सागर भस्मे

UPSC-MPSC With Loksatta : यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह या आमच्या उपक्रमांतर्गत आम्ही दररोज यूपीएससी आणि एमपीएससी परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे लेख तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. त्याअंतर्गतच यूपीएससीच्या मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर-४ ( नीतिशास्त्र)साठी महत्त्वाच्या असणाऱ्या काही संकल्पनांचा अभ्यास आपण या लेखातून करू.

uddhav thackeray fact check video
“मी गोमांस खातो, काय माझं वाकडं करायचं ते करा” उद्धव ठाकरेंनी दिली जाहीर कबुली? या खोट्या VIDEO ची खरी बाजू पाहा
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Market Technique Stock Market
बाजाराचा तंत्र-कल : शेअर बाजाराला बाळसं की सूज?
jayant patil criticize ajit pawar about koyta gang in hadapsar
पुण्यातील कोयता गँगचा बंदोबस्त करा आणि मग आमच्या पोलीस स्टेशनवर बोला : जयंत पाटील
Will Ramdas Athawale take care of BJP or Republican workers
रामदास आठवले भाजपला सांभाळणार की रिपब्लिकन कार्यकर्त्यांना?
Political Parties in Maharashtra Vidhan Sabha Election 2024
रविवार प्रचारवार; घरोघरी भेटी, गृहनिर्माण संकुलांना भेटी, चौक सभा यांना जोर
congress mp abhishek manu singhvi remarks on cji chandrachud
चंद्रचूड यांच्या कार्यकाळात सत्तासंघर्षाचा निकाल लांबणीवर पडणे अतर्क्य ; सिंघवी
Kharge slams Modi for ignoring dalit leaders in cabinet
मतांसाठीच दलित, आदिवासी हिताची भाषा ; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा आरोप

नैतिकता आणि नीतिशास्त्र

नैतिकता सार्वजनिक प्रशासनाचा अविभाज्य भाग आहे. सार्वजनिक प्रशासनात जबाबदारीने कार्य करण्यास सक्षम होण्यासाठी सार्वजनिक प्रशासकाने कसे प्रश्न विचारावेत आणि कसे नाही, यावर नैतिकता लक्ष केंद्रित करते. नैतिकता हा शब्द इथोस व लॅटीन मोरेस या ग्रीक शब्दांपासून आला आहे; ज्याचा अर्थ प्रथा, वर्तणुकीचे मार्ग किंवा मानवी चारित्र, असा होतो. मॅकेन्झी यांच्या मते, मानवी आचरणात काय बरोबर किंवा काय चांगले, याचा अभ्यास म्हणजे नैतिकता होय. तसेच मानवी जीवनात अंतर्भूत असलेल्या आदर्शाचे विज्ञान, अशीही नैतिकतेची व्याख्या करता येईल.

हेही वाचा – UPSC-MPSC : नीतिशास्त्र : वैवाहिक जीवनावर लोभ आणि गरज कसे परिणाम करतात?

नीतिशास्त्राचे स्रोत

सामान्यत: धर्म, कायदेशीर व्यवस्था, संस्कृती व कौटुंबिक व्यवस्था हे नीतिशास्त्राचे स्रोत आहेत. धर्म हा नैतिक मानकांच्या सर्वांत जुन्या पायांपैकी एक आहे. लोकांच्या विविध पंथांवर धर्माचा वेगवेगळा प्रभाव असतो. नैतिकता ही समाजातील चांगले आणि वाईट यांच्यातील एक रेषा आहे. कायदेशीर व्यवस्था समाजातील मानवी वर्तनासाठी मार्गदर्शक स्रोत म्हणून काम करते. त्यात कायद्यांनी घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे अपेक्षित असते.

संस्कृती हा आचरणे आणि मूल्ये यांचा एक नमुना आहे; ज्यांना आदर्श मानले जाते किंवा संस्कृती स्वीकार्य मर्यादेत एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित केली जाते. तर, कौटुंबिक व्यवस्था म्हणजे पारंपरिक किंवा सांस्कृतिक मूल्ये आहेत; जी कुटुंबाची रचना, कार्य, भूमिका, श्रद्धा, दृष्टिकोन, आदर्श यांच्याशी संबंधित असतात. त्यामुळे कुटुंब व्यवस्था नैतिकतेचा स्रोत बनते.

शासनातील नैतिकतेचे निर्धारक

शासनातील नैतिकतेचे स्तर सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक, कायदेशीर-न्यायिक व ऐतिहासिक संदर्भांवर आधारित आहेत. हे विशिष्ट घटक सार्वजनिक प्रशासनातील नैतिकतेवर प्रभाव टाकतात. नैतिकता प्रणाली; मग ती संपूर्ण समाजात असो किंवा सामाजिक उपप्रणालीत, ती दीर्घ कालावधीत उत्क्रांत होते. त्याचदरम्यान विविध पर्यावरणीय, ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक, कायदेशीर-न्यायिक, राजकीय व आर्थिक घटकांद्वारे प्रभाव पडतो.

हेही वाचा – UPSC-MPSC : नीतिशास्त्र : लोभ आणि गरज यांत नेमका काय फरक आहे?

नैतिकतेचे महत्त्व

१) नैतिकता आपल्याला एक नैतिक मार्ग, एक फ्रेमवर्क प्रदान करते; ज्याचा उपयोग आपण कठीण समस्यांमधून मार्ग काढण्यासाठी करू शकतो.

२) नैतिक समस्यांबद्दल विचार करण्यासाठी नीतिशास्त्र चांगली साधने प्रदान करतो. नीतिशास्त्र नेहमीच नैतिक समस्यांचे योग्य उत्तर दर्शवेल, असे नाही; मात्र ते त्यातील गोंधळ दूर करू शकते किंवा समस्या स्पष्ट करू शकते. त्यानंतर प्रत्येक व्यक्तीने स्वत:च्या निष्कर्षावर येणे अवलंबून असते.

३) नैतिकतेद्वारे मानवी आचरणाचे मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला जातो. नैतिक तत्त्वे लागू करून, माणसाला चांगले जीवन जगता येते. वैयक्तिक भल्याबरोबरच सामाजिक, तसेच संपूर्ण मानवजातीचे भले करणे हा नैतिकतेचा उद्देश आहे.

४) नैतिकता आपल्याला वैयक्तिक, तसेच सामाजिक हिताच्या उद्देशाने योग्य न्याय आणि सर्वसमावेशक निर्णय घेण्यास मार्गदर्शन करते.

५) प्रामाणिकपणा, विश्वासार्हता, जबाबदारी यांसारखी नैतिक मूल्ये तुम्हाला नैतिक दुविधांना अधिक प्रभावीपणे सामोरे जाण्यासाठी मार्गदर्शन व्हावे या दृष्टीने मदत करते.

६) आपल्या जीवनातील नैतिक तत्त्वे आणि नैतिक मूल्ये यांचा वापर चुकीच्या संकल्पना, दृष्टिकोन व पूर्वग्रह टाळण्यासाठी केला जातो.

पुढील लेखातून आपण नैतिकतेच्या शाखा आणि नैतिकतेसमोरील आव्हानांबाबतची माहिती जाणून घेऊ.