नीतिशास्त्रामध्ये लोभ आणि गरज या संकल्पना स्पष्ट केल्या आहेत. तसेच यातील फरकही स्पष्ट केला आहे. या दोन्ही संकल्पनांमध्ये नेमका काय फरक आहे, हे जाणून घेणं गरजेचं आहे. यूपीएससीच्या मुख्य परिक्षेतील सामान्य अध्ययन – ४ या पेपरच्या दृष्टीने हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे.

जीवनात मूल्ये आणि नीतिमत्ता यांचा जवळचा संबंध आहे. भावना आणि पैसा यातील फरक ही नीतिमत्ता शिकवत असते. काही व्यक्ती या केवळ पैशांसाठी तडजोड करतात. गरजेपुरते मिळवणे आणि गरजेच्या पलीकडे जाऊन एखाद्या वस्तूचा, गोष्टीचा, घटकाचा हव्यास वाटतो त्याला लोभ असे म्हणतात. व्यावहारिक असणे आणि स्वार्थ किंवा लोभी असणे यामध्ये फरक आहे. लोभ माणसाला लोकहितापासून दूर नेतो.

Market Technique Stock Market
बाजाराचा तंत्र-कल : शेअर बाजाराला बाळसं की सूज?
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Ramesh Chennithala Nana Patole
Congress : बंडखोरांविरोधात काँग्रेस अ‍ॅक्शन मोडवर, मतदानाच्या १० दिवस आधी १६ जण निलंबित
jayant patil criticize ajit pawar about koyta gang in hadapsar
पुण्यातील कोयता गँगचा बंदोबस्त करा आणि मग आमच्या पोलीस स्टेशनवर बोला : जयंत पाटील
Mission on Oilseeds in Crisis due to gm soybeans
जीएम सोयाबीन विना तेलबिया मिशन संकटात
maha vikas aghadi releases manifesto for maharashtra assembly poll 2024
महिला, शेतकऱ्यांवर आश्वासनांची खैरात; मविआचा ‘महाराष्ट्रनामा’ जाहीर
congress mp abhishek manu singhvi remarks on cji chandrachud
चंद्रचूड यांच्या कार्यकाळात सत्तासंघर्षाचा निकाल लांबणीवर पडणे अतर्क्य ; सिंघवी
crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?

हेही वाचा – यूपीएससीची तयारी : नीतिशास्त्र, सचोटी आणि नैसर्गिक क्षमता

लोभ म्हणजे नेमकं काय?

लोभ म्हणजे वास्तविक गरजेपेक्षा जास्तीची (अन्न, शक्ती, पैसा इ.) लालसा करणे होय. लोभामुळे साक्षर व्यक्तीसुद्धा त्यांची नैतिकता सहजपणे गमावून बसतात. लोभाला कोणतीही परिसीमा किंवा मर्यादा नसते. ‘अधिक’चा हव्यास नैतिकतेची सर्व बंधने तोडून टाकतो.

लोभ आणि गरज याबाबत गांधीजी म्हणतात…

महात्मा गांधीजींना निसर्गाविषयी जिव्हाळा होता. ते संवेदनशील होते. त्यांचे म्हणणे होते की, ”आपल्या पृथ्वीवरील नैसर्गिक संसाधने सर्व मानवांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी नक्कीच पुरेशी आहेत. जर गरजा योग्यरित्या ओळखल्या गेल्या आणि त्या पूर्ण केल्या गेल्या, तर आपल्याला अधिक संसाधनांची गरज पडणार नाही.”

महात्मा गांधींचे हे विधान आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचे आहे. प्रत्येक व्यक्तीने आपल्या कृतीवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. वास्तविक गरज ओळखण्याची आवश्यकता आहे. निसर्गाशी सामंजस्याने म्हणजेच नैसर्गिक संसाधनांचा योग्य आणि आवश्यक तेवढाच वापर केला पाहिजे.

