Questions And Answers : सराव प्रश्न पुढील प्रमाणे..

प्रश्न क्र. १

खालीलपैकी कोणते ठिकाण लोह खनिजासाठी प्रसिद्ध नाही?

Baramati protests that Pratibha Pawar was prevented from campaigning Inspection of Sharad Pawar bag Pune news
प्रतिभा पवार यांंना प्रचारापासून रोखल्याचे बारामतीत पडसाद; शरद पवार यांच्या बॅगची तपासणी
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
During the speech of Devendra Fadnavis the chairs started emptying nashik news
देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणावेळी खुर्च्या रिकाम्या होण्यास सुरुवात
Sharad Pawar Astrological Predictions: विधानसभा निवडणुकीत यश आणि प्रसिद्धी… काय सांगते शरद पवार यांची कुंडली, ज्योतिषतज्ज्ञ म्हणतात…
Govt Issues New Rules To Stop Misleading Ads By Coaching classes
विश्लेषण : शिकवणी वर्गांच्या जाहिरातींना चाप?
mpsc exam preparation
MPSC मंत्र : राज्य सेवा मुख्य परीक्षा- मानवी हक्क पारंपरिक अभ्यास
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : नीतिशास्त्र, सचोटी  आणि नैसर्गिक क्षमता

पर्याय :

अ) राणीगंज (प. बंगाल)

ब) सिंगोराणी (आंध्रप्रदेश)

क) कोरबा (छत्तीसगड)

ड) दिग्बोई (आसाम)

प्रश्न क्र. २

खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?

अ) देशातील एकूण वीज उत्पादनात औष्णिक विजेचा वाटा सर्वाधिक आहे.

ब) गुजरात राज्यात तेल रासायनिक उद्योगांचा विकास तुलनात्मकदृष्टय़ा अधिक झाला आहे.

पर्याय :

१) विधान अ बरोबर आहे.

२) विधान अ व ब बरोबर आहे.

३) विधान ब बरोबर आहे.

४) विधान अ व ब चूक आहे.

प्रश्न क्र. ३

खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे?

पर्याय :

अ) काझीरंगा नॅशनल पार्क – आसाम

ब) शिवपुरी नॅशनल पार्क – शिवपुरी (कर्नाटक)

क) बंदीपूर नॅशनल पार्क – म्हैसूर (कर्नाटक)

ड) रणथंबोर नॅशनल पार्क – राजस्थान

ई) शिवपुरी नॅशनल पार्क – शिवपुरी (मध्य प्रदेश)

प्रश्न क्र. ४

खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?

अ) देशातील गव्हाच्या हेक्टरी उत्पादनाचा विचार करता उत्तर प्रदेश हे राज्य प्रथम स्थानावर आहे.

ब) भारतीय पोलीस सेवेतील उच्च अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण केंद्र नाशिक येथे आहे.

पर्याय :

१ ) विधान अ बरोबर आहे.

२) विधान अ व ब बरोबर आहे.

३) विधान ब बरोबर आहे.

४) विधान अ व ब चूक आहे.

प्रश्न क्र. ५

खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?

अ) विजयंता रणगाडा व शक्तिमान ट्रक हे बोकारो येथे तयार होतात.

ब) भारतातील सर्वात उंचीवरील विमानतळ जुब्बर हट्टी हे उत्तरांचल या ठिकाणी आहे.

पर्याय :

1) विधान अ बरोबर आहे.

2) विधान अ व ब बरोबर आहे.

3) विधान ब बरोबर आहे.

4) विधान अ व ब चूक आहे.

प्रश्न क्र. ६

खालीलपैकी कोणती नदी हिमाचल प्रदेशातून वाहत नाही.

पर्याय :

1) बियास

2) रावी

3) सतलज

4) श्योक

प्रश्न क्र. ७

खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?

अ) भारतातील दिल्ली या संघराज्यास स्वतंत्र उच्च न्यायालय नाही.

ब) भारतातील गोवा या राज्यास स्वतंत्र उच्च न्यायालय आहे.

पर्याय :

1) विधान अ बरोबर आहे.

2) विधान अ व ब बरोबर आहे.

3) विधान ब बरोबर आहे.

4) विधान अ व ब चूक आहे.

प्रश्न क्र. ८

खालीलपैकी डोंगर रांगेचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा.

अ) महादेव डोंगररांगा

ब) सह्य़ाद्री पर्वत

क) सातपुडा पर्वतरांगा

पर्याय :

1) अ,ब,क

2) अ,क,ब

3) ब,अ,क

4) ब,क,अ

प्रश्न क्र. ९

खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?

अ) आसाम राज्याची सीमा भूतान आणि बांगलादेश यांना लागून आहे.

ब) पश्चिम बंगालची सीमा भूतान आणि नेपाळ यांना लागून आहे.

क) मिझोराम या राज्याची सीमा बांगलादेश आणि म्यानमार यांना लागून आहे.

पर्याय :

1) अ, ब आणि क

2) फक्त ब आणि क

3) अ आणि ब

4) फक्त अ आणि क

प्रश्न क्र. १०

मुघल साम्राज्याच्या उत्तरार्धातील बादशाहांचा योग्य क्रम लावा?

