UPSC-MPSC With Loksatta : “यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह” या आमच्या उपक्रमांतर्गत आम्ही दररोज यूपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे लेख तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोत. याअंतर्गतच आम्ही ‘यूपीएससी सूत्र’ हा उपक्रमही सुरू केला आहे. त्याद्वारे दररोज घडणाऱ्या घटनांचा आढावा, परीक्षेसाठी ते का महत्त्वाचे आहे? आणि त्या संदर्भातील इतर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय.

१) कोनोकार्पस झाडांवर बंदी

अहमदाबादमधील साबरमती नदीच्या किनाऱ्यापासून ते राजकोटमधील राम वनपर्यंत कोनोकार्पस ही शोभेची झाडे लावण्यात आली होती. मात्र, गुजरात सरकारने शोभेसाठी वापरले जाणारे कोनोकार्पस हे झाड लावण्यावर बंदी घातली आहे. जंगल नसलेल्या ठिकाणी हे झाड लावू नये, असे गुजरात सरकारने सांगितले आहे. या झाडामुळे मानवी स्वास्थ्य, तसेच पर्यावरणावर प्रतिकूल परिणाम होत आहे, असे गुजरात सरकारचे म्हणणे आहे.

A group of people looking at stock market data on a screen.
Hindenburg : हिंडनबर्ग रिसर्च बंदची घोषणा अन् अदाणी समूहाच्या शेअर्समध्ये उसळी; BSE वर अदाणी पॉवर, ग्रीन एनर्जी तेजीत
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
article about social and political polarization facing by american media
वृत्तवाळवंट सुफलाम करण्यासाठी…
Dance video Uncle aunty dance went viral on social media
काका काकूंचा नादच खुळा! भर कार्यक्रमात बॉलीवूड गाण्यावर दोघांनी धरला ठेका, VIDEO एकदा पाहाच
Makar Sankranti 2025 Funny video of a kid flying a kite with pants falls down viral video
याला म्हणतात नाद! पँट खाली आली पण पतंग नाही सोडली; VIDEO पाहून पोट धरुन हसाल
Cash worth Rs 3 lakh stolen from school on Law College Road Pune news
पुणे: विधी महाविद्यालय रस्त्यावरील शाळेतून तीन लाखांची रोकड चोरी
Babasaheb Ambedkar Marathwada University ,
नामविस्तारानंतर आंबेडकरी चळवळीची वाढ खुंटलेली कशी?
Shocking video of wall collapsed on car man decision saved damage viral video on social media
योग्य निर्णय वेळेवर घेतला की त्रास कमी होतो! भिंत कोसळणार इतक्यात कारमध्ये बसला अन्…, पाहा धक्कादायक VIDEO

हा विषय यूपीएससी पूर्वपरीक्षेतील पर्यावरणीय परिस्थिती, जैवविविधता व हवामान बदल आणि मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर-३ मधील पर्यावरण या घटकाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.

तुमच्या माहितीसाठी –

१) कोनोकार्पस हे झाड मूळचे भारतीय नसून, ते अतिशय वेगाने वाढते. हिरवळ दिसावी म्हणून हे झाड गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात लावण्यात येत आहे. या झाडावरील बंदीबाबत गुजरात सरकारने मंगळवारी (२६ सप्टेंबर) एक परिपत्रक सार्वजनिक केले असून, गुजरातचे मुख्य वनसंरक्षक व वन विभागाचे प्रमुख, एस. के. चतुर्वेदी यांनी सरकारच्या या निर्णयाबाबत अधिक माहिती दिली आहे. त्यांनी झाडाच्या कोनोकार्पस या प्रजातीच्या वाढीवर नियंत्रण मिळवणे गरजेचे असल्याचे सांगितले. “कोनोकार्पस या झाडाबाबत अनेक संशोधनं करण्यात आली आहेत. या झाडामुळे पर्यावरण, तसेच मानवांवर अनेक गंभीर दुष्परिणाम होतात हे समोर आले आहे. या झाडाला हिवाळ्यात फुले येतात, तसेच फुलांचे परागकण वातावरणात पसरतात. या परागकणांमुळे अनेकांना थंडी, खोकला, अस्थमा, अॅलर्जी झाल्याचे समोर आले आहे. या झाडाची मुळं जमिनीत खोलपर्यंत जातात. त्यामुळे जमिनीत असलेल्या टेलिकम्युनिकेशन लाईन्स, ड्रिनेज लाईन्स, जलवाहिन्या खराब होत आहेत,” असे चतुर्वेदी यांनी सांगितले. तसेच कोनाकार्पस या झाडाच्या पानांचे विघटन होण्यात अडचणी येत आहेत. कारण- जमिनीतील विघटकांना या झाडाची पानं पचत नाहीत, अशी माहितीही त्यांनी दिली.

