वृषाली धोंगडी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मागील लेखातून आपण टुंड्रा व अल्पाईन परिसंस्थेविषयी माहिती घेतली. या लेखातून आपण वन परिसंस्थेविषयी जाणून घेऊया. भूस्थित परिसंस्थेचा एक प्रकार आहे, ज्याला आपण ‘वन जीवसंहती’ (Forest biome) असेदेखील म्हणतो. या परिसंस्थेने पृथ्वीचा सर्वाधिक जास्त भाग व्यापलेला आहे.

या परिसंस्थेचे खालील काही वैशिष्ट्य आहेत :

  • सर्वात मोठी आणि सर्वात जटिल स्थलीय जीवसंहती.
  • झाडे आणि इतर वृक्षाच्छादित वनस्पतींचे वर्चस्व.
  • कार्बन डाय ऑक्साईडचे जागतिक सेवन आणि
  • ऑक्सिजनच्या निर्मितीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका.

हेही वाचा – UPSC-MPSC : भारतातील जैवविविधतेचे वर्गीकरण किती भौगोलिक विभागात करण्यात आले?

प्रदेशाचे स्थान, हवामान, तेथील तापमान व पर्जन्य या आधारावर वनांचे प्रामुख्याने खालील प्रकार पडतात :

१) विषुववृत्तीय वर्षावने :

विषुववृत्तीय वनांना उष्णकटिबंधीय वनेसुद्धा म्हणतात. उष्णकटिबंधीय वर्षावने विषुववृत्ताच्या उत्तर आणि दक्षिणेस १० अंशांमध्ये आढळतात. येथील तापमान व आद्रता दोन्ही जास्त आणि स्थिर असते, ज्यामध्ये कोरडा ऋतू नसतो. येथे वार्षिक पर्जन्यमान २०० ते २२५ सेंटीमीटरपेक्षा जास्त असून वार्षिक वितरण एकसमान असते. ॲमेझॉन वर्षावने, काँगो वर्षावने, दक्षिण-पूर्व वर्षावने, पापुआ न्यू गिनी वर्षावने ही काही या प्रदेशाची उदाहरणे आहेत. या भागात ईबोणी, मोहगुणी, रबर, बांबू, चींचोणा यांसारखी वृक्ष आढळतात. उंच झाडांवर द्राक्ष वेली (Vines), महालता (Lianas), आमर बांडगुळे (Epiphytic orchid) यांसारख्या वेली आढळतात वनांमध्ये स्तरीकरण आढळून येते. बिबट्या स्लॉथ बिअर, कॅपिबारा, अजगर, विषारी साप, गोरिल्ला यांसारख्या असंख्य प्रजाती या भागात आढळतात.

२) विषुववृत्तीय हंगामी वने :

ज्या विषुववृत्तीय भागात पर्जन्यमान खूप जास्त असून, निश्चित आद्र व शुष्क हंगाम आढळतात अश्या ठिकाणी विषुववृत्तीय हंगामी वने आढळतात. झाडांची उंची जास्त असते व जांभूळ, सागवानसारखे वृक्ष भारतातील व दक्षिण-पूर्व आशियातील या प्रकारच्या वनांमधील काही प्रमुख वृक्ष आहेत.

३) उप उष्णकटिबंधीय वर्षावने :

हिवाळा व उन्हाळ्यातील तापमानातील फरक कमी असणाऱ्या, बऱ्यापैकी जास्त पर्जन्याच्या प्रदेशांमध्ये रुंदपर्णीय सदाहरित उप उष्णकटिबंधीय वर्षावने आढळून येते. हा प्रदेश मुख्यतः अमेरिकेतील फ्लोरिडा भागात आढळतो. येथील वृक्षांमध्ये महोगणी, ओक, मॅग्नोलिया, हळद, ऑर्चिड, फर्न, द्राक्ष वेली यांचा समावेश होतो.

४) समशीतोष्ण सदाहरित वने :

उष्ण व शुष्क उन्हाळे आणि शीत व आद्र हिवाळे अशा भूमध्य प्रकारच्या हवामानाच्या प्रदेशांमध्ये ही वने आढळतात. या प्रदेशामध्ये अमेरिका, कॅनडा, युरोप व आशियातील उत्तर भागाचा समावेश होतो. भारताचा विचार केला तर अशा प्रकारची वने पश्चिम घाट, आसाम, लक्षद्वीप, अंदमान व निकोबार बेटे या ठिकाणी आढळतात. वनस्पतींमध्ये शंकू आणि टोक तयार करणाऱ्या शंकूच्या आकाराच्या-सदाहरित वृक्षांच्या प्रजातींचा समावेश होतो, ज्यामध्ये स्प्रूस (picea), पाइन (Pinus), फर (Abies) आणि हेमलॉक (Tsuga) प्रजातींचे वर्चस्व असते. चिंचोना, माकडे, हत्ती, हरीण, लेमूर, एक शिंगे गेंडा (आसाम, पश्चिम बंगाल), स्लोथ, वटवाघुळ, विंचू, गोगलगाय यांसारखे प्राणी देखील आढळतात.

५) समशीतोष्ण वर्षावने :

या वनांमध्ये तापमान व पर्जन्यमान वर्षभरात बदलत असून पर्जन्यमान जास्त असते व इतर कोणत्याही वर्षावनापेक्षा ही शीत परिसंस्था आहे. ही वने मुख्यतः किनारी व पर्वतीय भागात आढळतात. यात अमेरिका व कॅनडाचा किनारी प्रदेश चिली, दक्षिण ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, जपान यांचा समावेश होतो. या भागात रेडवूड, अल्पाइन ॲश, महालता यांसारख्या वनस्पती; तर प्राणी हे समशीतोष्ण सदाहरित वनांप्रमाणे वैविध्यपूर्ण आढळतात.

६) समशीतोष्ण पानझडी वने :

या प्रकारची वने मुख्यतः समशीतोष्ण भागात आढळतात. उदा. चीन, जपान, मध्य आशिया येथे उन्हाळ्याचे तापमान २० ते २५ डिग्री सेल्सिअसपर्यंत असते. पावसाळा ऋतूत पाऊस पडतो. उन्हाळ्यात या वृक्षांची पाने गळतात. भारतात या प्रकारची वने हिमालयाच्या पायथ्याशी १००० ते २००० मीटर उंचीवर आढळतात. ओक, मॅपल, बीच, हिकरी, चेस्टनट यांसारखे वृक्ष; तर रकून, खार, कासव, हिमचिता, पांडा यांसारखे प्राणी आढळतात.

हेही वाचा – UPSC-MPSC : टुंड्रा आणि अल्पाइन परिसंस्था म्हणजे काय? त्याचे प्रकार कोणते?

७) बोरीअल सूचीपर्णी वने :

या प्रकारची वने ५०° ते ७०° अक्षवृत्तात म्हणजेच युरोपचा उत्तर भाग, आइसलँड, उत्तर अमेरिका, कॅनडा, अलास्का, रशिया या ठिकाणी आढळतात. या ठिकाणी हिवाळे लांब, कोरडे आणि थंड असतात; तर उन्हाळा कमी उष्ण व दमट असतात. कमी अक्षवृत्तिय भागात वर्षभर पाऊस पडतो. या वनांमध्ये स्प्रूस, फर, पाइन, टॅमरॅक ही वृक्षे आढळतात; तर घुबड, बाल्ड इगल, काळे अस्वल, तांबडे अस्वल, वॉलवेरीन, लाल कोल्हे, रेनडियर यांसारखे प्राणी आढळतात.