सागर भस्मे

मागील लेखातून आपण महाराष्ट्रातील रस्ते व रेल्वे वाहतुकीबाबत माहिती घेतली. या लेखातून आपण विमान वाहतूक व जलवाहतुकीविषयी जाणून घेऊया. डब्ल्यू. एफ. ऑगबर्न यांनी आपल्या ‘The social effects of Aviation’ या १९४९ मध्ये लिहिलेल्या ग्रंथात मानवी जीवनातील वाहतुकीचे महत्त्व पुढील शब्दांत व्यक्त केले आहे. “वाहतूक हा आर्थिक, सामाजिक व वाणिज्य विषयक प्रगतीचा असा एक प्रत्यक्ष मापदंड आहे की, ज्याने संपूर्ण जगाचे एका संघटित घटकामध्ये रुपांतर केलेले आहे. तो कल्पना व संशोधने लोकांपर्यंत पोहचवितो, त्याचे मानवी संस्कृतीतील योगदान महत्त्वपूर्ण आहे.”

Mumbai airport international travelers
Mumbai Airport International Passengers: मुंबई विमानतळावरून १२ लाख प्रवाशांची आंतरराष्ट्रीय वारी
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Nagpur Kolkata bomb threat
आकाशात झेपावलेल्या विमानात बॉम्ब ठेवल्याचा फोन अन्…
expansion of air india service after merger of vistara
विस्तारा’च्या विलीनीकरणातून एअर इंडियाच्या सेवेत विस्तार; विमानांचा ताफा ३०० वर, तर साप्ताहिक उड्डाणे ८,५०० वर
airship replace aircarft
‘एअरशिप्स’ घेणार विमानांची जागा? याचा अर्थ काय? भविष्यात एअरशिप्सचा कसा फायदा होणार?
Vistara Completes Merger With Air India
‘विस्तारा’ नाममुद्रा इतिहासजमा; एअर इंडियामध्ये विलीनीकरण पूर्ण
Gold seized Mumbai airport, Mumbai airport,
मुंबई विमानतळावरून पावणेतीन कोटींचे सोने जप्त, दोन कर्मचाऱ्यांना अटक

विमान वाहतुकीत ‘अवकाश’ हा वाहतुकीचा मार्ग असतो. हा मार्ग कायमस्वरूपी व शाश्वत स्वरूपाचा असतो. शिवाय त्याच्या निर्मिती व देखभालीसाठी कोणताच खर्च करावा लागत नाही. हवाई मार्ग म्हणजे विविध वाहतुकीची केंद्रे व विमानतळे यांना परस्परांशी जोडणारा मार्ग असतो. विमान उड्डाण करण्याकरिता, उतरण्याकरिता, सुरक्षितता इ. साठी भूपृष्ठावर अवलंबून असतात. विमानाचे उड्डाण करण्याकरिता (Take-off) आणि ते उतरविण्यासाठी (landing) जमिनीवरील वा पाण्यावरील ज्या स्थानाचा वापर केला जातो, त्यास ‘विमानतळ’ (Airport) म्हणतात.

हेही वाचा – UPSC-MPSC : महाराष्ट्रातील प्रमुख पर्वतरांगा कोणत्या? त्यांची वैशिष्ट्ये कोणती?

महाराष्ट्रातील विमान वाहतूक :

मुंबई हे एक आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. सुरुवातीला सांताक्रूझ विमानतळावर आंतरराष्ट्रीय विमानाची वाहतूक होत असे. त्यानंतर जागतिक स्तरावर विमान वाहतुकीमध्ये क्रांतिकारक बदल झाले व अधिक वेगाची विमाने वापरण्यात आली. विमानतळाचे आकार, स्वरूप व उड्डाणांची सुविधा या आधारेदेखील त्यांचे वर्गीकरण केले जाते. अमेरिकेमध्ये आकार व स्वरूपावर प्रथम वर्गापासून सहाव्या वर्गापर्यंत (Class | to Class VI ) वर्गीकरण केले जाते. भारतात आंतरराष्ट्रीय विमानतळ (International Airport) व राष्ट्रीय विमानतळ (National Airport) असे वर्गीकरण केले जाते.

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ : महाराष्ट्रात ‘सहार’ हे नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारलेले आहे. या विमानतळाची देखरेख व व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत केली जाते.

अन्य विमानतळे : महाराष्ट्रातील अन्य विमानतळे मुंबईच्या खालोखाल पुणे व नागपूर येथे उभारलेली आहेत. नागपूर हे देशाच्या मध्यवर्ती भागात असल्याने विमान वाहतुकीस त्याला महत्त्वाचे स्थान आहे. राजगुरुनगर (नवीन चाकण, जि. पुणे) येथील नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ विकसित होत आहे. केंद्र सरकारने सोलापूर, कोल्हापूर, नाशिक (देवळाली), औरंगाबाद, अकोला येथे विमानतळे बांधलेली आहेत. तर राज्य सरकारने कराड, उस्मानाबाद, धुळे, रत्नागिरी, जळगाव, फलटण, भंडारा, अकोला येथे विमानतळे बांधलेली आहेत. छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी नवी मुंबई येथे अतिरिक्त विमानतळाची उभारणी केली आहे. नागपूर येथील बहुआयामी आंतरराष्ट्रीय प्रवासी व कार्गो हब विमानतळ प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.