निसर्गाकडे आपल्या प्रत्येकाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सर्व संसाधने आहेत. मात्र, जेव्हा एखाद्याची धारणा किंवा जीवनशैली गरजेनुसार बदलते, म्हणजे एखादा व्यक्ती आनंद मिळवण्यासाठी अधिकाधिक आकांक्षा बाळगतो, अशा आकांक्षा अमर्याद असतात. परंतु, पृथ्वीवरील संसाधने कितीही सुंदर वाटत असली, तरी ती अमर्याद नाहीत आणि म्हणूनच एखाद्या व्यक्तीने ‘लोभ’ म्हणजेच अधिकाधिक हव्यास धरला, तरी ते समाधानी होऊ शकत नाहीत. लोभ किंवा लोभी मानसिकतेची अशी प्रवृत्ती विनाश घडवते, ती नैसर्गिक संसाधने नष्ट करते, पर्यावरणाचा नाश करते आणि लोकांमध्ये कलह निर्माण करते.

ॲरिस्टॉटलनेसुद्धा लोभ आणि गरज यातील फरक स्पष्ट केला आहे. त्याने शत्रूवर मात करण्यापेक्षा स्वतःच्या इच्छांवर मात करणाऱ्याला शूरवीर म्हटले आहे. तसेच संस्कृतमध्ये एक श्लोक आहे, ”लोभमूलानि पापानि संकटानि तथैव च। लोभात्प्रवर्तते वैरं अतिलोभात्विनश्यति॥”
म्हणजेच काय तर ‘लोभ आणि पाप हे जीवनातील सर्व दुःखांचे किंवा संकटांचे मूळ कारण आहे. लोभामुळे शत्रुत्व वाढते आणि माणसाचा नाश होतो.’

हेही वाचा – यूपीएससीसाठी महत्त्वाचे : ढगफुटी म्हणजे काय? याचा अंदाज येऊ शकतो का?

गरज आणि लोभ यातील फरक लक्षात घेण्यासाठी एक कथा बघूया.

एकदा एका ऋषींना रस्त्यावर चालताना एक नाणे सापडते. त्यांना त्या नाण्याची गरज नसते. मात्र, एखाद्या गरजूला हे नाणे देता येईल, या उद्देशाने ते हे नाणे उचलतात. ऋषी दिवसभर फिरतात. पण, त्यांना एकही गरजू व्यक्ती सापडत नाही. अखेर ऋषी निराश होऊन घरी परतात. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा ते पुन्हा घराबाहेर पडतात, तेव्हा राजा आणि त्याचे सैन्य त्यांच्या दारात उभे असतात. राजा ऋषींचे आशीर्वाद घेतो, कारण तो युद्धावर जाणार असतो. ऋषी हसतात आणि त्यांना सापडलेले नाणे ते राजाला देतात. यामुळे राजा संतप्त होतो आणि नाणे देण्याचे कारण विचारतो. तेव्हा ऋषी म्हणतात, “मी हे नाणे देण्यासाठी एखाद्या गरजू व्यक्तीला शोधत होतो. काल मी खूप शोधाशोध केली, परंतु सर्वजण आनंदी आणि समाधानी होते, त्यांना जास्तीची गरज नव्हती; पण आज तू माझ्याकडे आलास. तू राजा आहेस, तुझ्याकडे संपत्ती आहे, पण तुला आणखी हवी आहे. तू अजूनही समाधानी नाहीस. तू अधिकचा भूभाग जिंकण्याच्या हव्यासापोटी युद्धावर जातो आहे, मला वाटते तुला या नाण्याची गरज आहे.” ऋषींच्या या विधानानंतर राजाला लाज वाटते. त्याला आपली चूक कळते आणि तो युद्धावर न जाण्याचा निर्णय घेतो.

या कथेत माणसाच्या आधीपासून असलेल्या संपत्तीपेक्षा जास्त संपत्ती मिळवण्याच्या इच्छेचे यथायोग्य वर्णन केले आहे. संपत्ती मिळवण्याच्या कल्पनेने ते आंधळे होतात, पण संपत्ती म्हणजे सुख नाही हे लक्षात घेणेही गरजेचे आहे.

सराव करण्यासाठी प्रश्न :

  1. लोभाने आपले सर्व जीवन व्यापलेले आहे. टिप्पणी करा.
  2. सेंट थॉमस ॲक्विनास यांच्यानुसार, ”लोभ करणे हे पाप आहे, ते देवाविरुद्धचे कृत्य आहे. पापे ही नश्वर असतात. मनुष्य लौकिक गोष्टींसाठी शाश्वत गोष्टींचा नाश करतो.” स्पष्टीकरण द्या.