वृषाली धोंगडी

प्रवाळ परिसंस्था या महासागरांमध्ये आढळणाऱ्या लहान सजीवांच्या वसाहती आहेत. त्या कॅल्शियम कार्बोनेटद्वारे तयार झालेल्या कोरल पॉलिप्सपासून बनलेल्या असतात. प्रवाळ परिसंस्थांना समुद्रातील उष्ण कटिबंधीय रेन फॉरेस्टदेखील मानले जाते. प्रवाळ परिसंस्था या समुद्राच्या एकूण पृष्ठभागाच्या फक्त ०.१% क्षेत्र व्यापतात. मात्र, २५% समुद्री प्रजातींचे हे निवासस्थान आहे. प्रवाळ सहसा समुद्राच्या उथळ भागात १५० फुटांपेक्षा कमी खोलीवर आढळतात. मात्र, काही प्रवाळ खडक आणखी खोलवर पसरलेले असतात. त्यांची खोली सुमारे ४५० फुटांपर्यंत असू शकते.

Factors influencing dryland agricultural productivity
कडधान्ये/डाळी पिकविणाऱ्या शेतकऱ्याला “लाडका शेतकरी” म्हणा!
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
viscose fabric
विश्लेषण: ‘विस्कोस’ कापड खरेच पर्यावरणपूरक असते का? पर्यावरणवाद्यांकडून वेगळेच निष्कर्ष?
Ratan Tata
‘टाटा’असणं हीच जबाबदारीची जाणीव
APMC plans to implement fast tag system at entrances to ease vehicle congestion in Vashi market
एपीएमसी प्रवेशद्वारावर फास्टॅग प्रणाली
centers of Excellence will be established in the state to improve the quality of health care Mumbai news
आरोग्य सेवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी राज्यात उत्कृष्टता केंद्रे स्थापन करणार
Indian education system
पुन्हा अविद्येकडे नेणारे षड्यंत्र?
article about mpsc exam preparation
MPSC मंत्र : राज्यसेवा मुख्य परीक्षा – कृषी घटकपरिसंस्था आणि पर्यावरण

हेही वाचा – UPSC-MPSC : पर्यावरण अवनती म्हणजे काय?

सर्व महासागरांमध्ये प्रवाळ आढळू शकतात; परंतु सर्वांत मोठे प्रवाळ खडक साधारणत: उष्ण कटिबंधीय व उपोष्ण कटिबंधीय प्रदेशातील स्वच्छ, उथळ पाण्यात आढळतात. प्रवाळ zooxanthellae नावाच्या प्रकाशसंश्लेषक शैवालाच्या परस्पर संबंधात राहत असतात. या शैवालामुळेच त्यांना विविध रंग प्राप्त होत असतात. ऑस्ट्रेलियातील ग्रेट बॅरियर रीफकडे याचे उदाहरण म्हणून बघता येईल. खोल समुद्रातील प्रवाळ जास्त खोल किंवा थंड सागरी पाण्यात (बेन्थिक झोन) राहतात आणि त्यांच्यात zooxanthellae नसतात. खोल समुद्रातील प्रवाळ त्यांच्या ऊर्जेच्या गरजांसाठी प्लँक्टन आणि सेंद्रिय पदार्थ यावर अवलंबून असतात.

हेही वाचा – UPSC-MPSC : पर्यावरण : गवताळ प्रदेश परिसंस्था

प्रवाळावर परिणाम करणारे घटक-

स्थिर हवामान परिस्थिती : जलद बदलांसाठी प्रवाळ अत्यंत संवेदनशील असतात. ते अशा प्रदेशात वाढतात; जिथे हवामान दीर्घ कालावधीसाठी स्थिर असते.

पाण्याचे स्थिर तापमान : प्रवाळ उष्ण कटिबंधीय खाऱ्या पाण्यात ( ३०° उत्तर आणि ३०° दक्षिण अक्षांशांमध्ये ) वाढतात. त्यांच्या वाढीसाठी पाण्याचे तापमान सुमारे २३° ते २५° सेल्सियस असावे लागते. प्रवाळवाढीसाठी समुद्राची दैनंदिन आणि वार्षिक तापमान श्रेणी (Diurnal and Annual Range of Temperature) फार कमी/अरुंद असणे गरजेची असते.

स्वच्छ खारे पाणी : प्रवाळवाढीसाठी स्वच्छ खारे पाणी योग्य आहे; तर गोडे किंवा अत्यंत खारट पाणी, असे दोन्ही प्रकारचे पाणी प्रवाळवाढीसाठी हानिकारक असते.

मुबलक प्लँक्टन (फायटोप्लँक्टन) : प्रवाळवाढीसाठी ऑक्सिजन आणि सूक्ष्म सागरी अन्नाचा पुरेसा पुरवठा लागतो; ज्याला प्लँक्टन (फायटोप्लँक्टन), असे म्हणतात. त्यांच्या वाढीसाठी हे अत्यंत आवश्यक अन्न आहे. सहसा zooxanthelle शेवाळ परस्पर सहसंबंध प्रवाळांना प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेतून अन्न तयार करण्यास मदत करत असते.

हवामान बदल व प्रदूषणविरहित क्षेत्र : प्रवाळ परिसंस्था अत्यंत नाजूक असतात. हवामान बदल आणि समुद्रातील प्रदूषण यामुळे प्रवाळ परिसंस्था असुरक्षित असतात. प्रवाळवाढीवर हे दोन घटक विपरीत परिणाम करत असतात. उदा. कोरल ब्लिचिंग प्रक्रिया

कोरल रीफच्या वाढीसाठी अटी-

  • कोरल रीफच्या वाढीसाठी सर्वांत अनुकूल तापमान २३° ते २५° सेल्सियसदरम्यान असते. पाण्याचे तापमान २० डिग्री सेल्सियसपेक्षा कमी नसावे तसेच ३५ डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त नसावे.
  • कोरल केवळ खाऱ्या पाण्याच्या परिस्थितीतच जगू शकतात; ज्याची सरासरी क्षारता २७% ते ४०% दरम्यान असते.
  • ५० मीटरपेक्षा कमी खोली असलेल्या उथळ पाण्यात कोरल रीफ चांगले वाढतात. पाण्याची खोली २०० मीटरपेक्षा जास्त नसावी.
  • ग्लोबल कोरल रीफ मॉनिटरिंग नेटवर्क (GCRMN) द्वारे जगातील प्रवाळ खडकांच्या स्थितीचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. ताज्या अहवालानुसार गेल्या दशकात सुमारे १४% प्रवाळ नष्ट झाले आहेत. महासागरातील आम्लीकरण, समुद्रातील तापमानवाढ व प्रदूषण, अतिमासेमारी, अनिर्बंधित पर्यटन व किनारपट्टी अव्यवस्थापन यांसारख्या स्थानिक घटकांमुळे कोरल इको सिस्टीमला धोका निर्माण झाला आहे.