२) जलवाहतूक :

जलवाहतूक ही इतर वाहतूक साधनांच्या तुलनेत खूप स्वस्त असते. तिची माल वाहतुकीची क्षमता प्रचंड असते. राष्ट्रीय संरक्षणाच्या दृष्टीने तिचे महत्त्व जास्त आहे. भौगोलिक संशोधनात त्याचा उपयोग होतो. देशांतर्गत व परकीय व्यापारासाठीही ही वाहतूक मोलाची ठरते. मत्स्य उद्योग व इतर सागरी उद्योगांना यामुळे चालना मिळते. सागरी पर्यटनामध्येदेखील वाढ होते. देशादेशांतील परराष्ट्रीय संबंध जलवाहतुकीने अधिक दृढ होतात.

महाराष्ट्राला ७२० कि.मी. लांबीचा सागरी किनारा लाभलेला आहे. या किनाऱ्याला उत्तरेस डहाणूपासून दक्षिणेस तेरेखोलपर्यंत ४९ बंदरे आहेत. कारण जलवाहतूक ही वाहतुकीच्या इतर पर्यायाच्या तुलनेने किफायतशीर, पर्यावरणस्नेही आणि प्रवासी वेळ व खर्चात बचत करणारी आहे. व्यापार व वाणिज्याच्या शाश्वत वृद्धीसाठी जलवाहतूक क्षेत्राचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. बंदरे क्षेत्रास चालना देण्यासाठी पायाभूत सुविधा विस्तारित करून त्याद्वारे औद्योगिक विकास साधणे याकरिता शासन ‘बंदर विकास धोरण, २०१६’ राबवित आहे. या धोरणात हरितक्षेत्र बंदरे, जेट्टी, शिपयार्ड, सागरी व अंतर्गत जलवाहतूक, बंदरे जोडणी, सागरी आर्थिक परिक्षेत्र इत्यादी क्षेत्रांचा समावेश आहे.

मोठी बंदरे : राज्याच्या किनारपट्टीवर मुंबई पोर्ट ट्रस्ट (एमबीपीटी) व जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) ही दोन मोठी बंदरे आहेत.

लहान बंदरे : राज्यातील लहान बंदरांच्या विकासाचे धोरण सुधारित केले आहे आणि हरितक्षेत्र बंदरे, बहुद्देशीय धक्के व मालवाहतूक स्थानके यांच्या विकासासाठी नवीन बंदर धोरण, २०१० जाहीर केले आहे. या धोरणाचा उद्देश बंदराचा विकास खासगी क्षेत्राच्या सहभागाद्वारे ‘बांधा-मालकीचा करा-वापरा-भागीदारी करा-हस्तांतरित करा’ या तत्त्वावर करणे आहे. तसेच रस्ते व रेल्वे जोडणीच्या सुनिश्चिततेसाठी प्रयत्न करणे हे सुध्दा एक उद्दिष्ट आहे.

हेही वाचा – UPSC-MPSC : अपरंपरागत ऊर्जासंपत्ती म्हणजे काय? या ऊर्जेची निर्मिती महाराष्ट्रात कुठे केली जाते?

सागरमाला कार्यक्रम :

२५ मार्च २०१५ ला केंद्रीय मंत्रीमंडळाने भारतातील १२ बंदरे व १२०८ बेटे विकसित करण्यास परवानगी दिली. बंदरामुळे होणाऱ्या विकासास चालना देणे या कार्यक्रमाचा उद्देश आहे. किनारपट्टीवरील बंदरामध्ये पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी हा कार्यक्रम राबवला जातो. याचा उद्देश समुद्री बंदरांचे आधुनिकीकरण करणे असा आहे, जेणेकरून भारताच्या वाढीमध्ये समुद्री किनाऱ्यांचे योगदान राहील. याद्वारे सध्या अस्तित्वात असलेल्या समुद्री बंदरांचा जागतिक दर्जाच्या बंदरात विकास करणे व बंदरांचा औद्योगिकीचा एकात्मिक विकास करणे असा आहे.

मरिना : पनवेलजवळील बेलापूर खाडी येथे पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येत असून हा प्रकल्प डिसेंबर २०१९ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते, परंतु आणखी काम बाकी आहे. या प्रकल्पामुळे गेट वे ऑफ इंडिया नजीकच्या समुद्रात यॉटस व स्पीड बोटी मरिनामध्ये सुरक्षित ठेवता येतील.

रोरो सेवा : मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील मांडवा बंदर येथे रोरो सेवा सुरू करण्यात येणार आहे.