मागील लेखातून आपण जैवविविधतेविषयी माहिती घेतली. या लेखातून आपण जैवतंत्रज्ञानाविषयी जाणून घेऊया. जैवतंत्रज्ञान म्हणजे सूक्ष्म जीव, वनस्पती यांची उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी, जीव-रसायनशास्त्र व सूक्ष्म जीवशास्त्र तसेच अभियांत्रिकीच्या संकल्पना यांचा एकत्रित वापर करणे होय. दुसऱ्या शब्दात सांगायचं झाल्यास जैवतंत्रज्ञान म्हणजे जैविक प्रणाली व पद्धतींचा उपयोग तांत्रिकरीत्या करून मानवास उपयुक्त असे विविध उत्पादन करणे.

जैवतंत्रज्ञानाच्या अंतर्गत पुढील बाबींचा समावेश होतो.

ayurvedic experts to hold seminar on garbhavigyan event at iit bombay
आयआयटी प्रांगणात ‘गर्भविज्ञान’ धडे; उपक्रमाला विद्यार्थ्यांकडून विरोध
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Hundreds of poor patients are receiving free dialysis services at health department hospitals
दुर्गम भागातील रुग्णांसाठी आरोग्य विभागाची ‘टेलीमेडिसिन’ सेवा ठरतेय संजीवनी! सव्वा लाख रुग्णांना झाला फायदा…
MPSC Preparation Group B Services Prelims Exam History of Modern India
एमपीएससी तयारी: गट ब सेवा पूर्व परीक्षा; आधुनिक भारताचा इतिहास
hair loss reasons loksatta news
टक्कल, केसगळतीचे कारण काय? चेन्नई, दिल्लीतील पथक शेगावात
Ancient Egypt medicine Serqet goddess
Ancient Egyptian History: ४,१०० वर्षांपूर्वीच्या इजिप्तमधील फॅरोचे उपचार करणाऱ्या डॉक्टरचा शोध लागला; का आहे हा शोध महत्त्वाचा?
Investiture Ceremony Indian Army , Indian Army,
व्यावसायिकतेत लष्कर शिखरावर
nadi tarangini latest news in marathi
‘नाडी तरंगिणी’द्वारे अचूक नाडी परीक्षा! पुण्यातील नवउद्यमीने विकसित केले डिजिटल उपकरण

१) सूक्ष्म जीवांचा वापर करून घेणे. उदा. मळीपासून दारू तयार करणे, दुधापासून दही तयार करणे तसेच जीवाणूंचा वापर करून टाकाऊ पदार्थाची विल्हेवाट लावणे इ.

२) डी.एन.ए., प्रथिने इ. जैविक रेणूंचा वापर मानवी फायद्यासाठी करणे.

३) विशिष्ट पेशीद्रव्ये, जीवनसत्त्वे, लसी इ.चे उत्पादन करणे.

४) जनुकीय बदल घडवून आणून हव्या त्या वनस्पती व प्राणी यांची निर्मिती/ हव्या त्या पदार्थाची निर्मिती करणे. उदा. जीवाणूंमध्ये जनुकीय बदल घडवून आणून त्यांचा वापर मानवी हार्मोन्स तयार करण्यासाठी करणे.

जैवतंत्रज्ञानाचे साधारण दोन प्रकार असतात. एक म्हणजे अजनुकीय जैवतंत्रज्ञान आणि दुसरा म्हणजे जनुकीय जैवतंत्रज्ञान. अजनुकीय जैवतंत्रज्ञान या प्रकारात संपूर्ण पेशी, ऊती किंवा पूर्ण वैयक्तिक जीवाचा उपयोग केला जातो. उदा. वनस्पतीमधील ऊतीसंवर्धन संकरित बियाण्यांची निर्मिती. तर जनुकीय जैवतंत्रज्ञान या प्रकारात पेशीतील जनुकांमध्ये बदल घडवून आणून किंवा एका सजीवातील जनुक दुसऱ्या सजीवात टाकले जातात, याला जनुकीय अभियांत्रिकी (Genetic Engineering) असेदेखील म्हणतात.

जैवतंत्रज्ञान व भारत :

जैवतंत्रज्ञान क्षेत्रात जगभरात बरीच प्रगती झाली आहे. भारतालाही या प्रगतीचा लाभ व्हावा, तसेच देशात या नवीन तंत्रज्ञानाला चालना मिळावी म्हणून १९८२ मध्ये भारत सरकारने राष्ट्रीय जैवतंत्रज्ञान मंडळाची स्थापना केली. या मंडळाने जैवतंत्रज्ञानासाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी विशेष प्रयत्न केले. पुढे १९८६ मध्ये या मंडळाचे रूपांतर विज्ञान व तंत्रज्ञान मंडळांतर्गत काम करणारा जैवतंत्रज्ञान विभाग (Genetically Modified -GM) असा करण्यात आला. जैवतंत्रज्ञानविषयक कार्यक्रमांचे नियोजन करणे, त्यामध्ये सुसूत्रीकरण करणे याची जबाबदारी या विभागाकडे होती.

जैवतंत्रज्ञान माहिती प्रणाली :

जैवतंत्रज्ञानाच्या माहितीची देवाणघेवाण करणे, तिचा साठा करणे, यासाठी १९८७ मध्ये जैवतंत्रज्ञान माहिती प्रणाली अस्तित्वात आली. जैवतंत्रज्ञानाचा उपयोग सर्वच शाखांमध्ये होऊ लागल्याने जैवतंत्रज्ञान या क्षेत्राच्या माहितीची गरज वाढली. नवीन तंत्राच्या साहाय्याने माहिती मिळविणे, ती संकलित करणे, ती साठविणे व जेव्हा गरज असेल तेव्हा या प्रणालीचा वापर करणे, यासाठी जैवतंत्रज्ञान माहिती प्रणाली उभी करण्यात आली. जैवतंत्रज्ञान माहिती प्रणाली तयार करणारा भारत हा जगातील पहिलाच देश होता. या प्रणालीच्या माध्यमातून जैवतंत्रज्ञानाची माहिती अद्ययावत करण्यासाठी विशेष माहिती कोश करण्यात आला.

Story img Loader