वृषाली धोंगडी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मागील काही लेखांमध्ये आपण पर्यावरण म्हणजे काय? पर्यावरणाचे घटक कोणते? परिसंस्था काय? पर्यावरणाचा ऱ्हास कसा होतो? ऱ्हास होण्यासाठी कारणीभूत असलेल्या समस्या जसे की प्रदूषण आणि जंगलतोड यांवर चर्चा केली. नैसर्गिक साधनसंपत्ती भविष्यातील पिढ्यांसाठी कशी संवर्धित करता येईल आणि त्यासाठी आपण शाश्वत विकास ही संकल्पना बघितली. परंतु, या घडीला पर्यावरणासाठी आपण काय केले पाहिजे, आपली नैतिक जबाबदारी काय असायला पाहिजे, त्यालाच आपण पर्यावरण नैतिकता म्हणतो यावर सविस्तर चर्चा करू.
हेही वाचा – UPSC-MPSC : पर्यावरणासंदर्भात कोणत्या आंतरराष्ट्रीय परिषदा भरवण्यात आल्या? त्यांची उद्दिष्टे कोणती?
पर्यावरणीय नैतिकता ही तत्त्वज्ञानाची एक शाखा आहे; जी पर्यावरणीय मूल्यांचा संकल्पनात्मक पाया, तसेच जैवविविधता आणि पर्यावरणीय प्रणालींचे संरक्षण व टिकवून ठेवण्यासाठी सामाजिक दृष्टिकोन, कृती व धोरणे यांच्यासभोवतालच्या अधिक ठोस समस्यांचा अभ्यास करते. म्हणजेच साध्या सरळ भाषेत जागतिक पर्यावरण संरक्षणाच्या कारणासाठी नैतिक समर्थन आणि नैतिक प्रेरणा प्रदान करते. पर्यावरण नैतिकता हा काही एक प्रवाह नसून, त्यात विविध संकल्पना व काही सिद्धांत आहेत. ते पुढीलप्रमाणे…
१) मानवतावादी सिद्धांत- पीटर सिंगर यांनी ‘जागतिक वारसास्थळे’ जतन करण्याचे समर्थन केले. त्यांच्या मते- जगातील अशा स्थानांना सुरक्षा देणे गरजेचे आहे; जी गोष्ट भविष्यातील पिढ्यांना प्रेरणा देत राहील. उदा. अमेझॉन वर्षावनांचे संवर्धन
२) उपयोजित धर्मशास्त्र- धर्मानुसार विश्वाची निर्मिती देवाने केली आहे आणि मानव हा देवाला जबाबदार आहे. म्हणून मानवाने निसर्गाचा योग्य तो उपयोग करून, निसर्गाची काळजी घेणे ही त्याची जबाबदारी आहे.
पर्यावरणीय नैतिकतेतील समस्या-
१) जंगलांचा नाश : बहुराष्ट्रीय कंपन्या जंगलांचा असीमित वापर करतात. मात्र, या विनाशाचा फटका जंगलात राहणाऱ्या गरीब आणि आदिवासींना सहन करावा लागत आहे. त्यामुळे जैवविविधता, अधिवास आणि वनस्पती व प्राणी नष्ट होतात.
२) मानववंश केंद्रितता : यात केवळ मानवाला नैतिक स्थान प्रदान करण्यात आले आहे. केवळ मानवच त्याच्या स्वत:च्या अधिकारात नैतिकदृष्ट्या विचारशील आहे. याचा अर्थ असा आहे की, पर्यावरणासंदर्भात असलेले सर्व अधिकार हे मानवाला आहेत.
३) प्राण्यांचे हक्क : आपल्यासोबत पृथ्वीवर असलेल्या वनस्पती व प्राण्यांनाही जगण्याचा आणि पृथ्वीची संसाधने व राहण्याची जागा सामायिक करण्याचा अधिकार आहे. प्राणी कल्याण हे पर्यावरणीय नैतिकतेशी संबंधित आहे. कारण- प्राणी नैसर्गिक वातावरणात अस्तित्वात आहेत.
४) पर्यावरणीय प्रदूषण : पर्यावरणीय प्रदूषणाचे परिणाम जागतिक स्तरावर दिसतात. शिवाय, समाजातील गरीब व दुर्बल घटकांना हवामान बदलाचा अधिक परिणाम होतो.
५) समानतेचा अभाव : प्रगत भागात राहणारे लोक संसाधनांचा व ऊर्जेचा जास्त उपयोग घेतात आणि वाया घालवतात. परंतु, परिणाम गरिबांना भोगावे लागतात.
हेही वाचा – UPSC-MPSC : वन परिसंस्था म्हणजे काय? या परिसंस्थेची वैशिष्ट्ये कोणती?
पर्यावरण नैतिकतेवरील उपाय :
- मानवाने जमिनीला ‘वस्तू’ म्हणून न पाहता, त्याला एका जिवंत ऊर्जा प्रवाहाप्रमाणे पाहावे; जे मानव, वनस्पती व प्राण्यांमधून वाहत आहे. तसेच मानव नसलेल्या (वनस्पती व प्राणी) घटकाकडे फक्त उपभोगाची वस्तू न पाहता, या पर्यावरणातील भागीदार म्हणून पाहावे.
- जीवनावश्यक गरजा पूर्ण करण्याशिवाय पर्यावरणाची समृद्धता आणि विविधता कमी करण्याचा मानवाला अधिकार नाही.
- सध्या मानवाचा, मानवाव्यतिरिक्त भागात हस्तक्षेप वाढत आहे आणि त्यासाठी योग्य धोरणनिर्मिती करणे गरजेचे आहे. या धोरणांमुळे मानवाच्या आर्थिक, सामाजिक, तांत्रिक व वैचारिक जीवनात बदल व्हायला पाहिजे; जेणेकरून मानव हा त्याच्या आताच्या जीवन गुणवत्तेचा पुरस्कार करील ना की ते अधिक वाढवण्यासाठी धडपड करील आणि पर्यावरणास हानी पोहोचवेल.
- प्राचीन काळात लोक नेहमीच पर्वत, नद्या, जंगले, झाडे आणि अनेक प्राणी यांना पूज्य मानत. अशा प्रकारे निसर्गाचा बराचसा भाग संरक्षित केला गेला. परंपरांमध्ये वनस्पती आणि प्राणी हे निसर्गाचे एक महत्त्वाचे पैलू मानले गेले. तसेच मानवानेसुद्धा आता या सहअस्तित्वास मान्यता द्यायला पाहिजे.
पर्यावरणीय नैतिकतेच्या मुद्द्यांचा सामना करण्यासाठी मानवाने काही मूल्यांवर सहमती गाठली पाहिजे आणि वैयक्तिक, राष्ट्रीय, प्रादेशिक व जागतिक स्तरावर एकमेकांना सहकार्य केले पाहिजे. जागतिक पर्यावरण संरक्षण हे जागतिक प्रशासनावर अवलंबून आहे. म्हणून पर्यावरणीय नैतिकता जागतिक दृष्टिकोनासह ही एक जागतिक नैतिकता आहे.