१ ) बहादूरशहा

२) महम्मदशहा

३ ) अकबर द्वितीय

४) शहाआमल द्वितीय

पर्याय

अ) १, २, ३, ४

ब) २, १, ३, ४

क) ३, ४, २, १

ड) ४, ३, २, १

प्रश्न क्र. ११

मुघल साम्राज्याच्या उत्तरार्धाबाबत खाली काही विधानं दिली आहेत. त्यापैकी बरोबर विधान कोणते ते ओळखा?

१) अहमदशहा अब्दाली हा नादिरशहाचा सर्वात विश्वासू आणि कर्तबगार सेनापती होता.

२) १७६४ मध्ये अहमदशहा अब्दाली आणि मराठ्यांमध्ये पानिपत येथे युद्ध झाले.

वरील विधानांपकी कोणते विधान अयोग्य आहे?

अ) फक्त १

ब) फक्त २

क) दोन्ही

ड ) दोन्ही बरोबर

प्रश्न क्र. १२

१) उष्ण कटिबंधीय सॅव्हाना प्रदेशाविषयी योग्य विधाने ओळखा.

पर्याय :

अ) हिवाळा कोरडा आणि उन्हाळा आर्द्र असतो.

ब) या प्रदेशामध्ये उन्हाळ्यामध्ये ३०० सेमीपेक्षा जास्त पाऊस पडतो.

क) या प्रदेशाचा समावेश BWhw मध्ये होतो.

ड) या प्रदेशामध्ये सदाहरित वनाचा समावेश होतो.

प्रश्न क्र. १३

भारताच्या पश्चिम घाटात कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो ?

अ) आरोह

ब) आवर्त

क) प्रतिरोध

ड) यापैकी नाही

प्रश्न क्र. १४

१) त्रिवार्थाच्या नुसार ‘BSh’ प्रकारचे हवामान खालीलपैकी कोणत्या भागात आढळते?

अ ) पंजाब, थारचे वाळवंट, उत्तर गुजरात आणि पश्चिम राजस्थान.

ब) महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू आणि पश्चिम आंध्र प्रदेश.

क) पश्चिम घाटातील पश्चिम उतार व किनाऱ्यावरील मैदानी प्रदेशात.

ड) हिमालयात ६००० मीटर किंवा त्यापेक्षा जास्त उंची असलेल्या डोंगर भागात.

प्रश्न क्र. १५

१) भारतात नैर्ऋत्य मान्सून सुरू होण्यास कोणता घटक जबाबदार आहे?

अ) सागरी प्रवाहातील बदल

ब) हिमालय पर्वतांची हालचाल

क) वातावरणातील दाबाच्या नमुन्यातील बदल

ड) पृथ्वीच्या अक्षावरील झुकावमध्ये बदल

प्रश्न क्र. १६

१) खालीलपैकी कोणता पर्याय पश्चिम घाटाविषयी अयोग्य आहे.

अ ) पश्चिम घाट तापी नदीच्या मुखापासून दक्षिणेला केप केमोरिन म्हणजे कन्याकुमारीपर्यंत पसरलेला आहे.

ब) उत्तरेकडून दक्षिणेकडे एकूण लांबी सुमारे १६०० किमी आहे.

क) द्वीपकल्पीय भारतीय पठाराची पश्चिम कडा म्हणजेच पश्चिम घाट होय.

ड ) महानदी, गोदावरी, कृष्णा आणि कावेरी नद्या. महानदी, गोदावरी, कृष्णा आणि कावेरी नद्यांच्या प्रवाहामुळे पश्चिम घाट विखंडित झालेला आहे.

प्रश्न क्र. १७

१) खालीलपैकी कोणती नदी ओदिशा – छत्तीसगड या दोन राज्यांच्या सीमारेषेवरून वाहते?

अ) महानदी

ब) गोदावरी

क) नर्मदा

ड) कृष्णा

प्रश्न क्र १८

योग्य विधान/विधाने ओळखा ?

अ) सिंदफना, मांजरा, प्रवरा, बिंदुसरा, दारणा या गोदावरी नदीच्या उपनद्या आहेत.

ब) कोयना, वारणा, पंचगंगा, घटप्रभा, वेण्णा या कृष्णा नदीच्या उपनद्या आहेत.

क) शोवनाथा, हसदो, मांड या कावेरी नदीच्या उपनद्या आहेत.

ड) कोलार, हातणी आणि ओरसांग या नर्मदा नदीच्या उपनद्या आहेत.

पर्याय :

१) अ, ब, आणि क

२) अ, ब, आणि ड

३) ब, क आणि ड

४) वरीलपैकी सर्व

प्रश्न क्र. १९

कालबैसाखी वादळाच्या निर्मितीचे मुख्य कारण काय आहे?

अ) उच्च तापमान आणि आर्द्रतेमुळे संवहन

ब) उबदार आणि थंड वाऱ्याच्या संयोगामुळे

क) अरबी समुद्रात कमी-दाबप्रणालीची निर्मिती

ड) एल निनचा प्रभाव

प्रश्न क्र. २०

कोपेनच्या वर्गीकरणानुसार “Bshw” हवामान प्रदेश काय निर्देशित करतो ?

अ) उष्ण वाळवंट हवामान क्षेत्र

ब) उष्ण कटिबंधीय मान्सून क्षेत्र

क) अर्धशुष्क का गवताळ प्रदेश

ड) मान्सूनशुष्क हिवाळा प्रदेश

वरील प्रश्नांची उत्तरं रात्री ८ वाजता लोकसत्ता डॉटकॉमवर प्रसिद्ध होतील.