इतर महत्त्वाचे लेख :

गुजरातमध्ये कोनोकार्पस झाड लावण्यावर बंदी, अन्य राज्यांत कोणकोणत्या झाडांवर बंदी?

२) भारताच्या पाच हजार वर्षांच्या संस्कृतीचा इतिहास सांगणाऱ्या जगातल्या सर्वांत भव्य संग्रहालयाचं स्वरूप कसं असणार?

भारतात लवकरच जगातले सर्वांत मोठं संग्रहालय युगे युगे भारत हे बांधलं जाणार आहे. हे संग्रहालय नॉर्थ व साऊथ ब्लॉक्समध्ये तयार करण्यात येणार आहे. हे संग्रहालय सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत असेल. हा विषय यूपीएससी पूर्वपरीक्षेतील भारताचा इतिहास आणि राष्ट्रीय चळवळ, तसेच मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर-१ मधील भारतीय संस्कृती या घटकाच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे.

त्याबरोबरच दिल्ली येथील राष्ट्रीय संग्रहालय वर्षाच्या अखेरीस संशोधकांसाठी बंद करण्यात येणार आहे. मार्च २०२४ पर्यंत हे संग्रहालय पाडलं जाण्याची शक्यता आहे. या राष्ट्रीय संग्रहालयात प्रागैतिहासिक काळापासून ते आतापर्यंतच्या अनेक कलाकृती आहेत. ही इमारत १८ डिसेंबर १९६० रोजी निर्माण करण्यात आली होती.

या पार्श्वभूमीवर युगे युगे भारत राष्ट्रीय संग्रहालय काय आहे? युगे युगे भारत राष्ट्रीय संग्रहालय हे जुन्या राष्ट्रीय संग्रहालयाच्या तुलनेत कसं आहे. तसेच युगे युगे भारत राष्ट्रीय संग्रहालयाची उद्दिष्टं आणि वैशिष्ट्यं कोणती हे मुद्दे समजून घेणं गरजेचं आहे.

तुमच्या माहितीसाठी :

भारताची हजारो वर्षांची संस्कृती या संग्रहालयात पाहता येणार असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. हे संग्रहालय आठ वेगवेगळ्या विभागांमध्ये विभागलेलं असणार आहे. भारतीय संस्कृतीच्या पाच हजार वर्षांचा इतिहास सांगणारं हे संग्रहालय असणार आहे. तसेच भारतातल्या ऐतिहासिक घटना, व्यक्ती व त्यांची कामगिरी हे दर्शवणारं हे संग्रहालय असेल. या तीन मजली संग्रहालयामध्ये ९५० खोल्या आणि एक तळघर असेल. भारतातील प्राचीन नगर नियोजन प्रणाली, वेद, उपनिषद, प्राचीन वैद्यकीय ज्ञान आणि मौर्य, गुप्त, विजयनगर व मुघल यांसह अनेक साम्राज्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या साधनांचं प्रदर्शन करण्यात येईल. भारतातलं हे भव्य संग्रहालय २०२६ पर्यंत उभारलं जाईल, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं असलं तरीही हे भव्य- दिव्य संग्रहालय नेमकं कधीपर्यंत बांधून होणार आहे याची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही.

