वृषाली धोंगडी

मागील लेखातून आपण जैव भूरासायनिक चक्रे म्हणजे काय? याबाबत माहिती घेतली. या लेखातून आपण पर्यावरण आणि त्यासंबंधित महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय संस्थांबाबत जाणून घेऊया. मराठी शब्दबंधातील पर्यावरण या शब्दाच्या व्याख्येनुसार सजीवांच्या नैसर्गिक परिसरास पर्यावरण असे म्हणतात. वैज्ञानिक पारिभाषिक कोशानुसार पर्यावरण या संज्ञेत वनस्पती अथवा प्राणी ज्या नैसर्गिक परिसरात जगतात, वाढतात तेथील हवा, जमीन, पाणी, इतर सजीव, पर्जन्यमान, उंची, तापमान इत्यादी सर्वांचा समावेश होतो. पर्यावरण हे मानवाच्या आणि सर्व जीवांच्या सुरक्षित असणाऱ्या जीवनस्तराचे महत्त्वाचे प्रमाणस्थान आहे. पर्यावरण हे जीवनशैली, अस्तित्व, विकास, संपत्ती आणि संसाधनांचा आधार आहे.

Mumbai, Marol-Maroshi, National Park,
मुंबई : राष्ट्रीय उद्यानातील पात्र झोपडीधारकांचे मरोळ-मरोशीतील पुनर्वसनासही विरोध
17th October Rashi Bhavishya In Marathi
१७ ऑक्टोबर पंचांग: धनसंपत्ती की प्रचंड यश, गुरुवारी…
Despite no obstruction to Sadhu Vaswani Bridge construction Municipal Corporation cut down trees
झाडे तोडण्याबाबत पुन्हा चूक झाल्यास दंडात्मक कारवाई, ‘राष्ट्रीय हरित न्यायाधीकरणा’ने महापालिकेस फटकारले
women empowerment, unique initiative,
महिला सक्षमीकरणाचा अनोखा उपक्रम!
article about mpsc exam preparation
MPSC मंत्र : राज्यसेवा मुख्य परीक्षा – कृषी घटकपरिसंस्था आणि पर्यावरण
Dead fish gifted to Chief Engineer of Environment Department
पिंपरी : …अन् पर्यावरण विभागाच्या मुख्य अभियंत्याला दिले मृत मासे भेट
UPSC Preparation International Association
upsc ची तयारी: आंतरराष्ट्रीय संघटना
controversy regarding Siddesh Kadam Mercedes visit Inconsistencies in Maharashtra Pollution Board claims pune print news
सिद्धेश कदम यांच्या मर्सिडीज भेटीचे गौडबंगाल! महाराष्ट्र प्रदूषण मंडळाच्या दाव्यात विसंगती; वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मौन

१९८५ साली अंटार्टिका खंडावर ओझोन थराला पडलेलं छिद्र, वाढते जागतिक तापमान, वनस्पती आणि प्राणी प्रजातीचा ऱ्हास या सर्व कारणांमुळे पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन हा महत्त्वपूर्ण मुद्दा प्रकाशझोतात आला आहे. पर्यावरणाच्या सुरक्षिततेसाठी प्रकृतीच्या संतुलनाची गुंतवणूक करणे, अस्तित्वातील जीवांना संरक्षण देणे, जल, हवा, माती, वनस्पती, प्राणी आणि मानवी संसाधनांचा सुरक्षित वापर करणे महत्त्वपूर्ण आहे. यासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्था मोलाचे कार्य करतात. या संस्थेचे कार्यक्रम, योजना, प्रकल्प आणि प्रशिक्षणांमुळे पर्यावरण संरक्षणाच्या क्षेत्रातील विद्यार्थ्यांना, शोधकर्त्यांना आणि सार्वजनिक समुदायाला मदत मिळते.

हेही वाचा – UPSC-MPSC : भूस्खलन आणि हिमस्खलनाची नेमकी कारणे कोणती? भारतातील कोणत्या भागात सर्वाधिक घटना घडतात?

पर्यावरणाशी संबंधित आंतरराष्ट्रीय संस्था

१) इंटरनॅशनल युनिअन फॉर कंझर्वेशन ऑफ नेचर (IUCN) ही एक आंतरराष्ट्रीय संघटना असून ती पर्यावरण संवर्धनासाठी कार्य करते. या संस्थेची स्थापना ५ ऑक्टोबर १९४८ ला करण्यात आली. या संस्थेचे मुख्यालय स्वित्झर्लंडमधील ग्लैंड या ठिकाणी असून या संस्थेला संयुक्त राष्ट्रांचा निरीक्षक दर्जा प्राप्त आहे.

२) मानवी पर्यावरणावरील संयुक्त राष्ट्रे परिषद १९७२ ही स्टॉकहोम परिषद या नावाने ओळखली जाते. आंतरराष्ट्रीय पर्यावरणीय समस्यांवर लक्ष केंद्रित करणारी ही पहिली परिषद आहे. स्वीडनमधील स्टॉकहोम येथे ५ ते १६ जून १९७२ या कालावधीत झालेल्या या परिषदेने जगभरातील पर्यावरण संवर्धनाच्या मुद्द्यांमध्ये वाढती स्वारस्यता दाखवली आणि जागतिक पर्यावरणीय प्रशासनाचा पाया घातला. १९७२ च्या परिषदेत ११४ सरकारांचे प्रतिनिधी उपस्थित होते. स्टॉकहोम परिषदेमुळेच संयुक्त राष्ट्रे पर्यावरण कार्यक्रमाची (UNEP) निर्मितीही झाली. या संस्थेचे मुख्यालय नैरोबी या ठिकाणी आहे.

३) वर्ल्ड वाइड फंड फॉर नेचर ही संस्था १९६१ मध्ये स्थापन झाली असून ही एक आंतरराष्ट्रीय गैर-सरकारी संघटना आहे. जंगल संरक्षण आणि पर्यावरणावर मानवाचा प्रभाव कमी करणे हा या संघटनेचा मुख्य उद्देश आहे. या संस्थेचे मुख्यालय ग्लैंड, स्वित्झर्लंड येथे असून ही संस्था १९९८ पासून दर दोन वर्षांनी लिव्हिंग प्लॅनेट रिपोर्ट जाहीर करते. तसेच “earth hour” व “debt-for-nature swap” यांसारख्या पर्यावरणपूरक संकल्पनाही राबवते.

३) ज्या देशांमध्ये सागराची पातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे, अशा देशांनी मिळून २०१० साली एकत्र येऊन चर्चा करण्यास सुरुवात केली व यातूनच २०१४ साली जागतिक निसर्ग संघटना (WNO) या संस्थेची स्थापना झाली. याचे मुख्यालय जिनेव्हा येथे असून ही संस्था नवीकरणीय ऊर्जा आणि हरित अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देते. महत्त्वाचे म्हणजे भारत या संघटनेचा सदस्य नाही.

हेही वाचा – UPSC-MPSC : ध्वनिप्रदूषण म्हणजे काय? त्याचा मानवी शरीरावर कसा परिणाम होतो?

पर्यावरण संवर्धनासाठी ज्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय संस्था काम करतात. त्याचबरोबर या क्षेत्रात अनेक महत्त्वाचे करारही झाले आहेत.
यामध्ये जैव विविधता करार १९९२, वाळवंटीकरणाविरुद्ध करार १९९४, जलवायू परिवर्तनावरील संयुक्त राष्ट्रे फ्रेमवर्क कन्वेंशन १९९४ आणि जागतिक पर्यावरण सुविधा या महत्त्वाच्या करारांचा समावेश आहे.