वृषाली धोंगडी

Grass Land Ecosystems In Marathi : पृथ्वीवर उष्ण आणि समशीतोष्ण कटिबंधांमध्ये निसर्गत: गवताने आच्छादलेली भूमी आहे. अशा प्रदेशांत आढळणार्‍या परिसंस्थांना गवताळ भूमी परिसंस्था म्हणतात. पृथ्वीवरील एकूण भूक्षेत्रापैकी २४% भूक्षेत्रावर गवताळ प्रदेश आहेत. त्यापैकी ३१% प्रदेश विशेष उंच सॅव्हाना गवताचा, २२% उंच सॅव्हाना गवताचा, १८% ओसाड प्रदेशातील सॅव्हानाचा, १३% उंच प्रेअरी गवताचा, १०% बुटक्या स्टेपी गवताचा व ६% पर्वतीय गवताळ प्रदेशाचा आहे. गवताळ प्रदेशाचे उष्ण कटिबंधीय व समशीतोष्ण कटिबंधीय असे दोन प्रमुख प्रकार आहेत. विविध गवताळ प्रदेशांतील वनस्पती जीवन व प्राणी जीवन आणि त्यांच्या आंतरक्रिया भिन्न असल्याने प्रत्येक गवताळ प्रदेश ही स्वतंत्र गवताळ भूमी परिसंस्था म्हणून ओळखली जाते.

Engravings on the wheels
चित्रास कारण की: जमिनीवरची मेंदी
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
review of ramachandra guha s speaking with nature book
दखल : मानवी भविष्यासाठी…
Bad weather in Mumbai Measures against pollution Mumbai print news
मुंबईत निवडणुकीपर्यंत प्रदूषणाचा त्रास; मनुष्यबळाअभावी पालिकेची यंत्रणा हतबल
if want vote then Save rivers trees and hills
मत हवं? नद्या, झाडे, टेकड्या वाचवा…
pune private hospital pollution
पुणे: खासगी रुग्णालयांवर कारवाईचा बडगा ! नियमांचे पालन न केल्याप्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पाऊल
Voters in Malabar Hill insist on environment conservation in the wake of assembly elections 2024 mumbai print news
मलबार हिलमधील मतदार पर्यावरण संवर्धनासाठी आग्रही
Municipal Commissioner Bhushan Gagrani warns Law Department not to delay in court cases
न्यायालयीन प्रकरणांत दिरंगाई नको, महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांचा विधि विभागाला इशारा

हेही वाचा – UPSC-MPSC : पर्यावरण : जीव -भू रासायनिक चक्र किंवा पोषण द्रव्ये चक्र – भाग १

उष्ण कटिबंधीय गवताळ प्रदेश लानोज व कँपोज (द. अमेरिका), सॅव्हाना (आफ्रिका) या नावांनी; तर समशीतोष्ण कटिबंधीय गवताळ प्रदेश प्रेअरी (उ. अमेरिका), पँपास (द. अमेरिका), स्टेपीज (युरेशिया), व्हेल्ड (आफ्रिका), डाऊन्स (ऑस्ट्रेलिया) व कॅटनबरी (न्यूझीलंड) या नावांनी ओळखले जातात. उष्ण कटिबंधातील गवताळ प्रदेशामध्ये एक ते दोन मीटर उंचीचे गवत आणि तेवढ्याच उंचीची झुडपे असतात. सोबत, खुरटी झाडेही विखुरलेली असल्यास त्याला ‘सॅव्हाना’ म्हणतात. केनिया, टांझानिया येथील ‘सव्हाना’ हे वन्यप्राण्यांच्या अधिवासाकरिता प्रसिद्ध आहेत. तसेच ब्रिटिश बेटे, पश्चिम युरोप, न्यूझीलंड इ. थंड प्रदेशांत मनुष्याने अरण्ये तोडली आणि तेथे लुसलुशीत हिरव्यागार गवताची कुरणे तयार झाली आहेत. टुंड्रा प्रदेश, बहुतेक पठारी प्रदेश आणि काही पर्वतांचे उतार येथेही प्राणी चरू शकतील, असे गवत आढळते. तथापि मुख्यतः सॅव्हाना, स्टेप व प्रेअरी हेच गवताळ प्रदेश विशेषत्वाने मानले जातात.