इतर महत्त्वाचे लेख :

भारताच्या पाच हजार वर्षांच्या संस्कृतीचा इतिहास सांगणाऱ्या जगातल्या सर्वात भव्य संग्रहालयाचं स्वरुप कसं असणार?

3) केंद्र सरकारकडून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मजकूर प्रतिबंधित करण्याचे निर्देश

केंद्र सरकारकडून सोशल मीडियावरील मजकूर ब्लॉक करण्याच्या घटना मागील पाच वर्षांमध्ये अधिक वाढल्या आहेत. समाजमाध्यमं आणि त्यांना असणारे अधिकार यांच्यासंदर्भातील तरतुदी अधिक विस्तारित करण्यात आल्या आहेत. आगामी डिजिटल इंडिया विधेयकांतर्गत, माहिती तंत्रज्ञान कायदा, २००० या कायद्याच्या कलम ६९ (ए)मध्ये काही बदल करण्यात येत आहेत.

हा विषय पूर्वपरीक्षेतील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या वर्तमान घटना, तसेच मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर-२ मधील विविध क्षेत्रांतील विकासासाठी सरकारी धोरणं या घटकाच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे.

आगामी डिजिटल इंडिया विधेयकांतर्गत, माहिती तंत्रज्ञान कायदा, २००० या कायद्याच्या कलम ६९ (ए)मध्ये काही बदल करण्यात येणार आहेत. केंद्र सरकार सर्वसमावेशक असं विधेयक तयार करण्याचा प्रयत्न करीत आहे. डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण कायदा, २०२३, भारतीय दूरसंचार विधेयक, २०२२ मसुदा आणि वैयक्तिक माहिती सुरक्षित करण्यासाठी कायदेशीर उपाय अमलात आणले जाणार आहेत.

सध्या माहिती-तंत्रज्ञान कायद्याचं कलम ६९ (ए) राष्ट्रीय सुरक्षा, सार्वजनिक सुव्यवस्था, सामाजिक हित यांच्याशी संबंधित आहे. सोशल मीडियावरील कायदा व सुवस्थेला बाधा आणणारा मजकूर असल्यास तो ब्लॉक करण्याचे अधिकार या कायद्यांतर्गत आहेत. परंतु, या कायद्याची व्याप्ती वाढवण्यात येणार असून, राष्ट्रीय सुरक्षेसह कोणत्याही कायद्याचं उल्लंघन होत असल्यास संबंधित मजकूर, संकेतस्थळ ब्लॉक करण्यात येणार आहे. सरकारी अधिकाऱ्यानं नाव न सांगण्याच्या अटीवर या कायद्यामध्ये बदल करण्याची प्रक्रिया सुरू आहे; परंतु ती गोपनीय पातळीवर आहे. त्यामुळे अंतिम मसुदा तयार झाला की, जाहीर करण्यात येईल, असं सांगितलं जात आहे.

इतर महत्त्वाचे लेख :

विश्लेषण : प्रस्तावित ‘डिजिटल इंडिया’ कायदा काय आहे?

४) अमेरिकेतील शटडाऊन

नुकतीच अमेरिकेत सरकारचं शटडाऊन होण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे शटडाऊन म्हणजे काय? शटडाऊन किती काळ चालू शकते? अमेरिकेत याआधी किती वेळा शटडाऊन झालं? हे विषय समजून घेणं गरजेचं आहे. हा विषय यूपीएससी पूर्वपरीक्षेतील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी, तसेच मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर-२ च्या दृष्टीनंही महत्त्वाचा आहे.

इतर महत्त्वाचे लेख

अमेरिकेचे सरकार १ ऑक्टोबर रोजी ‘शटडाऊन’? सरकार शटडाऊन होणे म्हणजे काय, ते कसे होते?

अमेरिकेत पुन्हा ‘शटडाऊन’ अटळ

Story img Loader