनुक्रमण म्हणतात. ज्या वनस्पती पहिल्यांदा त्या उजाड प्रदेशात उगवतात त्यांना पायोनियर प्रजाती/अग्रगण्य प्रजाती/ प्रणेती प्रजाती म्हणतात. म्हणजेच जे प्रथम रिकाम्या भागाला त्यांचे निवासस्थान बनवतात. विविध पायोनियर वनस्पतींच्या संग्रहाला एकत्रितपणे पायोनियर समुदाय असे म्हणतात. पायोनियर प्रजातींचा वाढीचा दर खूप जास्त असतो. परंतु आयुष्य कमी असते.

द्वितीयक अनुक्रमण

द्वितीयक अनुक्रमण म्हणजे जेव्हा एखाद्या प्रदेशातील सजीवांचे अस्तित्व काही कारणास्तव नष्ट होऊन उजाड बनले असेल, अशा प्रदेशात पुन्हा सजीवसृष्टीस सुरुवात होऊन त्यात कालांतराने बदल घडत राहण्याच्या प्रक्रियेला द्वितीयक अनुक्रमण म्हणतात.

हेही वाचा – UPSC-MPSC : पर्यावरण : जीव -भू रासायनिक चक्र किंवा पोषण द्रव्ये चक्र – भाग १

अनुक्रमणिकेची प्रक्रिया पुढील चरणांमध्ये पूर्ण केली जाते-

१) जीवप्रजातींचा प्रवेश /वसाहतीकरण ( Invasion) – नवीन क्षेत्रामध्ये इतर ठिकाणाहून बीज, बीजाणू किंवा पुनरुत्पादक संरचना यांसारख्या प्रसारकांच्या आगमनास ट्रान्सलोकेशन म्हणतात, ज्यामुळे वसाहतीकरणाची प्रक्रिया घडते. ही परिस्थितिकीय अनुक्रमणाची पहिली पायरी आहे.

(२) स्थापना ( Establishment) – हस्तांतरणानंतर/ वसाहतीकरणानंतर , बीज किंवा बीजाणू अंकुरित होतात आणि वाढतात आणि स्वतःला वातावरणाशी जुळवून घेतात, या प्रक्रियेला स्थापना म्हणतात.

(३) एकत्रीकरण – स्थापनेनंतर फुलांची, फळांची निर्मिती आणि बियांची निर्मिती वनस्पतींमध्ये होते. या बिया उगवतात आणि त्याच ठिकाणी वनस्पतींची संख्या वाढवत राहतात, ज्यामुळे लोकसंख्येचे एकत्रीकरण चालू राहते.

(४) स्पर्धा ( competition) – एकत्रीकरणाच्या परिणाम म्हणजे उपलब्ध मर्यादित संसाधनाच्या वापरासाठी एका प्रजातीच्या लोकसंख्येमध्ये आणि भिन्न प्रजातींमध्ये स्पर्धा सुरू होते. जे जीव स्पर्धेत यशस्वी होत नाहीत, ते हळूहळू नष्ट होतात.

(५) प्रतिक्रिया (Reaction) – जिवांचा समुदाय आणि त्याच्या निवासस्थानात उपस्थित असलेल्या पर्यावरणीय घटकांमध्ये होणाऱ्या क्रियांना प्रतिक्रिया म्हणतात.

6) स्थिरीकरण (Stabilisation) – वर नमूद केलेल्या प्रक्रियेमुळे होणार्‍या बदलांमुळे तेथे उपस्थित वनस्पतींना जगणे कठीण होते. त्यामुळे ते मरायला लागतात आणि त्यांच्या जागी नवीन रोपे येऊ लागतात. उत्तराधिकार समुदायाच्या स्थिरतेच्या स्थापनेसह समाप्त होतो, ज्याला स्थिरीकरण म्हणतात. तसेच क्रमाचा शेवटचा टप्पा बनवणारा समुदाय म्हणजे क्लायमॅक्स समुदाय. असे म्हणतात क्लायमॅक्स समुदाय स्थिर, प्रौढ, अधिक जटिल आणि दीर्घायुषी आहे. तसेच ज्यामध्ये अनुक्रमणादरम्यान एक समुदाय दुसऱ्या समुदायाचे अनुसरण करतो ( series of different plant communities that change with time) याला सेरे ( sere ) म्हणतात.

काळाच्या ओघात जीवसमुदायाच्या संरचनेत बदल होत जातात. या प्रक्रियेत एका प्रजातीची जागा दुसरी प्रजाती घेते व ही प्रक्रिया सतत सुरू राहते.