भारतातील गवताळ प्रदेश

भारतामध्ये हवामान आणि मृदा यांमधील भिन्नतेनुसार वेगवेगळ्या प्रकारच्या गवताळ भूमी परिसंस्था आहेत. तसे पाहिले, तर भारतासारख्या मोसमी पावसाच्या हवामानात नैसर्गिक गवताळ प्रदेश फार कमी प्रमाणात आढळतात. भारतातील भिन्न भिन्न हवामानामुळे गवताळ प्रदेशाचे स्वरूप हंगामी असते. भारतामध्ये मुख्य अन्न असलेल्या गहू, तांदूळ, मका, ज्वारी या गवत प्रजातीच आहेत. शिवाय, भारतातील गवताळ प्रदेशांमध्ये खूर असणार्‍या चतुष्पादांच्या प्रजाती आढळतात. त्यामध्ये काळवीट, गवे, हरण, सांबर या तृणभक्षी प्राण्यांचा समावेश आहे; तर त्यांना खाऊन जगणारे वाघ, सिंह, लांडगे, तरस असे मांसभक्षी प्राणीदेखील या परिसरात मोठ्या संख्येने असतात. कच्छमधील गवताळ प्रदेशामध्ये रानटी गाढव, गीरमध्ये सिंह, तसेच राजस्थानमधील रणथंबोरमध्ये अनेक वन्यजीव आढळतात.

हेही वाचा – UPSC-MPSC : पर्यावरण : पर्यावरणीय उत्तराधिकार

महाराष्ट्रातील गवताळ प्रदेश

विदर्भ या भूप्रदेशाच्या नावाची फोडच ‘विपुल दर्भ (गवत) असलेला प्रदेश’ अशी आहे. पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये अजूनही काही गवताळ माळरान शिल्लक आहे. पुण्याच्या आसपास दख्खनच्या पठारावर गवताळ प्रदेश आहेत. येथील गवताळ प्रदेशांवर लांडगे आणि तरसांचा अधिवास आहे. तसेच महाराष्ट्रात माळढोक पक्ष्याच्या संवर्धनासाठी १९७९ साली सोलापूर व अहमदनगर या जिल्ह्यांतील गवताळ अधिवास मिळून ‘नानज माळढोक’ अभयारण्याची निर्मिती करण्यात आली.

नाशिकपासून काही अंतरावर ‘ममदापूर संवर्धन राखीव वनक्षेत्र’ काळविटांसाठी विकसित करण्यात आले आहे. या ठिकाणीही गवताळ अधिवास आहे. पश्चिम घाटाच्या उतारावरील गवताळ प्रदेश हे गवताळ भूमी परिसंस्थांचे प्रमुख प्रदेश आहेत. महाराष्ट्रात चांदोली, राधानगरी तसेच कारंजा, सोहोळ अभयारण्यामध्ये गवताळ परिसंस्था आहेत. महाराष्ट्रामध्ये मानवनिर्मित कुरणे मोठ्या प्रमाणावर असून, नैसर्गिक कुरणांची संख्या त्या मानाने कमी आहे. वन्यजीव अधिवास विकसित करण्यासाठी मेळघाट, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, बोर, टिपेश्वर यांसारख्या संरक्षित वनक्षेत्रांमध्ये मानवनिर्मित गवताळ प्रदेश तयार करण्यात आले आहेत.

गवताळ प्रदेश हा मानवाला स्वच्छ पाणी आणि हवा पुरविणारा एक प्रमुख स्रोत आहे. हा प्रदेश ‘कार्बन डाय-ऑक्साईड’ शोषून घेऊन ‘कार्बन फूटप्रिंट’ कमी करण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. लांडगे, कोल्हे, तरस यांसारख्या प्राण्यांसाठी गवताळ प्रदेश हा महत्त्वाचा अधिवास आहे. हा अधिवास संपुष्टात येऊ नये यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. तसेच या अधिवासावर अवलंबून असणार्‍या मानवी जमातींच्या विकासासाठीसुद्धा आपण प्रयत्न केले पाहिजेत.